News not found!

बालकांचे हक्क

आम्ही मिळवू पंख नवे… आम्हाला बालभवन हवे...

१९७९ हे वर्ष आंतरराष्ट्रीय बालक वर्ष म्हणून जाहीर झालं होतं. पालक-शिक्षक संघानं इतर काही संस्थांना एकत्र करून शनिवारवाड्यावर मोठा कार्यक्रम केला. बालकांच्या गरजा त्यातून मांडल्या होत्या. श्रीमती शांताबाई किर्लोस्करांनी एक गाणं लिहिलं होतं –
जागवा जागवा, सकल विश्व जागवा
बालकांस अग्रहक्क, हाच मंत्र गाजवा
शरीर बनो सुदृढ सबल, सदय मने हात कुशल
या जगती शांती, बुध्दी, मैत्री, प्रेम जागवा
अशी त्याची पहिली दोन कडवी होती.

बालभवनात बहरताना...

बालभवन हे मुलांसाठीचं हक्काचं स्थान ! इथल्या वातावरणामुळे, उपक्रमांमुळे मुलांमधील सुप्त गुणांना फुलायची संधी मिळते. १९८८मध्ये बालभवनच्या प्रशिक्षणानंतर मला जाणवलं की आपल्याला मुलांमध्येच काम करायचं आहे. बालभवनचं मोकळ्या उत्साहानं भरलेलं वातावरण आणि परस्परांमधला आपलेपणाचा व्यवहार बघून तर मी बालभवनचीच झाले.

समाजाच्या आरोग्यासाठी बालभवन

मी खेळू कुठं? मी नाचू, गाऊ कुठं?
मी कुणाशी बोलू?
बडबड केली की आई रागावते,
खेळायला लागलो की बाबा चिडतात,
जरा उड्या मारल्या तर ‘एका जागी बस बरं’ म्हणतात,
गाणं म्हणलं तर गुरकावतात ‘गप्प बस’.
मी जाऊ तरी कुठं आणि करू तरी काय?
... गिजुभाई बधेका (बालदर्शनमधून)

बालभवन: बालकारणाचे पहिले पाऊल

‘बालकारण’ हा शब्द ताराबाई मोडक यांनी त्यांच्या कामाकडे लक्ष वेधताना आणि बालशिक्षणाविषयी जागृतीची चळवळ उभारताना वापरला, आणि आता बालह्क्काच्या सर्व प्रयत्नांना तो कवेत घेत आहे. बालविकास, बालरंजन, बालसाहित्य यांकडे प्रौढांनी एक जबाबदारी म्हणून बघायला पाहिजे, ही जाणीव गेल्या शतकात झालेल्या अनेक बदलांची परिणती आहे. औद्योगिक प्रगती, महानगरी समाज आणि आक्रसत गेलेला कुटुंबाचा आकार या सर्व गोष्टींचे परिणाम लक्षात येऊ लागल्यावर मुलांच्या खुरटणार्या विश्वाची बोच निर्माण झाली.

पडद्यावरचे बालमजूर

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. टी.व्ही. वर एक नाचाचा कार्यक्रम सुरु होता. एक चिमुरडा मुलगा अतिशय लवचीकपणे सुंदर नाच करीत होता. त्याचा नाच झाल्यावर स्टेजवरील मान्यवरांनी त्याला प्रश्न केला की तुला नाचाची प्रेरणा कशी मिळाली आणि इथ पर्यंतचा प्रवास कसा केला. त्यावेळी त्या चिमुरड्याने जे उत्तर दिले ते ऐकून स्टेजवर बसलेल्या जरा संवेदनशील मंडळींनी डोक्यालाच हात लावला. त्याने सांगितले जोवर मी दिवसातून दोन-दोन तासांची तीन वेळा प्रक्टिस करीत नाही तोवर माझी आई मला जेवायला देत नाही. त्यावर त्याच्या आईची प्रतिक्रिया तर अजूनच असंवेदनशील होती.

बालहक्कांचं वचन

अनेकदा असं होतं - आपण मुलाला एखादी गोष्ट आणून द्यायचं कबूल केलेलं असतं. पण प्रत्यक्षात आपल्याला ते जमत नाही. मूल त्या गोष्टीची आतुरतेनं वाट पाहत असतं. फार तर मधूनच आठवण करून देत राहतं ‘‘तुम्ही म्हणाला होतात....’’ आपण जीभ चावतो आणि पुढच्या वेळी ती गोष्ट नक्की आणायची ठरवतो.
इथे तर सर्व मोठ्या माणसांनी मिळून बालकांना बालहक्कांचं वचन दिलेलं आहे आणि ते देऊन बराच काळ उलटलेलाही आहे. आपल्या लक्षात आहे ना, की ते वचन पूर्ण करायचंय!

नोबेलचं आपल्याकडे भारी अप्रूप. आपल्या शास्त्रज्ञांना परदेशांमध्ये नोबेल पुरस्कारानं गौरवलेलं आहे, पण आपल्या देशात केलेल्या संशोधनांना नोबेलनं गौरवलं जात नाही, याची खंत आपल्याकडे नेहमी बोलून दाखवली जाते. यावर्षी नोबेलचा शांतता पुरस्कार आपल्या देशाकडे आलाय. खरं म्हणजे, कुठलंही सामाजिक विकाससन्मुख काम पुरस्कारासाठी केलं जात नाही, पुरस्कार म्हणजे समाजानं केलेलं त्या कामाचं कौतुक. किती केलं तरी नोबेल हा महत्त्वाचाच पुरस्कार आहे, पण हा पुरस्कार कौतुक म्हणून किती आणि राजकारणी खेळी म्हणून किती वापरला जातो, असाही विचार करण्याजोगा आहे.

नवक्षितिज : ‘विशेष’ प्रौढांच्या आनंदी आयुष्यासाठी

Magazine Cover

स्वत:चं मूल ‘विशेष’ आहे, हे स्वीकारणं कोणत्याही आई-वडिलांना कठीण असतं. समाजाचा विशेष मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांच्यासाठी आवश्यक असणार्‍या सुविधांचा अभाव, त्यांच्यामुळे कुटुंबावर येणार्‍या मर्यादा, बंधनं अशा अनेक कारणांमुळं स्वत: ते मूल आणि त्याचं कुटुंब -असलेला अवकाशही हरवून बसतं. अशा प्रसंगी दैवाला, नशिबाला दोष देत, रडत बसायचं की आहे त्या परिस्थितीत त्या मुलाला आनंदी, स्वावलंबी, जास्तीत जास्त सकस आयुष्य कसं देता येईल यासाठी प्रयत्न करायचे? नीलिमाताईंनी दुसरा मार्ग स्वीकारला.

‘विशेष’ लेकीसाठी अदितीसाठी जे जे करता येणं शक्य आहे ते ते जीव ओतून केलं, पण त्या तिथंच थांबल्या नाहीत. अदितीला जे जे मिळालंय आणि जे तिला मिळायला हवं असं वाटतंय ते ते सर्व तिच्यासारख्या इतर मुलांनाही मिळायला हवं यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. नवक्षितिज हे त्याचं मूर्तरूप.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर माझं लग्न झालं. पती चंद्रशेखर हेही डॉक्टरच. लग्न झाल्यावर आम्ही ठरवलं होतं की आपल्याला दोन मुलं हवीत. मुलगा-मुलगी काहीही चालेल. दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या मुलांना वाढवायचा आनंद आम्हाला घ्यायचा होता. लग्नानंतर दोन वर्षांनी नूपुरच्या रूपानं एक गोंडस बाळ आमच्या घरात जन्मलं. तिच्या बाललीलांचा, तिच्या वाढविकासाच्या प्रत्येक टप्प्याचा मनसोक्त आनंद आम्ही घेत होतो. त्यानंतर तीन वर्षांनी अदितीचा जन्म झाला. आम्ही खुशीत होतो. पण लवकरच आमच्या लक्षात आलं की मान धरणं, कुशीला वळणं, रांगणं, बसणं, वाढीचे हे टप्पे उशिरा होताहेत.

मुस्कान एक हास्य लोभवणारं

झोपडवस्तीमध्ये राहणार्‍या वंचित मुलांना आनंददायी शिक्षणाचे जिवंत अनुभव घेता यावेत यासाठी पालकनीतीचे खेळघर कार्यरत आहे. हे काम अधिक सघन, अर्थपूर्ण व्हावे यासाठी इथे काम करणार्‍या ताई-दादांनी विविध अनुभवांना भिडावे, लोकांना-संस्थांना भेटून आपली समज वाढवावी यासाठीही नेहमीच प्रयत्न केले जातात. भोपाळमधल्या ‘मुस्कान’ संस्थेचे काम बघणे हा याच प्रक्रियेचा एक भाग होता. मुस्कानच्या कामाने खेळघराच्या कार्यकर्त्यांना विलक्षण भारावून टाकले. हे काम वाचकांपर्यंतही पोहोचावे या उद्देशाने खेळघराच्या ताईने हा लेख लिहिला आहे.

शिक्षणाची भाषा की भाषेचं शिक्षण?

Magazine Cover

काळाच्या ओघात शिक्षणाचा अर्थ बदलत गेला. भाषेकडे, शिक्षणमाध्यमाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात झालेल्या बदलाचे, बदलत्या परिस्थितीचे पडसाद समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये उमटत गेले, त्याचा हा डोळस वेध.

मुलं शाळेत जातात आणि पालक
कामाला. जणू हा निसर्गनियम बनलाय. याखेरीज कुठे काही वेगळंसुद्धा घडतं. तेव्हा आपण सतर्क होतो. काही चुकतंय का पाहू लागतो. शाळेत न जाणार्या. मुलांना शालेय शिक्षणाची संधी का नाकारली जातेय पाहतो. अशा मुलांना शाळेत रस वाटायला हवा असं ठरवतो. कामावर न जाणारे पालक व्यसनी, बेजबाबदार किंवा आजारी असतील असं समजतो. अशा काळात आणि अशा वातावरणात शाळा या शिक्षणाहून इतरच काही बाबींसाठी महत्त्वाच्या ठरतात. आणि पालक हे पालकत्वाहून अधिक काही बाबींसाठी जबाबदार ठरतात.