News not found!

प्रश्न पालकांचे

सकारात्मक शिस्त - फेब्रुवारी २०१४

मुलांचं बेशिस्त वागणं, सातत्यानं उलटून बोलणं, न ऐकणं अनेकदा पालकांना सहन होत नाही. यांना शिस्त लावण्यासाठी करायचं तरी काय? अशा अस्वस्थेतनं ते अगदी त्रस्त होऊन जातात. अशा वेळी अनेकदा, ‘‘आमच्या वेळी नव्हतं असं, त्या काळातला आज्ञाधारकपणा आता कुठं गेला?’’ असा त्यांना प्रश्‍न पडतो. बालपणी वडिलांकडे मान वर करून बघायची टाप नसलेल्या पालकांना आजच्या मुलांचे प्रतिप्रश्‍न, विरोध, मनमानी वागणं समजू शकत नाही.

मूल हवे - अट्टहास हवाच का? ( आई बाप व्हायचंय? लेखांक - ६ )

Magazine Cover

मूल हवंसं वाटणं ही नैसर्गिक व मानवी गोष्ट. पण मूल होत नसेल, तर तो जीवनमरणाचा प्रश्न का व्हावा? तंत्रज्ञान तर कोणत्याही प्रश्नाची उत्तरं काढायला धावत राहतं, पण त्या उत्तराबरोबर आपण कुठेकुठे वाहावत चाललोय, याचं भान ठेवायला नको का?

सुनंदाची myomectomy झाली होती. तिच्या गर्भाशयात मोठ्या गाठी होत्या. त्या काढून टाकणं आवश्यक होतं. गर्भधारणा होण्यासाठी त्या अडचणीच्या ठरतील अशी शक्यता होती. त्यामुळे त्याचं ऑपरेशन - myomectomy झालं होतं. त्यानंतर सहा महिने थांबून परत मूल होण्यासाठी तिचे प्रयत्न चालू होते. पण दोन वर्षं झाली तरी गर्भधारणा होत नव्हती. माझ्याकडे आली तेव्हा सुनंदाच्या लग्नाला पाच वर्षं झाली होती. तिचं वय ३१ वर्षं होतं. ऑपरेशन होऊन २ वर्षं होऊन गेली होती. Myomectomy झाल्यावर दिवस रहायला कधी कधी अडीच-तीन वर्षं लागतात. मी तिला तपासणीसाठी टेबलावर झोपवलं - आणि माझ्या लक्षात आलं - तिच्या गाठी परत वाढल्या आहेत.

आईची देणगी

१९९२ साली प्रसिद्ध झालेल्या, एका अमेरिकन आईने आपल्या मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकाचा आढावा बारा वर्षांनंतरही घ्यावासा वाटतो कारण मी वाचलेल्या अनेक पुस्तकांपैकी ही दोन पुस्तकं फारच प्रेरणादायी आहेत. पेनेलोप लीच हिचे ‘चिल्ड्रन फर्स्ट’ आणि मरियन राइट एडलमन हिचे ‘द मेझर ऑफ अवर सक्सेस’. या दोन्ही स्त्रिया स्वतःला झोकून देऊन बालकहक्कांसाठी लढणार्याह वकील आहेत. लीच ब्रिटनमधली आणि एडलमन अमेरिकेतली. आपल्या देशातल्या मुलांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी खूप काम केले आहे. दोघीही प्रभावी आणि प्रवाही लेखिका आहेत. त्यांनी मुलांचे प्रश्न आपल्या समाजाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक चौकटीत मांडले आहेत.

‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं?

तरुण मुलगे कमावत्या आईबद्दल, स्त्रियांबद्दल काय विचार करतात -
ह्या अभ्यासावर आधारित लेखमाला सप्टेंबरमधे सुरू झाली. एक व्यक्ती,
व्यावसायिक, गृहिणी आणि आई या सार्याझ भूमिका एकाच वेळी पार पाडत असताना वेळोवेळी प्राथमिकता ठरवावी लागते. ती कशी ठरवायची आणि कोणी ठरवायची : या प्रश्नांना आजवर वेगवेगळी उत्तरे दिली गेली आहेत -

माझ्या संशोधनातील एक महत्त्वाचा घटक होता ‘स्त्रियांची नोकरी.’ आपल्याकडे अजूनही स्त्रियांनी नोकरी करावी किंवा नाही हा वादाचा मुद्दा आहे. स्त्रियांनी नोकरीकरता घराबाहेर पडणं आपल्या अंगवळणी पडलेलं नाही. पुरुषांनी नोकरी करावी याबद्दल मात्र सगळ्यांचे एकमत झालेले दिसते.

एकूणच स्त्रियांनी नोकरी केल्याने कौटुंबिक हानी होते व आईच्या नोकरीने मुलाकडे दुर्लक्ष होते असे समाजाला वाटते आहे. आईची नोकरी, पैसे कमावणे या संकल्पनेवर पश्चिमेत तसेच भारतात बरेच सैद्धांतिक व संशोधनपर काम झालेले आहे. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे प्रथम बघूयात.

वर वर पाहता, खोलात शिरता...

मानसतज्ज्ञ शारदा बर्वे यांची ही लेखमाला मागील अंकापासून सुरू झाली. विविध प्रकारच्या समस्यांची मुळे शोधून त्यावर उपाय करण्यासाठी मुलांना व मोठ्यांना मदत करण्याचा वीसेक वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अशा काही मुद्यांवर त्या या लेखमालेतून आपल्याशी बोलणार आहेत. हा लेख आहे ‘लेखन अक्षमता’ या समस्येबाबत...

भिरभिरती नजर, सगळं अंग चोरून घेतलेलं, पाऊल टाकताना जमिनीलासुद्धा धक्का बसणार नाही इतकं हळू-दबकत, उपस्थित असलेल्या प्रत्येकाकडे एक किंचित कटाक्ष टाकून जणू आजमावल्यासारखा आविर्भाव. इतरांचे हसरे आश्वासक चेहरे कुठल्याही क्षणी बदलून नकोसे दिसायला लागतील अशी स्पष्ट शंका चेहर्या वर आणि समोर आलेल्या कुठल्याही वस्तूला हात लावला तरी दुसर्याे क्षणी कसलातरी स्फोट होईल असा भित्रा भाव. काहीही घडलं तरी हसणंही नाही मग बोलणं, खेळणं-बागडणं, तोंडाने मोठे आवाज काढणं अशक्य कोटीतलंच.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या पालकांसमोरील आव्हाने

गेले दोन-तीन महिने वर्तमानपत्रातून ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या’ सतत येत आहेत. त्या वाचून अनेक पालक चिंतित आहेत. या काळात दोन ठिकाणी या विषयावर तज्ज्ञ म्हणून आमंत्रण आले. तीनशेच्यावर पालक उपस्थित होते. ही आकडेवारी पालक वर्गाच्या चिंतेचे द्योतक आहे.

या प्रश्नामध्ये चार कळीचे मुद्दे आहेत -

न जमणारी गोष्ट करून पाहताना

पालक होणं सोपं नसतं. काही पालकांसाठी तर ते फार अवघड असतं. अक्षरश: उन्मळून, कोसळून टाकणारं असतं. एच आय व्ही-एडसच्या साथीत काही पालकांच्या वाट्याला असं पालकत्व येतं.

दुसरं मूल आत्ता नको - नकोच ! -डॉ. प्रतिभा कुलकर्णी

मूल होऊ द्यायचं किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार संपूर्णपणे पालकांचाच असतो, हे कुणीही मान्य करेल. पण केवळ तंत्रज्ञान सुलभ झालंय म्हणून, दिवस गेलेले असतानाही गर्भपात करण्याचा निर्णय अतिसहजपणे घेतला जातो का? थोडं थांबून, जरा विचारपूर्वक निर्णय नाही का घेता येणार?

गर्भपाताच्या निर्णयाबद्दल विचार करताना असं वाटतं की तंत्रज्ञानाच्या सुलभतेमुळे हे निर्णय इतक्या सहजासहजी घेतले जातात की काय? समाजजीवनामध्ये ह्या घटना पूर्वीपासून घडत होत्या. पण त्या काही विशिष्ट कारणासाठी घडत होत्या. पन्नास वर्षांपूर्वी गर्भपात करवून घेणं ही गोष्ट कलंक लागण्यासारखी समजली जात असे. विधवा स्त्रीला किंवा कुमारिकेला दिवस राहिले तर येनकेन प्रकारेण, तिच्या जिवाची पर्वा न करता, अशास्त्रीय पद्धती वापरून तिची सुटका करण्याचा प्रयत्न होत असे. ह्यात स्त्रीच्या जिवाला धोका होण्याची शक्यता असायची. नंतरच्या काळात गर्भपाताचा कायदा आला.