News not found!

मानवी नाती

गोष्ट रोहनची !

ही गोष्ट आहे रोहनची. त्याच्या आई-बाबांची आणि आमची म्हणजे त्याच्या मावशी, काकाची. रोहन वय सात वर्ष. तो जेव्हा खूप लहान होता तेव्हा अशक्त होता. आजारी असायचा. डॉक्टर सारखे चालूच. आज ताप, उद्या सर्दी, परवा कसली तरी ऍलर्जी, यामुळे आईनं तळहाताच्या फोडासारखं जपलेलं. फार खेळू दिलं नाही, थंडी वाजेल म्हणून बाहेर जायचं नाही, खोकला होईल-गार खायचं नाही, असं सगळं खूप जपून जपून.

निमित्त ‘बापलेकी’चं

‘मायलेकी’ हा शब्द उच्चारताच एक घट्ट विणीचं, जवळिकीचं नातं असा अर्थ मनात आपोआपच उमटतो. तसं ‘बापलेकी’ हे नातं मात्र काहीसं उपेक्षित राहिलं आहे. त्याबद्दल फारसं कुठे लिहिलेलं, बोललेलं दिसत नाही. ‘बापलेकी’ या पुस्तकातून पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर आणि विद्या विद्वांस यांनी ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. यातील मुलींच्या आणि ‘बापां’च्या मनोगतांमधून या नात्याचे काही पैलू बघायला मिळाले.

त्सुनामी नंतर...

समुद्राच्या काठावर काही चिमुरडी,
वाळूचे घर बांधून घर घर खेळत होती.
घरात त्यांच्या....
बाबा होते, आई होती.
आबा होते, आजी होती.
तीन दगडांची चूल होती,
चार पाच बोळकी होती.

डोळ्यात त्यांच्या....
भविष्याच्या आशा होत्या,
आई-बाबांची स्वप्नं होती.

त्यांच्या अंगी....
गरुडाची भरारी होती,
आकाशाला गवसणी घालायची शक्ती होती.
पण... पण...

एका क्षणात त्यांची स्वप्ने धुळीला मिळाली.
एका त्सुनामी लाटेने,
त्सुनामी कसल्या कुनामी लाटेने,
त्यांची घरटी गिळंकृत केली.
ती बलवान मुलं निर्बल झाली.
हतबल झाली.

त्यांच्या डोळ्यात......
एक भकासपणा उरला होता.

बालपण

आम्ही सर्वसामान्य मध्यमवर्गीय पालक. जसे आम्ही वाढलो, बरेचसे तसेच मुलांना वाढवायचे असे बहुतेक आमच्या मनात असणार. आमच्यात विशेष मतभेद, चर्चा, वादविवाद न होता आमच्या मुली वाढत होत्या. आमच्या घरात सर्वांनाच- मागच्या पिढीपासून-वाचनाची आवड आहे. त्यामुळे फावला वेळ हा वाचनातच घालवायचा असतो अशी मुलींची धारणा झाली असावी. एकदा गंमत म्हणून मी विचारलेलं आठवतंय, ‘‘तुम्हाला आई (जेव्हा घरकाम करत नसते तेव्हा) कशी डोळ्यासमोर येते?’’ ‘‘वाचताना’’ ‘‘वाचत असलेली’’ ताबडतोब उत्तर आलं. मुलींना गोष्टी तर खूपच सांगितल्या. बाबा त्यांना इंग्रजी कादंबर्यांयच्या गोष्टी सांगत.

‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं? - लेखांक १

कमावत्या आईची दुहेरी जबाबदारी अजूनही चालूच आहे. एकीकडे घरकाम, बालसंगोपन व दुसरीकडे व्यावसायिक जबाबदार्याड ही तारेवरची कसरत बहुसंख्य स्त्रियांना करावी लागते.
या दुहेरी ओझ्यामागचे अनेक पदर उलगडून पाहिले तर असे दिसते की आपल्याकडे बाईला ‘आईपणामुळे’ (विशेषतः मुलाची आई बनल्यावर) सासरी मान्यता मिळते. त्यामुळे कमावतीलासुद्धा आईपणाकडे दुर्लक्ष करून चालत नाही.

एक अनुभव

आम्ही दोघे डॉक्टर (नेत्रतज्ञ) आहोत. आमच्या वेळा नऊ ते एक व चार ते आठ अशी ओ.पी.डी.ची वेळ. पण इतर वेळात ऑपरेशन्स/नेत्रदानाचा कॉल/लेक्चर्स/इमर्जन्सी असतात. तसेच शनि-रवि. बाहेर व्हिजिटस असतात. पण तरीही आम्ही हे एकाआडएक करतो, एकजण कायम घरात राहील हे बघतो. व हे शक्य होतं कारण आमचा विषय एक आहे. व ह्यासाठीच मी M.D. Gynaec असूनही त्याची प्रॅक्टीस न करता नेत्रतज्ञाची डिग्री घेऊन मग त्यातच प्रॅक्टीस करते आहे.

आम्हाला दोन मुलं आहेत. मोठी मुलगी आता वीस वर्षाची - मेडिकलला असते. औरंगाबादला होस्टेलवर राहाते. धाकटा मुलगा नववीत आहे.

मुलं आणि आपण अपेक्षा आणि हक्क

मूल हा पालकांच्या जीवनाचा अनन्यसाधारण घटक असतो. जन्माला आल्यापासून पुढे बराच काळ मूल स्वतःचे निर्णय घेण्यासाठी सक्षम नसतं. त्याच्या आहार-पोषण, मनोरंजन, आरोग्य आणि शिक्षण अशा सर्वच पातळ्यांवर पालकांना पुढं होऊन निर्णय घ्यावे लागतच असतात. पण एकेका टप्प्याला मूल मोठं व्हायला लागतं आणि स्वतःचा आवाज काढू लागतं.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या - पालकांसमोरील आव्हाने

गेले दोन-तीन महिने वर्तमानपत्रातून ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या’ सतत येत आहेत. त्या वाचून अनेक पालक चिंतित आहेत. या काळात दोन ठिकाणी या विषयावर तज्ज्ञ म्हणून आमंत्रण आले. तीनशेच्यावर पालक उपस्थित होते. ही आकडेवारी पालक वर्गाच्या चिंतेचे द्योतक आहे.

या प्रश्नामध्ये चार कळीचे मुद्दे आहेत -

आपला काय संबंध?

आपण आपल्या मुलाशी बोलतो आहोत.