कोरोनाच्या काळात खेळघरातील कामाची परिस्थिती

खेळघराच्या कामाचे updates-
१४ मार्च २०२० पासून खेळघराचे वस्तीतील वर्ग बंद झाले...खेळघर हे प्रामुख्याने मुलांबरोबर चे काम आहे...आणि तेच करायचे नाही या वास्तवाने आम्ही देदिवसेंदिवस अस्वस्थ होऊ लागलो होतो.
काय करता येईल सुचत नव्हते... या सक्तीच्या रिकाम्या वेळात काय करायचे सुचत नव्हते.
हळूहळू आम्हीदेखील इलेक्ट्रॉनिक मीडिया शी जुळवून घ्यायला शिकलो.आमच्या झूम मीटिंग सुरू झाल्या.आम्ही वार्षिक मूल्यमापन, पुढील वर्षाची आखणी, आमच्या स्वताच्या क्षमता विकासासाठी चा अभ्यास अशी कामे घरी बसून करू लागलो.
वस्तीत पालकांना ,मुलांना फोन करून वस्तीतली परिस्थिती जाणून घेत आहोत. जरूर लागेल तिथे आर्थिक मदत करणे एकवेळ सोपे होते ...पण मुलांचा शिकण्यातला रस टिकून रहावा, त्यांना या वेळात काही अर्थपूर्ण करायला मिळावे असे सातत्याने वाटत होते.
आमच्या वस्तीत फोनला चांगली range येत नाही, वायफाय सिग्नल अगदी विक असतो हा आमचा अनुभव होता. त्यामुळे स्मार्ट फोन च्या माध्यमातून काही संपर्क होऊ शकेल असे वाटत नव्हते.
शेवटी आम्ही एक प्रयत्न करून पहायचा ठरवला. आम्ही सर्व मुलांचे फोन नंबर्स मिळवायची मोहीम काढली.त्या साठी आम्हाला मुलांनी खुप मदत केली. जवळपास १६१ मुलांचे नंबर्स मिळाले .त्यातल्या ६७ जणांच्या घरी स्मार्ट फोन होते.
त्या नंतर प्रत्येक बॅच च्या वर्गताईने त्यांच्या वर्गाचा what's app groups
तयार केला.
फोन मुलांच्या आई किंवा बाबांकडे असणार.त्यांना कदाचित वाचता येणार नाही म्हणून आम्ही या
what's app
गटाबद्दल audio message
तयार करून पाठवला.पालकांना मुलांना तुमचा फोन काही वेळ वापरू द्यावा असे आवाहन केले.
गटावर आता आम्ही वेगवेगळ्या भाषा,गणित आणि कलेच्या activities
टाकू लागलो.काही मुलांना चित्रे काढायला आवडते आहे तर काहींना इतर विषयांत रस आहे.मुले त्यांनी काढलेल्या चित्रांचे ,लेखनाचे फोटो काढून आम्हाला पाठवत आहेत.ऑडियो मेसेज पण पाठवतात.स्वतःची डोकी चालवून गम्मत जममत देखील करत आहेत.मजा येते आहे ह्या संवादातून.

या पुढचा टप्पा म्हणजे आम्ही खेळ घराचे वाचनालय सुरू करायचे ठरवले.
वस्तीतील आपल्या केंद्रात आठवड्यातून दोनदा गोष्टीची पुस्तके मिळतील असा ऑडियो मेसेज what's app group
वरून पालकांना पाठवला.
काल वाचनालयाचा पहिला दिवस होता. ३६ मुलांनी carona चे सर्व नियम पाळून पुस्तके घरी वाचायला नेली....मुलांना चित्र काढायला कागद आणि रंग ही देता आले. वस्तीत राहणाऱ्या आमच्या मीनाताई आणि सुष्माताईनी या कामात पुढाकार घेतला.
बदललेल्या परिस्थितीत देखील काही प्रमाणात आपल्याला मुलांपर्यंत पोचता येते आहे हे समधान मनात आहे.

पुर्वावलोकनAttachmentSize
96377520_2916005741814376_8102169136311828480_o.jpg100.54 KB
96234036_2916005735147710_590832872517009408_o.jpg116.99 KB

खेळघराच्या खिडकीतून

Wed, 2020-06-17
आगामी प्रकार: 
खेळघर
संक्षिप्त माहिती: 

खेळघराच्या खिडकीतून वार्तापत्र जुलै २०१९ ते जून २०२०

प्रिय मित्र – मैत्रिणींनो,

आपण सगळेच एका अनिश्चित आणि अस्वस्थ कालखंडातून जात आहोत...अनेक आव्हानांचा सामना करत आहोत. या काळात खेळघर आणि तिथली मुले-पालक कसे आहेत? त्यांचे प्रश्न काय आहेत? गरजा काय आहेत? हे जाणून घेण्याची इच्छा खेळघराबद्दल आस्था असलेल्या प्रत्येकाच्या मनात असणार आहे. खालील टीपणातून याची कल्पना येईल.
कोणत्याही संकटाचे तोटे सर्वात अधिक वंचितांना भोगावे लागतात.लक्ष्मीनगर वस्तीतील मुले मनसे याला अपवाद नाहीत. अनिश्चितता, अस्वस्थता आणि मुले आणि पालकांची काळजी अशा भावनांनी आम्हा कार्यकर्त्यांचे मन व्यापले आहे. गेल्या २४ वर्षात कधीही खेळघर इतके दिवस बंद राहिलेले नाही. मुलांसमवेत काम करताना अनेक आव्हाने अस्वस्थ करत आहेत-

१) शाळा सुरू होईपर्यंत lock down च्या काळात मुलांपर्यंत कसे पोचता येईल? याही परिस्थितीत त्यांची विचार क्षमता, सर्जनशीलता आणि आंनद कसा टिकून राहील, त्यासाठी खेळघर काय करू शकते?
२) स्थलांतरित कुटुंबातल्या मुलांना शाळांतून drop out होण्यापासून कसे वाचवायचे?
३) lock down चा काळ संपल्यावर खेळघर परत सुरू झाल्यावर देखील अनेक आव्हाने जाणवणार आहेत –
- मुलांच्या मनातली भीती, दडपण आणि यातून आलेली निष्क्रियता ओलांडून त्यांना शिकण्याच्या दिशेने जाण्यासाठी कसे प्रवृत्त करायचे, याचा शोध घ्यायला हवा. मुलांशी पालकांशी जोडून रहायला हवे...त्यांना विश्वास द्यायला हवा.
- जवळपास ५-६ महिन्यांच्या सुट्टीमुळे, मुले अभ्यास विषयातल्या मुलभूत संकल्पना विसरली असण्याची दाट शक्यता आहे, त्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करायला हवे.
- विचार करणे, लेखन, वाचन, निरीक्षण अशा शिकाण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमतांच्या विकासासाठी पुन्हा कंबर कसायाला हवी.
- मधल्या काळात मुलांच्यामध्ये झालेल्या बदलांचा, प्रश्नांचा अभ्यास करून त्यानुसार कृतिकार्यक्रम ठरवायला हवा.
४) वस्तीतील बहितेक लोक बांधकाम मजूर आहेत. एकूणच रोजगार कधी सुरु होईल हे नक्की नाही.शिल्लक कधीच संपली आहे. त्यात शाळा सुरू झाल्यानंतर शैक्षणिक खर्चाची भर पडणार आहे. आठवीपासून पुढच्या मुलांना ३-४ हजार रुपये फी भरून खाजगी शाळेत जावे लागते. शाळांची फी, वह्या – पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश असे अनेक खर्च उभे राहणार आहेत. या परिस्थितीत मुलांची विशेषतः मुलींची शाळा बंद होण्याचा संभव आहे. छोती मोठी कामे करून मुलांना पैसे मिळवावे लागणार आहेत. आतापर्यंत खेळघर फक्त दहावी झाल्यावर पुढील शिक्षणासाठीच शैक्षणिक मदत देत असे. परंतु या परिस्थितीत आता शाळेतील विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक मदत देणे गरजेचे झाले आहे.
५) सर्वात मोठा प्रश्न आहे खेळघराचे काम चालू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचा! CSR कडून मिळणा-या मदतीवर या परिस्थितीचा परिणाम होणार आहे हे स्पष्ट आहे. बराचसा निधी करोना निवारणासाठी वळवला गेला असणार आहे. आम्ही संपर्क केलेल्या funding agencies नी आमचे प्रपोसल बाजूला ठेऊन दिले आहे.
खेळघरासारख्या शिक्षणाच्या कामात मुख्य खर्च असतो तो शिक्षकांच्या पगाराचा. हे आणि शैक्षणिक मदतीसाठीचे पैसे कसे उभे करायचे हा प्रश्न अस्वस्थ करतो आहे.
या परिस्थितीमध्ये निधीसाठी आमची सगळी भिस्त तुमच्यासारख्या खेळघराच्या हितचिंतकांवर आहे. आम्हाला कल्पना आहे की अनेकांचे स्वतंत्र उद्योग – व्यवसाय अडचणीत आहेत. मिळकतीला काही प्रमाणात खीळ बसली असणार आहे. शिवाय तुम्ही lock down मध्ये अडकलेल्या लोकांसाठी मदत केली असणारच आहे.
तरीदेखील खेळघराच्या कामाची मुलांसाठी आज कधी नव्हती इतकी गरज आहे, हे लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला शक्य असेल तेवढी मदत कराल अशी आशा आहे.
मुलांना देण्यासाठी शैक्षणिक मदतीची गरज अशी आहे -
- खेळघरातील सर्व १५० मुलांसाठी वह्या – ४००००/-
- आठवीच्या पुढच्या ४० मुलांसाठी पुस्तके – १६०००/-
- खाजगी शाळेत जाणा-या मुलांना शाळेच्या फी साठी मदत – १८४०००/-
- दहावी पास झालेल्या मुलांसाठी शिक्षणिक मदत - २३००००/-
खेळघराचे काम चालू ठेवण्यासाठी वर्षभराचा खर्च साधारणतः ३००००००/- इतका असतो. या खर्चाचा काही भाग यार्दी फाउंडेशनच्या निधीमधून आणि संस्थेच्या ठेवींच्या व्याजामधून होईल. पण तरीही खर्च अगदी कमीत कमी केला तरी सुमारे १६ लाख रुपयांची गरज आहे. आपली मदत मिळाली तर हे काम अधिक उत्साहाने पुढे नेणे शक्य होईल.
शुभदा जोशी

पुर्वावलोकनAttachmentSize
वार्तापत्र pic.pdf746.99 KB

खेळघर यु ट्यूब चॅनेल

https://www.youtube.com/channel/UCZznXXRHSwli5BeY6SQCrIQ/

यावर तुम्ही खेळघर प्रकल्पाची सविस्तर माहिती बघू शकता.