News not found!

चंगळवाद

चंगळवाद

प्रतिसाद - भाषिक राजकारणाचे अन्वयार्थ

पालकनीतीच्या शिक्षण-माध्यम विशेषांकातील (ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१२) किशोर दरक यांच्या ‘शिक्षणाच्या माध्यमाचं राजकारण’ या लेखाचा मध्यवर्ती मुद्दा असा दिसतो की, आज ‘प्रमाण मराठी’ भाषेच्या माध्यमातून शालेय शिक्षण दिले जात असल्याने मराठी जनतेचे शोषण चालू आहे. म्हणून ते प्रश्न उपस्थित करतात की मरणपंथाला लागलेली प्रमाण मराठी भाषाशिक्षणाचे माध्यम असावे अशी भूमिका घेऊन बहुजनांनी ‘ब्राम्हणी’ मराठी का वाचवावी? औद्योगिकीकरण झालेल्या समाजांमध्ये उर्ध्वगमनशीलतेसाठी(??) बहुजन वर्गातील लोक अभिजन वर्गातील लोकांचे अनुकरण करू पाहतात.

आनंद शोधताना...

‘संवाद माध्यमे’ हा सुषमाताईंचा अभ्यास विषय. गेली वीस वर्षे वेगवेगळ्या संस्थांमधून त्या ह्या विषयाचं अध्यापन करत आहेत. पालक-शिक्षक संघाच्या त्रैमासिकाच्या संपादक म्हणून त्यांनी दहा वर्षे काम पाहिलं. ‘साजरं करणं’ या संदर्भात त्यांच्या कौटुंबिक अनुभवांबद्दल-

मुलं लहान असतानाची गोष्ट. आमच्या चौकोनी कुटुंबाला अचानक शोध लागला, इतरांना आपल्या घरी जेवायला बोलवायची काही निमित्तंच नसतात आपल्याकडे. आपण या ना त्या कारणानं इतरांकडे जेवायला जातो - बारसं, साखरपुडा, लग्न, मुंज, सत्यनारायण, वाढदिवस, श्रावणी शुक्रवार, गणपती गौरी असं बरंच काही असतं. आमच्याकडे मात्र धाकट्याच्या बारशानंतर असं काही साजरीकरण झालेलं नव्हतं. आम्ही दोघं आईबाबा नास्तिक. त्यामुळे धार्मिक आधारावरचे उत्सव कटाप. वाढदिवसांना येत चाललेला तोचतोपणा आणि मुलांच्या ‘गरीब’ मित्रमैत्रिणींना उगाच कानकोंडे वाटायला नको ही इच्छा. त्यामुळे वाढदिवसांना उत्सवाचं स्वरूप द्यायला नकोसं वाटायचं.

साजरे करणे : निरर्थकता आणि मानसिकता

वाढदिवस, लग्न, मुंज कमीतकमी एवढे समारंभ तरी साजरे करावेच लागतात. पण का? त्यात साजरं करण्यासारखं नक्की काय आहे? डॉ. प्रदीप गोखले (तत्त्वज्ञान विभाग-पुणे विद्यापीठ) यांनी वेगळ्या दिशेनं घेतलेला हा वेध. तत्त्वज्ञान विषयातील लेखन आणि त्यांच्या कवितांसाठी ते सुपरिचित आहेत.

[मी अतिशय रूक्ष माणूस आहे. त्यामुळे या चर्चेत भाग घ्यायला मी अजिबात लायक नाही. फार तर मी एक कोपर्या तील, टोकाची भूमिका मांडून गप्प बसेन. मला गप्पच बसावे लागेल कदाचित, कारण ती बाजू केवळ व्यक्तिवैशिष्ट्य म्हणून बाजूला सारण्यास योग्य असेल. त्याला चर्चायोग्य - ज्यात अनेकजण सहभागी होतील, खेळीमेळीची देवाणघेवाण करतील - असे परिमाण नसेल. पण असो. (म्हणजे नसो.) नमनालाच घडाभर तेल कशाला? मांडतोच मी बाजू आपली!]

१. निरर्थकता

उत्सवाचा उद्योग

श्री. साठे व्यवसायानं वास्तुरचनाकार आहेत. साहित्य, नाट्य, चित्रपट या माध्यमांमधून त्यांनी माणसाच्या मनोव्यापारांचा सातत्याने वेध घेतला आहे. परिवर्तनासाठी प्रयत्न केला आहे. आपले उत्सव उद्योगांकडून कसे नियंत्रित केले जातात. भांडवलशाही व्यवस्था आपल्या जगण्यावर कसा परिणाम घडवते नि त्याला आपण कसं तोंड द्यायचं, याबद्दल ते लिहीताहेत -

माणूस, स्वतंत्र, स्वतःपुरता उत्स्फूर्तपणे जे जगतो ते एकट्यापुरतं असतं. तसं पशूही जगतात. पण माणसाला तेवढं पुरत नाही. उत्स्फूर्त प्रेरणा थोड्या बाजूला ठेवून, नियंत्रित करूनही एकत्र येऊन सर्वांच्यासाठी आनंद निर्माण करणं त्याला आवश्यक वाटतं. धनधान्य निर्माण झालं की सुगीचा आनंद व्यक्त होतो. भरपूर मासळी मिळाली की नारळीपौर्णिमा साजरी होते.

तसंच दुःखही वाटून घ्यावंसं वाटतं. एकत्र येण्यातून संस्कृती निर्माण होते, नीतीनियम येतात. त्यात आनंद निर्मिती आहे तसंच पशुत्वाचं दमन आहे. अशा एकत्र येण्यामधूनच एक संदर्भ असलेलं नातं निर्माण होतं. त्यांचं म्हणणं एकमेकांना कळायला लागतं.

आवश्यक आहे समारंभांचं ‘डाऊन-सायझिंग’

गतिमान संतुलन या मासिक पत्रिकेचे संपादक श्री. दिलीप कुलकर्णी यांना आपण पर्यावरणस्नेही म्हणून ओळखतो. सम्यक् विकास आणि त्यासाठी आवश्यक तो विवेक आपल्यात यावा यासाठी त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. पर्यावरणाचा र्हासस न करताही कसं राहता येईल, हे आजमावण्यासाठी १९९३ पासून कोकणातील कुडावळे (जि. दापोली) येथे ते स्थायिक झाले आहेत.

माझं हल्ली मारुतीसारखं व्हायला लागलं आहे. सीतेनं त्याला रत्नांचा हार दिला, तेव्हा त्यानं त्यातलं प्रत्येक रत्न फोडून पाहिलं, आत ‘राम’ आहे का. मला अशीच प्रत्येक गोष्टीतली ‘पर्यावरणीयता’ बघण्याची सवय लागली आहे. कोणतीही गोष्ट करताना संसाधनांचा अपव्यय होतो का; ऊर्जांची नासाडी होते का; प्रदूषण होतं का - असे काही प्रश्न मी विचारतो, नि त्यांच्या उत्तरांच्या आधारे त्या त्या गोष्टीची ‘पर्यावरणीयता’ ठरवतो.

न उगवलेलं बोट

मी गणेशोत्सवफेम पुण्यात राहते आणि भरवस्तीत माझं कार्यालय आहे. कार्यालयासमोरच एक गणपती बसतो. मला स्वतःला त्या कार्यक्रमात काडीचाही रस नसतो. काम संपवून लोकांच्या गर्दीतून वाट काढत जाता जाता नाईलाजानं जेवढं त्या देवाचं मला, (आणि माझं त्याला), दर्शन होतं त्या व्यतिरिक्त मी त्याच्याकडे गेल्या वीस वर्षात ढुंकून पाहिलेलं नाही. पण तिथं त्या त्या काळातली कुठली कुठली भयंकर गाणी दिवसभर कोकलत असतात. आणि ते ‘आ अण्डे अमलापुरम्’ की काय, गाणं चाळीस हजारवेळा ऐकून झाल्यावर काम करता करता माझे पाय त्या गाण्याच्या ठेक्यावर हलू लागतात. ओठ तेच शब्द त्या सुरात (की बेसुरात) पुटपुटू लागतात.

तपासणी- आपल्या उत्सवांची

वीस वर्षांहून अधिक काळ डॉ. दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं आहे. गेली काही वर्षे ते ‘साप्ताहिक साधना’चे संपादक आहेत. या लेखात त्यांनी सामाजिक जीवनात अटळ असणारी कर्मकांडे आणि धर्मश्रद्धेवर आधारित सण-समारंभांची आवश्यकता नोंदवली आहे, परंतु घटनेत म्हटलेला वैज्ञानिक दृष्टिकोण अंगिकारण्याच्या कर्तव्याकडे लक्ष वेधले आहे. त्यादृष्टीने ‘साजरं करताना’ आपलं नेमकं कुठे चुकतं आणि ते बदलण्यासाठी पर्याय काय हेही सुचवलं आहे.

आजच्या बदलत्या काळामध्ये साजरीकरणाचं एक वेगळंच स्वरूप दिसतं आहे. आनंद निर्मितीच्या मूळ हेतूंना झाकून टाकतील अशा अनेक गोष्टी त्यात आलेल्या दिसतात. अनेकदा आपण त्यात सहभागी होत राहतो. आपल्याला जणू काही मजा येतेच असे स्वतःला भासवत राहतो... पण हे सारं तपासून बघायला हवे.

विषय चांगला आहे आणि बहुआयामी आहे. त्यातील सर्व आयाम या लेखात उपस्थित करता आले, तरी त्याबाबत सविस्तर मांडणी करण्याची ही जागा नव्हे. पुन्हा त्यातील प्रत्येक आयामाला काही व्यापक सांस्कृतिक, धार्मिक पार्श्वभूमी असतेच. त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे, यावरही प्रश्नाचे आकलन व उत्तरही बदलू शकते. असो.

कर्मकांडे आणि झगमगाट

सणसमारंभ आणि आपण

पालकनीतीच्या वाचकांना अरविंद वैद्य परिचित आहेत. आपले उत्सव कशाकशातून सुरू होतात आणि काळाच्या ओघात त्यांचं काय होत जातं. त्याचं ओघवतं दर्शन इथे त्यांनी घडवलं आहे. उत्सव आनंदनिर्मितीसाठीच पण यात नेमकं कुठे फसतं हेही वाचूया

उत्सव कशाकशातून सुरू होतात -

संवादकीय - दिवाळी २००५

‘माणूस नावाच्या प्राण्याला इतरांपेक्षा बर्यात दर्जाचा मेंदू नावाचा अवयव आहे आणि त्यामुळे त्याला विचार करता येतो, संकल्पना तपासून पाहता येतात.’ हे वाक्य तुम्ही पैसे भरून विकत घेतलेल्या अंकात तुम्हाला वाचायला द्यावं असं नाही, याची मला कल्पना आहे. पण आयुष्याच्या धकाधकीत आपण हे विसरूनच जातो की काय असं अनेकदा वाटत राहतं.