News not found!

मानवी नाती

होते कुरूप वेडे....

Magazine Cover

प्रत्येकाच्या जवळ क्षमता-अक्षमतांचं एक आपापलं गाठोडं असतं. परिस्थितीनुसार ह्यातल्या काही अक्षमता संपतात, तशा काही क्षमता आपल्याला सोडूनही जातात. कुठल्याही आयुष्यात असं काही ना काही घडतच असतं. पण या सगळ्याहून महत्त्वाचं आहे ते आपलं आपल्या ह्या गाठोड्याकडे पाहणं, त्यातल्या कमतरतांचा अर्थ वेगळ्यानं समजावून घेणं.

माझ्या मेंदूत जन्मत: (म्हणे) असलेली एक गाठ वयाच्या पन्नासाव्या वर्षी ध्यानीमनी नसताना फुटली आणि त्या प्रकरणात अनेक शारीरिक प्रश्‍न निर्माण झाले. तोपर्यंत एकट्यानं पी.एच.डी.च्या संशोधनासाठी देशभर हिंडून येणार्‍या मला दोन पावलंही आपल्या जिवावर टाकता येईनाशी झाली. पुढे येणार्‍या माझ्या लेखाचा आणि ह्या घटनेचा खरं म्हणजे काहीही संबंध नाही. संबंध असेल तर इतकाच की अंथरुणावर पडून आढ्यावर अदृश्य अक्षरात लिहिलेला आपला भूतकाळ मला वाचता यायला लागला आणि त्याचा अर्थ लावत जाणं ही माझी सवय आणि गरज झाली.

मृत्यू आणि भीती (प्रश्न पालकांचे उत्तर शोधायाचे - लेखांक - ८)

माझा मुलगा सात-आठ वर्षांचा असताना आम्ही तिघं - मी, सृजन आणि त्याचा बाबा - गप्पा मारत बसलो होतो. कशावरून तरी ‘मरणा’चा विषय निघाला आणि आमच्या गप्पा एकदम वेगळ्याच दिशेला गेल्या.
‘‘आई, मरण म्हणजे काय ग?’’
‘‘म्हणजे... एखाद्याचं जिवंतपण संपून जाणं. आता बघ हं, सगळे प्राणी, पक्षी, झाडं हे हालचाल करतात, खातात, पितात, मोठे होतात, श्वास घेतात. पण काही काळानंतर हे सर्व बंद होतं. ते हालचाल करू शकत नाहीत, खाऊ पिऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांच्यातलं जिवंतपण संपून जातं.’’
कापर्याच आवाजात सृजन म्हणाला, ‘‘माणसं पण अशीच मरतात?’’
बाबा, ‘‘हो, जे जे काही जिवंत आहे ते काही काळानंतर असंच संपून जातं.’’

मंतरलेले दिवस

शाळेच्या दैनंदिनीनुसार शिक्षक त्यांच्या वर्गात बसले आहेत - त्यांचे विषय - इयत्तानुसार वर्ग ठरलेले आहेत आणि मुलांना मात्र स्वातंत्र्य आहे ‘आपण कुठल्या वर्गात किती वेळ बसायचं’ ! असं होऊ शकतं का? मुलांना अशी मोकळीक दिली तर ती अभ्यास निवडतील की नाही? अशा काही प्रश्नांची चर्चा होऊन राजगुरुनगरच्या खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित (K.T.E.S.) इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सहा दिवसांचा एक छोटा प्रयोग केला.

जे घडलं त्या विषयी

खूप वर्षांपूर्वी एका खेड्यात एक मूर* राहत होता, त्याला एकुलता एक मुलगा होता. हा तरुण मुलगा त्याच्या वडिलांइतकाच सालस, चांगला होता. पण दोघंही फार गरीब होते. त्या खेड्यात एक दुसरा मूर राहत होता. तो स्वभावानं चांगला होता, वर श्रीमंतही होता. त्याला एक मुलगी होती. मुलगी मात्र स्वभावानं या तरुण मुलाच्या अगदी विरुद्ध ! मुलगा विनयशील नम्र होता. त्याला चांगली रीतभात होती, मात्र ती असंस्कृत, उद्धट व दुष्ट स्वभावाची होती. कुणीही तिच्याशी लग्न करायला तयार नव्हतं.

मुलांची दुनिया

Magazine Cover

लेव वायगॉट्स्की यांनी १९३३ साली लिहिलेला ‘प्ले अँड इट्स रोल इन द मेंटल डेव्हलपमेंट ऑव्ह द चाइल्ड’ हा लेख संक्षिप्त रूपात आपल्यासमोर ठेवत आहोत. मुलाच्या बौद्धिक विकासामधे खेळाची भूमिका नेमकी काय असते हे या लेखात मांडलेलं आहे. गेल्या ऐंशी वर्षात या संदर्भात भरपूर काम झालं आहे, तरी हे मुद्दे आजही तितकेच महत्त्वाचे आहेत, त्यानंतर आलेल्या संशोधकांनीही वायगॉट्स्कींच्या संशोधनाला मूलभूत मानलेले आहे. शालापूर्व वयातल्या मुलांसाठी म्हणजे सहा वर्षांपर्यंतच्या मुलांसंदर्भातला खेळाचा विचार वायगॉट्स्की यांनी या लेखात केलेला आहे.

वायगॉट्स्की हे रशियन मानसशास्त्रज्ञ (१८९६-१९३४), त्यांनी साहित्य, भाषाशास्त्राचा अभ्यास केला आणि त्यात पी.एच्.डी. मिळवली. लवकरच त्यांनी मानसशास्त्र विषयात काम चालू केलं. या विषयानं त्यांना झपाटून टाकलं. या विषयावर त्यांनी भरपूर लिखाण केलेलं आहे. पण तत्कालिन सरकारच्या तत्त्वांविरोधी अशी ही मांडणी होती. त्यामुळे ती दडपली गेली. पियाजेंच्या समकालिन असूनही त्यांचं काम रशियाबाहेर माहीत व्हायला फार काळ गेला. त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांनादेखील मॉस्कोहून पळून जावं लागलं, त्यांच्याच मांडणीवर टीकाही करावी लागली.

खेळ आणि खेळच!

Magazine Cover

टेड संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या डॉ. स्टुअर्ट ब्राऊन यांच्या व्याख्यानातील काही भाग.

डॉ. स्टुअर्ट ब्राऊन हे मनोविकारतज्ज्ञ आहेत. तुरुंगातील काही कैद्यांसंदर्भात ते संशोधन करत होते. हे कैदी खून केल्यामुळे तिथे आले होते. या सर्व लोकांच्या कहाण्यांमधे त्यांना एक समान धागा दिसला: या सर्वांचं बालपण खेळाला पूर्णतः पारखं झालेलं होतं.

ही गोष्ट त्यांना फार वैशिष्ट्यपूर्ण वाटली. नंतर त्यांनी हजारो लोकांशी बोलून प्रत्येकाच्या जीवनातलं खेळाचं नातं तपासलं, नोंदवलं. तेव्हा भरपूर खेळायला मिळणं आणि आयुष्यात यशस्वी होणं यात गाढ संबंध आहे असं त्यांना दिसून आलं.

...न होता मनासारिखे दुःख मोठे

निसर्गदत्त देह आणि नितळ निरागस
मन घेऊन जगण्याच्या खेळात
आपला प्रवेश होतो.
मात्र पुढे हा खेळ...
खेळ राहत नाही.
असं का होतं?

n hota mana sarikhe.jpg

मुक्त अवकाश

अशोक वाजपेयी यांच्या 'What do we mean by open spaces' या विषयावरील व्याख्यानाचा गोषवारा –

mukta-avkash.jpg

मुक्त अवकाश - म्हणजे काय? कशाला म्हणता येईल मुक्त अवकाश? आपण जेव्हा मुक्त अवकाशाचा विचार करतो तेव्हा त्याचा अर्थ ‘रिकामी जागा’ असा अजिबात नाही. रिकामी जागा असा अर्थ जर धरला तर मग ती जागा मिळवण्याची आपल्याला इच्छा होणार, कसंही करून ती हडप करण्याची कामना आपल्या मनात निर्माण होणार... मुक्त अवकाशाचा संबंध खुलेपणाशी आहे. गैरवापराशी नाही.

वेदी - लेखांक - १

Magazine Cover
लेखकाविषयी थोडेसे.....

‘वेदी’ हे लहानपणातल्या आठवणींचं संकलन आहे. सुप्रसिद्ध लेखक वेद मेहता यांचं लहानपणचं लाडाचं नाव वेदी. वेदी पाच वर्षांचा सुद्धा नव्हता तेव्हा त्याला त्याच्या वडिलांनी लाहोरहून मुंबईला शिकायला पाठवलं. घरापासून तेराशे मैल लांब. वेगळं हवापाणी, वेगळी माणसं, वेगळी भाषा, वेगळे आवाज, वेगळे स्पर्श या सगळ्यांशी त्याला जुळवून घ्यावं लागलं. हे आवाज, स्पर्श महत्त्वाचे कारण वेदी अंध मुलगा होता. चवथ्या वर्षी त्याला मेनिनजायटिस झाला आणि त्यात त्याची दृष्टी गेली. त्याचे वडील डॉक्टर होते. इंग्लंडला राहून शिकून आलेले. वेदीनं इतर अंध माणसांसारखं दीनवाणं आयुष्य जगावं असं त्यांना वाटत नव्हतं. त्यांच्या इतर चार मुलांसारखाच वेदी आत्मनिर्भर असावा असं त्यांना वाटायचं. त्यांचा पत्र संपर्क झाला श्री. रासमोहन यांच्याशी. ते कुटुंबवत्सल बंगाली ख्रिश्चन होते. शिवाय अमेरिकेतील अंधशिक्षणसंस्थेतून शिकून आले होते. ते होते म्हणून वेदीच्या वडिलांनी - डॅडीजींनी दादर स्कूल फॉर ब्लाईंड ही शाळा त्याच्यासाठी निवडली. त्याच्या आईचा म्हणजे ममाजींचा विरोध होता तरी. ती शाळा कसली ! ते खरं म्हणजे अनाथ अंध मुलामुलींचं वसतिगृह होतं, जेमतेम सोयीसुविधा असलेलं. पण वेदीच्या वडिलांना त्याची खरीखुरी कल्पना आली नाही. आणि अंधांसाठी एवढ्या शाळा तरी भारतात होत्या कुठे! मुलाचं कल्याण व्हावं म्हणून त्यांनी मन घट्ट करून त्याला तिथे पाठवलं.
शाळेत सुरवातीला वेदी एकटा पडला. तो फक्त पंजाबी बोलायचा. बाकी सगळे मराठी बोलायचे आणि हेडमास्तरांनी तर त्याला इंग्रजी शिकवण्याचा चंगच बांधला होता. शिवाय त्याच्या आणि इतर मुलांच्या परिस्थितीत आणि वयातही खूप फरक होता. वेदी एक सुखवस्तू, सुसंस्कृत पंजाबी कुटुंबातला होता. त्यामुळे त्याचे कपडे चांगल्या प्रतीचे होते. तो पायात बूट घालायचा. त्याच्यासाठी झोपायला नरम गादी आणि पलंग होता. तो हेडमास्तरांबरोबर जेवणखाण करायचा. इतर मुलं तर रस्त्यावरून गोळा करून आणलेली गरीब अनाथ मुलं होती. वयानंही मोठी होती. वेदीला हे असं कुणाकडे तरी सांभाळायला पाठवून देणं म्हणजे विचित्रपणाचं वाटेल कदाचित. पण वेदी त्यातून खूप शिकला. आईवडिलांविना भावंडांविना राहणं, ओळखीच्या चवी, आवाज, वास यांच्याविना राहणं आणि इतरही खूप काही. सर्वसामान्य मुलं ज्या वयात स्वयंपूर्ण होऊ लागतात त्याच्या कितीतरी आधी, अंध वेदी स्वयंपूर्ण व्हायला शिकला. तो इंग्लिश ब्रेल वाचायला आणि लिहायला शिकला. बेरीज, वजाबाकी करायला शिकला. सगळी मुलं जे जे खेळ खेळतात ते शिकला. काही खेळांमध्ये मास्तरांनी अंधांना सोयीचे होतील असे बदल केले होते. तेही शिकला. या सगळ्यातून वेदी इतर मुलांशी जुळवून घ्यायला शिकला. पण सगळंच काही छान छान नव्हतं. आजारपणं होती. वसतीगृहात राहणारी सगळी मुलं करतात तशा पोरवयातल्या खोड्या, धाडसं आणि चुका होत्या. त्याचे परिणाम म्हणून हेडमास्तर किंवा ‘डोळस मास्तर’ म्हणजे वसतिगृहाचे प्रमुख, कडक शिक्षा करीत ती भोगावी लागे.
दुसरं महायुद्ध जोर धरणार असं वाटत असताना वेदी घरी परत गेला. शाळेत येताना जसा तो परिस्थितीचा बळी होता तसाच परत जातानाही होता. परंतु जे शिक्षण मिळालं त्यातूनच पुढे अर्थपूर्ण जीवनाची संधी चालून आली आणि वेदीनं ती हातची जाऊ दिली नाही.
‘वेदी’ हा वेद मेहतांच्या लहानपणातल्या सर्वसामान्य आठवणींचा संग्रह आहे. शोध घेण्याचा, परिस्थितीशी जुळवून घेण्याचा संघर्ष, लाड-प्रेम मिळवण्याचा प्रयत्न, खेळणं, स्वप्नं बघणं या सगळ्या सर्वसामान्यपणे बालपणात येणार्या अनुभवांची मालिका आहे. पण तसं पाहिलं तर वेदी पाचव्या वर्षीच मोठा झाला. सगळ्या मुलांबरोबर राहात असूनही वेगळं असणं म्हणजे काय ते त्याला शाळेत जाणवलं. आणि घरातल्यांबरोबर राहात असूनही वेगळं असणं म्हणजे काय ते तो घरात शिकला. या कथनात दोन आवाज सारखे जाणवतात. एक लहान मुलाचा आणि एक प्रौढ माणसाचा. जेव्हा मूल बोलतं तेव्हा गंभीर प्रसंग बालसुलभ आणि मजेशीर वाटतात. जेव्हा प्रौढ बोलतो तेव्हा साधे प्रसंगसुद्धा उदास, गंभीर वाटतात. मोठं झाल्यावर जुन्या आठवणींचा पुर्नविचार केलाय आणि वर्तमानकाळ, भूतकाळ यांचा सुरेख मिलाफ करत ही आत्मकथा प्रवाही भाषेत सांगितली आहे.
वेद मेहता यांचा जन्म १९३४ साली भारतात झाला. परंतु १९४९ सालापासून ते इंग्लंड, अमेरिकेत राहत आहेत. त्यांचं शिक्षण अमेरिकेत अरकानसॉ स्कूल फॉर ब्लाईड येथे झालं. त्यानंतर पोमोना कॉलेज, बलिओल कॉलेज, ऑक्सफर्ड, हार्वर्ड येथे पुढील उच्च शिक्षण झालं. १९७५ साली त्यांनी अमेरिकेचं नागरिकत्व घेतलं. १९५७ सालापासून ते अमेरिकन, ब्रिटिश आणि भारतीय प्रकाशनांसाठी लिहीत आहेत. १९५९ पासून ते ‘द न्यूयॉर्कर’ साठी लिहीत आहेत. त्यांना अनेक अभ्यासवृत्त्या आणि शिष्यवृत्त्या मिळाल्या आहेत. त्यांची आतापर्यंत अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातली काही आत्मचरित्रात्मक आहेत, काही परिचयातल्या व्यक्तींची शब्दचित्रं आहेत, काही भारतातल्या राजकीय-सामाजिक परिस्थितीबद्दलची आहेत. अशी विपुल ग्रंथसंपदा असलेल्या वेद मेहता यांची बालपणात मराठीशी झालेली तोंडओळख आणि त्या वेळच्या आठवणींचं कथन मराठी वाचकांना नक्की भावेल.

अनाथाश्रम

मला आगगाडीची शिट्टी चांगलीच आठवते. भसाभस वाफ सोडत वाजलेली शिट्टी. डॅडीजींनी माझे इवले हात त्यांच्या हातात घेऊन जोडले आणि निरोपाचा नमस्कार केला. मला उचललं आणि गाडीच्या डब्याच्या खिडकीतून प्रकाशदादाच्या ताब्यात दिलं. ‘‘तू आता मोठा माणूस झालास बरं का’’, ते म्हणाले. हे त्यांचं वाक्य म्हणजे माझ्या आठवणीची सुरुवात करून देणारं, एक खूप ठसठशीत महत्त्वाचं वाक्य. माझ्या नशिबाची रेघ असल्यासारखं ते वाक्य मला नंतरही खूप वेळा, पुन्हा पुन्हा आठवायचं. गाडी अगदी सुटणारचं होती तेवढ्यात प्रकाशदादानी मला खिडकीतून बाहेर वाकवलं. माझ्या आईला पटकन माझी पापी घेता यावी म्हणून.