News not found!

मानवी नाती

मूल का होत नाही ?

तंत्रज्ञान काही प्रश्नांची उत्तरं देतं. फक्त तांत्रिक उपायांनी सगळंच भरून पावत नाही. तंत्रज्ञानाकडून आपण नेमक्या काय अपेक्षा करायच्या, हे तारतम्यानंच ठरवायला हवं.

मूल का होत नाही ह्याची काळजी करायला लागायची नक्की वेळ कुठली? लैंगिकसंबंधांचं सातत्य सुरू झाल्यावर किती दिवसात गर्भधारणा झाली नाही तर ‘काही अडचण असण्याची शक्यता आहे’ असं मानायला हरकत नाही? कालानुरूप ह्या प्रश्नांची उत्तरे बदललेली दिसतात. पूर्वी हा कालावधी दोन वर्षं मानला जाई, त्यानंतर तपासण्या करून कुठे नेमका प्रश्न. आहे हे बघायला सुरुवात करावी असं २५ - ३० वर्षांपूर्वीची पुस्तकं सांगत. अलीकडच्या काळातल्या पुस्तकात हा कालावधी एका वर्षापर्यंत आला आहे. पुस्तकात तो एका वर्षाचा असला तरी मुलासाठी नियोजन करणार्याआ जोडप्याच्या मनात मात्र तो वेगळाच असतो.

दुसरं मूल आत्ता नको - नकोच ! -डॉ. प्रतिभा कुलकर्णी

मूल होऊ द्यायचं किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार संपूर्णपणे पालकांचाच असतो, हे कुणीही मान्य करेल. पण केवळ तंत्रज्ञान सुलभ झालंय म्हणून, दिवस गेलेले असतानाही गर्भपात करण्याचा निर्णय अतिसहजपणे घेतला जातो का? थोडं थांबून, जरा विचारपूर्वक निर्णय नाही का घेता येणार?

गर्भपाताच्या निर्णयाबद्दल विचार करताना असं वाटतं की तंत्रज्ञानाच्या सुलभतेमुळे हे निर्णय इतक्या सहजासहजी घेतले जातात की काय? समाजजीवनामध्ये ह्या घटना पूर्वीपासून घडत होत्या. पण त्या काही विशिष्ट कारणासाठी घडत होत्या. पन्नास वर्षांपूर्वी गर्भपात करवून घेणं ही गोष्ट कलंक लागण्यासारखी समजली जात असे. विधवा स्त्रीला किंवा कुमारिकेला दिवस राहिले तर येनकेन प्रकारेण, तिच्या जिवाची पर्वा न करता, अशास्त्रीय पद्धती वापरून तिची सुटका करण्याचा प्रयत्न होत असे. ह्यात स्त्रीच्या जिवाला धोका होण्याची शक्यता असायची. नंतरच्या काळात गर्भपाताचा कायदा आला.

हक्क हवेत तर जबाबदार्‍या आल्याच -वसुधा तिडके

आम्हाला दोन मुलं. सध्या ही दोघं कला शाखेत महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. मुलांनी स्वतंत्र होत जावं म्हणून त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या मताचा घरात आदर केला जातो. स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारी घ्यायलाही त्यांनी प्रवृत्त व्हावं याबद्दलचं बोलणं घरात नेहमीच होत आलेलं आहे.

मुलं शाळेत होती तोपर्यंत स्वातंत्र्य - जबाबदारीची ही कसरत ठीक चालली होती. आमच्या जीवनशैलीचा त्यांच्यावर काही एक प्रभाव होता. त्यामुळे घरातल्या जबाबदार्या् ठरल्याप्रमाणे पार पाडायचा सर्वांचाच प्रयत्न होत असे.

संवादकीय - एप्रिल २०१२

Magazine Cover

एप्रिल महिन्याचा अंक तयार होत असताना शुभम या किशोरवयीन मुलाच्या मृत्यूची बातमी आली. हा मृत्यू कुठल्या आजारानं, किंवा अपघातानं झालेला नव्हता, तर शुभमच्याच मित्रांनी त्याला पळवून नेऊन, झाडाला बांधून त्याचा छळ करून, वर त्याच्या आईवडलांकडून खंडणी घेऊन खून केलेला होता. हे सगळं करणारी मुलंही किशोरवयीनच होती. हा सगळा प्रकार आपण सगळ्यांनीच वर्तमानपत्रातून वाचलेला असणार.

मी कुठून आलो?

खलील जिब्रानची एक प्रसिद्ध कविता आहे.
‘तुमची मुलं ही तुमची मुलं नव्हेत.
तर चिरंजीव होऊ इच्छिणार्याल जीवनाच्या
उत्कट आकांक्षेची ती मुलं आहेत.’
ह्या विचारांनी बालकांकडे बघू लागलो, तर मग बालक आपल्या देहांच्या वाटेनं ह्या जगात येऊन दाखल झालं आहे की कुणा परक्याच्या देहवाटेनं आलं आहे ह्या फरकाला काहीच अर्थ उरत नाही.

हे उमजलेले अनेक जण, मूल स्वतःलाच व्हावं अशीच अपेक्षा न ठेवता ह्या जगात आधी येऊन पोहोचलेल्या बाळाचे संगोपन करण्याला मान्यता देतात, इतकंच नव्हे तर त्यात धन्यता मानतात.

जपू या नाती आपुली

‘आपणच’ ही शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. शालेय शिस्तीच्या प्रश्नासंदर्भात ‘आपणच’ने एक अभ्यास हाती घेतला आहे. शिस्त हवी हा दृष्टिकोन असला तरी त्याचे स्वरूप कसे असावे यासंबंधी दुमत आहे. पालक-पाल्य-शिक्षक या नात्यांमधील दुरावा कसा कमी करता येईल हा आमचा अभ्यासाचा मूळ उद्देश आहे. मुलांवर होणार्या अन्यायाला वाचा फोडणे व या दुर्लक्षित समस्येकडे समाजाचे लक्ष वेधून घेणे हेही त्यातून साध्य करावयाचे आहे.

सेलिब्रेशन

शरयूचं, माझ्या पुतणीचं लग्न ठरलं. उत्तम स्थळ मिळालं. लग्नाची तारीख मे मधली ठरली आणि धडाक्यानं लग्नाची तयारी सुरू झाली. माझे दीर बांधकाम व्यावसायिक, श्रीमंत. त्यांच्या तोला-मोलानंच हे कार्य होणार यात शंका नव्हती. तरीही एकेक प्लॅन्स ऐकून माझे डोळे विस्फारत गेले. शरयूचे-जावयांचे दागदागिने, कपडे यांची मी कल्पना करू शकत होते पण आमच्या घरातल्यांच्या भेटींचा मुद्दा निघाला तेव्हा मी पहिल्यांदा आतून सावध झाले. हिर्यांदचे दागिने... पैठणी वगैरे शब्दांनी मी एकदम गडबडलेच.

‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ? मे २००५

मागचे दोन्ही लेख ‘लिंगभाव भूमिका’ या विषयावरचे होते. या भूमिकांचा थेट परिणाम आपल्याला जोडीदार निवडण्याच्या प्रक्रियेवर दिसून येतो. तरुण मुलांच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा काय आहेत याचा शोध मी घेतला.
आत्तापर्यंत विवाह व वैवाहिक जीवन तसंच जोडीदारांची परस्परांमधली नाती या सर्व गोष्टींचा अभ्यास समाजशास्त्रीय व सांस्कृतिक अंगांनी केलेला आढळतो. मनोसामाजिक (psycho-social) पैलू आपल्या भारतीय संदर्भात तपासलेले, फारसे सापडत नाहीत.

विवाहाकडे एक घटना किंवा सोहळा म्हणून पारंपरिक रितीने बघितले जाते. एवढेच काय उच्च वर्गीय गटात गेल्या आठ-दहा वर्षात त्यांचे Event management केले जात आहे.

दुसरीकडे विवाहाबद्दलचे दृष्टिकोन झपाट्याने बदलतायत. एकत्र राहणे (Living in) , समलिंगी नाती अशी अनेक पर्यायी नाती तरुणांच्या समोर आहेत. तेव्हा सहजीवनाकडे ते कितपत गांभीर्याने बघतात हे जाणून घ्यायचे होते.

दोघांचं भांडण तिसर्‍याचे हाल

नवरा-बायको ह्या नात्यात सामंजस्य नसणं ही काही नव्यानं घडणारी बाब नव्हे. त्याची परिणती घटस्फोट घेण्यात होणं ही मात्र आजच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसणारी घटना ठरतेय. सामंजस्य नसण्यामध्येही मुलांची कुतरओढ होत होतीच. घटस्फोटाच्या बरोबर त्यामध्ये कायद्याच्या कक्षेतल्या नियम, चौकटीही येतात. मोठ्यांच्या भांडणात मुलांना पडू न देता जपण्याची इच्छा बाजूला राहाते, त्याउलट मुलांचा हत्यारासारखा वापर केला जाऊ लागतो.
फॅमिली कोर्टात वकिली करताना येणारे अनुभव इथे व्यक्त झाले आहेत.

‘‘हे काय, चाचणी परीक्षेत एका विषयात दहा पैकी चार मार्क? काय रे, पेपर नीट लिहिला नाहीस का?’’
‘‘परीक्षेत बाबांच्या आईला काय म्हणतात? बाबांच्या बहिणीला काय म्हणतात? असे प्रश्न होते.’’
‘‘मग?’’
‘‘मी नाही लिहिली उत्तरं.’’
‘‘का?’’
‘‘....’’
‘‘अरे गाढवा, मी तुला विचारतेय, का नाही लिहिलं.’’
‘‘मी बाबांबद्दल काही नाही लिहिणार’’
‘‘आणि परीक्षेत नापास होणार?’’
‘‘आई, हा कुटुंबव्यवस्था धडा मला मुळीच आवडत नाही, आपल्या कुटुंबात फक्त तू आणि मी. याला काय कुटुंब म्हणतात?’’
‘‘....’’