News not found!

विशेष मुलं

नवक्षितिज : ‘विशेष’ प्रौढांच्या आनंदी आयुष्यासाठी

Magazine Cover

स्वत:चं मूल ‘विशेष’ आहे, हे स्वीकारणं कोणत्याही आई-वडिलांना कठीण असतं. समाजाचा विशेष मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांच्यासाठी आवश्यक असणार्‍या सुविधांचा अभाव, त्यांच्यामुळे कुटुंबावर येणार्‍या मर्यादा, बंधनं अशा अनेक कारणांमुळं स्वत: ते मूल आणि त्याचं कुटुंब -असलेला अवकाशही हरवून बसतं. अशा प्रसंगी दैवाला, नशिबाला दोष देत, रडत बसायचं की आहे त्या परिस्थितीत त्या मुलाला आनंदी, स्वावलंबी, जास्तीत जास्त सकस आयुष्य कसं देता येईल यासाठी प्रयत्न करायचे? नीलिमाताईंनी दुसरा मार्ग स्वीकारला.

‘विशेष’ लेकीसाठी अदितीसाठी जे जे करता येणं शक्य आहे ते ते जीव ओतून केलं, पण त्या तिथंच थांबल्या नाहीत. अदितीला जे जे मिळालंय आणि जे तिला मिळायला हवं असं वाटतंय ते ते सर्व तिच्यासारख्या इतर मुलांनाही मिळायला हवं यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. नवक्षितिज हे त्याचं मूर्तरूप.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर माझं लग्न झालं. पती चंद्रशेखर हेही डॉक्टरच. लग्न झाल्यावर आम्ही ठरवलं होतं की आपल्याला दोन मुलं हवीत. मुलगा-मुलगी काहीही चालेल. दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या मुलांना वाढवायचा आनंद आम्हाला घ्यायचा होता. लग्नानंतर दोन वर्षांनी नूपुरच्या रूपानं एक गोंडस बाळ आमच्या घरात जन्मलं. तिच्या बाललीलांचा, तिच्या वाढविकासाच्या प्रत्येक टप्प्याचा मनसोक्त आनंद आम्ही घेत होतो. त्यानंतर तीन वर्षांनी अदितीचा जन्म झाला. आम्ही खुशीत होतो. पण लवकरच आमच्या लक्षात आलं की मान धरणं, कुशीला वळणं, रांगणं, बसणं, वाढीचे हे टप्पे उशिरा होताहेत.