News not found!

मानवी नाती

पडकई - शाश्वत विकासासाठी...

‘शाश्वत’ ही संस्था पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या जवळपास २५ गावांमधल्या आदिवासींसोबत काम करते आहे. डिंभे धरणामुळे निर्माण झालेल्या विस्थापितांचा प्रश्न, भीमाशंकर अभयारण्यातल्या आदिवासींच्या जमीन-नोंदणीचा प्रश्न, मुलांसाठी बालवाडी, निवासी शाळा, रोजगार अशा अनेक प्रश्नांना घेऊन ‘शाश्वसत’चे काम चालू आहे. त्यांच्या या कामाची नोंद जागतिक स्तरावरही घेण्यात आलेली आहे. नुकतेच त्यांना युएनडीपीतर्फे दिल्या जाणार्याी मानाच्या ‘इक्वेटर’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
कुसुम कर्णिक यांनी प्रत्येक काम अनोख्या उत्साहाने, धडाडीने सुरू केले, पुढे नेले. त्यांच्या कामात आणि जीवनातही त्यांना साथ मिळाली आनंद कपूर यांची.
त्यांच्या कामाचा आणि त्याबरोबरीने झालेल्या वैयक्तिक आणि सामाजिक पालकत्वाचा प्रवास त्यांनी इथे मांडलेला आहे.

पडकई -प्रत्येकाची भातखाचरं विनामोबदला, एकमेकांच्या सहकार्यानं तयार करण्याची आदिवासींची पारंपरिक पद्धत

ढवळा आपल्या मुलाला भेटण्याकरता बराच चालून आणि मोठा डोंगर उतरून आश्रमशाळेत गेला होता. तिथे गेल्यावर त्याला कळले की त्याच्या गावचा एक मुलगा बराच आजारी झालाय. परत जाताना ढवळाने त्याला खांद्यावर घेतले आणि मोठा डोंगर चढून, बरेच चालून, गावी आला; आणि त्या मुलाला त्याने त्याच्या आईबाबांच्या स्वाधीन केले. हे मला कळले, तेव्हा मला ते सुंदर आणि मानवी वाटले. त्यातून मला पालकत्वाची अनोखी ओळख पटली. आदिवासी - कोळी महादेव लोकांमध्ये काम करताना कितीतरी अनुभव असे आले की सुजाण पालकत्वाच्या संकल्पनेची रुंदी आणि खोली वाढली.

उन्मेषांची अब्जावधी

Magazine Cover

संयुक्त राष्ट्राचा अहवाल म्हणतो, जगात दर तीन स्त्रियांपैकी एकीला आयुष्यात एकदा तरी लैंगिक अत्याचाराचा, हिंसेचा अनुभव येतो. (भारताबाबत बोलायचं तर बाई म्हणून आयुष्यात एकदाही कोणत्याही प्रकारचा हिंसेचा अनुभव आला नाही, अशी बाई सापडणंच दुर्मिळ) जन्माला यायचा अधिकार नाकारण्यापासून ते जन्माला आलीच तर तिला स्थूल, सूक्ष्म, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अशा अनंत भेदभावांना, हेळसांडीला, अत्याचारांना तोंड द्यावं लागतं, केवळ ती बाई आहे म्हणून.

आई बाप व्हायचंय? -लेखांक -६ लग्नाआधी मूल...

ice-berg.jpg

‘‘गेले तीन - साडेतीन महिने पाळी आली नाही काकू, काय कारण असेल?’’

छाया मला विचारत होती. छाया ही माझ्या मैत्रिणीच्या सुनेची बहीण. उच्चशिक्षित, मोठ्या कंपनीमध्ये वरच्या हुद्यावर नोकरी करणारी, अतिशय उत्साही. वय वर्षं २८, अविवाहित आणि वजन ९५ किलो !

‘‘तीन का साडेतीन? तुझी पाळीची नक्की तारीख आठवते आहे का तुला?’’

‘‘नाही ना ! खरं तर माझी पाळी नेहमीच दोन - अडीच महिन्यांनी येते. ह्या वेळेला ती जरा जास्त लांबली आहे. खरं तर, मला वाटतंय येईल, पण ताई मागं लागली म्हणून आले.’’

प्रेमाच्या पाच भाषा

Magazine Cover

जगण्यासाठी माणसाच्या तीन मूलभूत गरजा पूर्ण होणं आवश्यक असतं, अन्न, वस्त्र आणि निवारा. आपल्या अस्तित्वाची जाणीव झालेल्या माणसाला जगण्यासाठी आणखी एका गोष्टीची अनिवार्य गरज असते, ती म्हणजे प्रेमाची.

बीजं तिथंच रुजली होती (माझं काम माझं पालकपण - लेखांक-२)

Magazine Cover

विद्यार्थी साहाय्यक समिती, फ्रेंड्स ऑफ फ्रान्स आणि वनस्थळी या तीनही संस्थांच्या कामामागचं बळ असलेल्या निर्मलाताईंना ‘त्रिदल, पुणे’ या संस्थेचा पुण्यभूषण पुरस्कार नुकताच मिळाला. या कामांबरोबर त्यांनी पालकपणाची सांगड कशी घातली, ते या लेखात उलगडलं आहे.

निम्न आर्थिक गटातल्या, खेड्यातून येणार्याम विद्यार्थ्यांचा राहण्या-जेवण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम विद्यार्थी साहाय्यक समिती करते. फ्रेंडस् ऑफ फ्रान्स या संस्थेतर्फे भारत आणि फ्रान्स या देशांदरम्यान सर्वसामान्य माणसांमध्ये संपर्क, मैत्री व्हावी आणि त्यांनी एकमेकांची संस्कृती समजावून घ्यावी यासाठी प्रयत्न केले जातात. वनस्थळी ह्या संस्थेतर्फे छोट्या गावातल्या महिलांना बालशिक्षणासाठी प्रशिक्षणं दिली जातात. त्यातून गावपातळीवरचा शिक्षणाबद्दलचा दृष्टिकोन तयार होतो. शिवाय महिलांचा आत्मविश्वास वाढतो, त्या समाजातला एक महत्त्वाचा घटक बनतात.

मुलांच्या मनातले आजी-आजोबा

‘जमीन, आकाश, आणि अवकाश : एक थेंबाचं’ हा लेख आपण दिवाळी अंकामध्ये वाचला असेल. सृजन आनंद विद्यालयाच्या या उपक्रमामधे आजी-आजोबा आणि नातवंडं यांनी मिळून त्यांच्या भावमधुर नात्याचे अनेक पैलू उलगडून पाहिले. त्यातील नातवंडांच्या लेखनाचा भाग या अंकामधे देत आहोत.
मुलांच्या विश्वालतल्या ह्या आजी-आजोबांना भेटताना दिवाळी अंकातला लेखही सोबत घ्यावा. जमीन, आकाश, आणि अवकाशाचा सलग अनुभव घेण्यासाठी दोन्ही लेख एकत्रित वाचावेत ही विनंती.

माझ्या वयामुळं की काय अनेक आजी-आजोबा या ना त्या रूपानं त्यांचं मनोगत माझ्यापर्यंत पोचवत असतात. सृजन-आनंदची चिल्ली-पिल्लीही त्यांच्या आजी-आजोबांबद्दल गंमती-जमती सांगत असतात. सृजन-आनंद विद्यालयात फक्त एक ते चार इयत्ताच आहेत. त्यामुळं मुलांच्या मनोभूमीत आजी-आजोबा कसे रुजले आहेत याचा अंदाज घ्यावा म्हणून एके दिवशी इयत्ता तिसरी-चौथीच्या मुलांना वर्गकाम म्हणून ‘आजी-आजोबांसंबंधी तुम्हांला जे लिहावंसं वाटतं ते लिहा’ असं म्हटल्यावर प्रत्येकानं मनःपूर्वक लिहिलं आहे. ह्या लेखाच्या आवाक्यात पन्नास-साठ मुलांचं लिखाण देणं अप्रस्तुत ठरणार असलं तरी त्यांचं लिखाण समजून न घेणंही अन्यायकारक ठरेल.

निषेध

स्थळ : व्यसनमुक्त होण्यासाठी झटणार्याव लोकांची बैठक. पण हे व्यसनमुक्ती केंद्र नाही. हे स्वेच्छेनं एकत्र येणार्‍या लोकांचं भेटण्याचं ठिकाण आहे.
उपस्थिती : व्यसनमुक्त होण्याच्या प्रयत्नात मैत्रीचे बंध जुळलेले सुमारे पन्नास पुरुष. पुरुषांच्या या प्रयत्नात त्यांना अथक साथ देणार्‍या त्यांच्या सहचारिणी. यांची बैठकीतील संख्या साधारणपणे पंचवीसच्या आसपास.
चर्चेचा विषय : भांडारकर संशोधन संस्थेवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात विचारविनिमय.
चर्चेची वेळ : सायंकाळी ७ ते ८

‘मूल’गामी

Magazine Cover

आम्ही पाच भावंडं. आमचे सर्वात लाडके होते डॅडी; मोठ्या तिघांचे ते जन्मदाते वडील नव्हते कारण मी एक वर्षाचा असताना आमच्या जन्मदात्या वडिलांचा, पापांचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन वर्षांनी, आमच्या लाडक्या धाकट्या काकाशी आमच्या आईनं लग्न केलं आणि आमचा हा लाडका काका आमचा डॅडी झाला. अगदी बालपणीच आम्हाला कळून चुकलं की मनांची जवळीक ही रक्ताच्या नात्यानं किंवा डी.एन.ए.च्या धाग्यानं निर्माण होत नाही तर माणसामाणसातली देवाणघेवाण, त्यांनी एकमेकांप्रती मानलेली जबाबदारी आणि एकमेकांसह व्यतीत केलेल्या वेळामुळे निर्माण होते. मूल-पालक नात्यातला हा विचार माझ्या मनात तेव्हाच अगदी पक्का झाला असावा.

संवादकीय - जुलै २०१२

मुलीचा गर्भ असला तर तो पाडून टाकण्याच्या प्रवृत्तीवर हल्ला चढवणारा एक कार्यक्रम टी.व्ही. वर चालू असताना माझ्या नऊ वर्षाच्या मुलीनं विचारलं, ‘‘...म्हणजे काय?’’ तिला कसं उत्तर द्यावं या विचारानं मीच गोंधळून गेले होते. लोकांना फक्त मुलगा हवा असतो... मुलगी नको असते... म्हणून मग आईच्या पोटात असतानाच... एकेक शब्द उच्चारताना माझ्या पोटात गोळा येत होता. मुलगी असेल तर बाळाचा जन्मच होऊ देत नाहीत या उत्तरानं तीही हबकली होती.

मूल नावाचं सुंदर कोडं

Magazine Cover

मूल नावाचं सुंदर कोडं म्हणताना ते सुंदर आहे आणि कोडं आहे, हे तर खरंच आहे. मात्र ते रक्ताच्या नात्याइतकंच कोणताही माणूस आणि कोणतंही पिल्लू म्हणून तेवढंच सुंदर आहे. म्हणजे असलं पाहिजे, हे मला अधोरेखित करायचं आहे.

प्रेमाच्या आणाभाका घेताना जगाला फार अवघड वाटणारा एक निर्णय माझी पत्नी अंजली आणि मी सहजपणे घेऊन टाकला होता. निर्णय असं होता - आपण लग्न तर करणार आहोत आणि आपल्याला मूलही हवं आहे, तेव्हा पहिला मुलगा झाला तर मुलगी दत्तक घ्यायची आणि मुलगी झाली तर मुलगा दत्तक घ्यायचा. आपली आणि आपल्या बाळाची आबाळ होऊ नये म्हणून चार वर्षं थांबून जेव्हा आम्ही बाळाला जन्म दिला तेव्हा ती आमची मुलगी राधा होती. म्हणजे मुलगा दत्तक घेण्याचा निर्णय पक्का झाला. मध्ये पुन्हा तीन वर्षं गेली. बाळांना दत्तक देणार्याण भारतीय समाज सेवा केंद्रात (बीएसएसके) आमच्या फेर्याा सुरू झाल्या.