News not found!

अनुभवात्मक

आनंदाचे डोही आनंद तरंग

आमची सई, मे महिन्यात ३ वर्षांची झाली आणि आम्ही तिला बालभवनच्या महिनाभराच्या उन्हाळी शिबिरात घातलं. रस्त्याने येता – जाता गरवारे बालभवनच्या मैदानावर खेळणारी छोटी छोटी मुलं दिसायची, तेवढीच माझी बालभवनशी ‘तोंड ओळख’ होती. सई आधी सुट्टीत अणि मग जूनपासून रोजच बालभवनला जाऊ लागली. तिला नेता – आणता, मीही बालभवनमध्ये रुळायला अन रेंगाळायला लागले. काही दिवसांत माझ्याही नकळत बालभवन कुटुंबाचीच झाले.

मे २०१६

Magazine Cover

शिक्षकांच्या अनेक कामांपैकी एक महत्त्वाचे काम संवादकर्त्याचे असते. मुलांशी प्रभावीरीतीने संवाद साधण्यासाठी विविध नाट्य-तंत्रांचे प्रशिक्षण क्वेस्टच्या ‘तारपा’ या उपक्रमांतर्गत शिक्षकांना दिले जाते. यात प्रभावी अभिवाचन, बालसाहित्याचे नाट्य-रुपांतर, बाहुली-नाटक, मुखवटा-नाटक असे विविध उपक्रम शिक्षकांना शिकवले जातात. वर्गात शिकवताना या तंत्रांचा मोठा फायदा होतो.

एप्रिल २०१६

Magazine Cover

आदिवासी मुलांपर्यंत बालसाहित्य पोहोचावे यासाठी क्वेस्टतर्फे पुस्तकगाडी हा उपक्रम केला जातो. मुलांची साक्षरता दृढ होण्यामध्ये बालपुस्तकांचे मोठे योगदान असते असे अलीकडील संशोधन दाखवते. या गाडीबरोबर चार प्रशिक्षित व्यक्तीही जातात व त्या मुलांसोबत पुस्तकांशी संबंधित विविध खेळ, उपक्रम करतात. आठवड्यातून एकदा येणाऱ्या गाडीची मुले आतुरतेने वाट पाहत असतात.

मार्च २०१६

Magazine Cover

क्वेस्टच्या अंकुर या बालशिक्षण कार्यक्रमांतर्गत ११० अंगणवाड्यांसोबत काम केले जाते. स्वच्छता हा या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे. कचरापेटीचा वापर, आरसा आणि कंगव्याचा वापर, नाक पुसायला कापडाचे लहान लहान तुकडे वापरणे, अशा छोट्या छोट्या व्यवस्थांमुळे अंगणवाडी स्वच्छ आणि प्रसन्न राहाते. अंगणवाडीत लागलेल्या स्वच्छतेच्या या सवयी मुलांना पुढे आयुष्यभर उपयोगी पडतील.

मार्च २०१६

Magazine Cover

क्वेस्टच्या अंकुर या बालशिक्षण कार्यक्रमांतर्गत ११० अंगणवाड्यांसोबत काम केले जाते. स्वच्छता हा या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग आहे. कचरापेटीचा वापर, आरसा आणि कंगव्याचा वापर, नाक पुसायला कापडाचे लहान लहान तुकडे वापरणे, अशा छोट्या छोट्या व्यवस्थांमुळे अंगणवाडी स्वच्छ आणि प्रसन्न राहाते. अंगणवाडीत लागलेल्या स्वच्छतेच्या या सवयी मुलांना पुढे आयुष्यभर उपयोगी पडतील.

फेब्रुवारी २०१६

Magazine Cover

कधी शाळेत न गेलेल्या किंवा ज्यांच्या शिक्षणात दीर्घकाळाचा खंड पडला आहे अश्या 10 ते 14 वयोगटातील मुलींसाठी केंद्र सरकारच्या मदतीने कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (KGBV) नावाच्या निवासी शाळा चालवल्या जातात. जालना जिल्ह्यातील KGBV मधील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी UNICEF च्या सहकार्याने क्वेस्ट काम करत आहे. वाचन, लेखन, व गणिताच्या जोडीला कलानुभव हा या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. वर्तमानपत्राचा वापर करून सुंदर कोलाज करणाऱ्या KGBV मधील या मुली.

जानेवारी २०१६

Magazine Cover

परिसराचे निरीक्षण करून त्याच्या नोंदी घेणे हा क्वेस्टच्या बालभवनातील महत्त्वाचा भाग आहे. बालभवनातील मुले आपापल्या स्तरावर परिसरातील विविध घटकांचा अभ्यास करतात. पहिली-दुसरीतील मुले चित्रमय नोंदी करतात. तर तिसरी-चौथीतील मुले संख्यात्मक नोंदीही करतात. आठवडाभरातील हवामानाच्या नोंदी घेऊन त्या आधारे चित्रालेख बनवला जातो. शिकलेले गणित वापरून परिसराचा कसा अर्थ लावायचा याची समज या प्रकारच्या उपक्रमांतून येते. चित्रमय हवामान तक्त्याचा वापर करून ताईच्या मदतीने हवामानाची नोंद करणारा हा चिमुरडा....

आम्हाला ‘रिच’ बालपण मिळालं!


अनुजा जोशी या गेली २६ वर्षे आयुर्वेदिक वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. महिला व बालकांचे (विशेषतः पौगंडावस्थेतील मुलांच्रे) शारीरिक व मानसिक आरोग्य हा त्यांचा अभ्यास व संशोधनाचा विषय आहे. अनेक नियतकालिकांत त्यांचे याविषयावरील लेखन तसेच बालकथा, ललितलेखन, कविता वगैरे साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्यांच्या 'उत्सव' नावाच्या काव्यसंग्रहाला गोवा कला अकादमीचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कारही मिळाला आहे.

आज मागं वळून बघताना असं वाटतंय की आम्हाला ‘रिच’ बालपण मिळालं! आज एकेक पायरी चढताना लक्षात येतं की, आपलं बालपण म्हणजे आपल्या आयुष्याच्या पायाचा दगड अतिशय भक्कम, अत्यंत समृध्द होता. नानाविध पैलूंनी सजलेला, परिस्थितीच्या रंगाने जिवंत झालेला. श्रीमंत!

श्रम हाच जीवनाचा स्रोत

समताधिष्ठित समाजाचे स्वप्न भारतीय राज्यघटनेने पाहिले आणि हजारो वर्षांची विषमता गाडून वर्गहीन, जाती-वर्णहीन मानवी समाज घडवण्यासाठी घटनाकारांनी राज्यघटना देशाकडे सुपूर्द केली. घटनेच्या आधाराने भारतीय समाजातील उच्च-नीचता, स्पृश्य-अस्पृश्यता, जाती-पोटजाती नष्ट करून समाजव्यवस्था समान पातळीवर आणण्याचे प्रयत्न झाले. परंतु आजही ते सफल होऊ शकले नाहीत. सिंधू आणि गंगा नदी खोऱ्यातील मूळ अनार्य रहिवासी आज वेगवेगळ्या जाती – जमातींमध्ये विखुरले आहेत. ते मूलतः सुसंस्कृत, शांतताप्रिय, शेती करणारे, धरणे बांधणारे, स्थापत्यविशारद, गोपालक, शेतकरी व कारागीर होते.