News not found!

मानवी नाती

मुले आणि खेळ

काय खेळ चालवलाय लहान मुलासारखा,’ अशा प्रकारची उपहासगर्भ टीका आपण सर्रास ऐकतो. म्हणजे मुलांचे खेळबीळ एकदम निरुपयोगी किंवा खरं तर त्रासदायकच, अशी सर्वसाधारण रूढ कल्पना! पण मुलांच्या वाढीमधे खेळाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.

सांगड, कृती आणि विचारांची

प्राथमिक स्तरावरील विषय शिक्षणात प्रयोगशील राहण्यावर आम्ही सातत्याने भर दिला. द्वैमासिक बैठकीत प्रत्येक शिक्षकाने कोणकोणत्या नवनव्या गोष्टी, उपक्रम राबविले, त्यात कसकसे अनुभव आले? मुले, ग्रामस्थ या सर्वांचा त्यात पुढाकार होता का? ही सारी चर्चा होत असते. एकमेकांचे अनुभव तपासले जातात. त्यावर सखोल चर्चा होते. शिक्षकाने स्थितीवादी राहू नये, प्रत्येक विषय नव्याने हाताळावा, मुलांसमोर तो विषय खुलेपणाने मांडावा व मुलांनी तो विषय फुलवित जावे या पद्धतीने पुढे जाण्यावर भर देण्यात येतो. प्रयोगशीलता ही काही तांत्रिक स्वरूपाची किंवा प्रदर्शन मांडावयाची बाब नाही.

होमलेस टू हार्वर्ड

मी अमेरिकेत राहत असतानाची गोष्ट. अमेरिकेतील ABC (American Broadcasting Corporation) या दूरदर्शन वाहिनीवरील ‘ट्वेंटी - ट्वेंटी’ नावाचे वार्तापत्र दाखविले जाते. १९९९ साली 'From Homeless to Harvard' हा सत्यघटनेवरील कार्यक्रम पाहिला. ‘एलिझाबेथ मरे’ नावाच्या एका मुलीच्या आयुष्यातील हा प्रवास. मनाचा ठाव घेणारी, प्रेरणादायी अशी ही सत्य कहाणी नुसती पाहून विसरावी अशी नव्हतीच मुळी. ती कहाणी व त्या अनुषंगाने येणारे विचार, भावना लगेचच कागदावर उमटल्या. इतरांपर्यंत हा जीवन संघर्ष पोहचावा असे आवर्जून वाटले.

‘छात्र प्रबोधन’ व लोकसत्ताच्या ‘चतुरा’मधे माझा ‘होमलेस टू हार्वर्ड’ हा लेख प्रकाशित झाला आहे. मधल्या पाच वर्षांच्या काळात एलिझाबेथने नक्कीच अनेक नवीन गोष्टी केल्या असणार असा अंदाज होता. त्याचा शोध इन्टरनेटवरून घेतला. लिझचं आयुष्य नि विचार एवढे झपाटून टाकणारे आहेत की थोडक्यात का होईना पण ते आपल्यासमोर मांडावेत असा मोह पडल्याशिवाय राहात नाही.

प्रीती केतकर यांनी चतुरामधील माझ्या लेखातील मजकुराची निवड अतिशय नेमकी अशी केली आहे. संक्षिप्तात पण सर्व कहाणी आपल्यापर्यंत पोहचेल अशी ही मांडणी आपल्यासमोर ठेवत आहोत. मुळातील संपूर्ण लेखही आपल्याला पालकनीतीशी संपर्क साधला तर मिळू शकेल. काही वेबसाईट्स लेखाच्या शेवटी देत आहोत. तिथेही माहिती, फोटो, लिझच्या भाषणाची झलक, तिचे पुस्तक अशी माहिती मिळू शकते.

एलिझाबेथ, तिचे आईवडील आणि बहीण असं हे न्यूयॉर्कमधे राहणारं कुटुंब. आईवडील दोघंही व्यसनाधीन. व्यसनपूर्तीसाठी घरातल्या वाटेल त्या वस्तू विकणारे हे आईवडील पालक म्हणून मुलींच्या मूलभूत गरजाही पूर्ण करू शकत नव्हते किंवा त्यांची काळजीही घेऊ शकत नव्हते. एकदा त्यांनी मादक पदार्थ घेण्यासाठी एलिझाबेथचा स्वेटरच विकून टाकला. न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी स्वेटर ही प्राथमिक गरजेची वस्तू ठरते हे लक्षात घेतले म्हणजे तो विकण्यातला आईवडिलांचा निष्काळजीपणा आणि त्यामुळे मुलींची कशी आणि किती आबाळ होत होती याची तीव्रता लक्षात येते. पण त्याबद्दल एलिझाबेथच्या मनात जराही कटुता नाही. ‘व्यसनाधीनता हा रोग होता.

निलय

निलयचा जन्म २१ डिसेंबर १९८९चा. तो जन्मतःच अपंग आहे. स्नायूंमधील जन्मतःच असलेल्या व्यंगामुळे तो चालू शकत नाही. आधाराविना उभाही राहू शकत नाही. त्याची बुद्धीही सर्वसाधारण मुलांपेक्षा कमी आहे हे लक्षात आल्यावर शाळेत घालण्याआधी आम्ही त्याचा आय.क्यू. काढला. तेव्हा तो बॉर्डरलाईन-वरचा मतिमंद मुलगा असल्याचे समजले. आम्हाला मात्र अजूनही तो ‘शार्प’ आहे असेच वाटते. नॉर्मल शाळेत प्रयत्न केला पण प्रवेश मिळाला नाही. मग लार्क स्कूलमधे घातले. तिथे त्याची अभ्यासात बर्यापैकी प्रगती होत होती.

साहेबाच्या मुलाची गोष्ट

बाळू अतिशय सालस मुलगा ! अक्षर छान, कष्टाळू, हुशार, अतिशय प्रामाणिक. बाळूचे वडील लहानपणीच वारले. आईने त्याला शेतावर मजुरी करून वाढवला. एकुलत्या एका लेकाचं लग्न एवढीच म्हातारीची इच्छा. एकदा बाळूचे दोनाचे चार हात झाले आणि नातवंडाचं तोंड पाहिलं की म्हातारी डोळे मिटायला मोकळी.....

आणि पाणी वाहतं झालं...

शाळेव्यतिरिक्त कोणत्याही आस्थापनात (म्हणजे क्लास, ट्यूशन्स, इ.) शिकवणे म्हणजे लोकांना वाटते या व्यक्तीने चांगल्या तत्त्वांशी फारकत घेतली आहे.

मोठ्या आस्थापनांचे माहीत नाही परंतु माझ्या छोट्या क्लासमध्ये मर्यादित संख्येतील मुलांना शिकवणे हा खूप आनंददायी तर कधी कधी हृदयस्पर्शी अनुभव होता. मुलं, आईवडील, भावंडं या सार्यांृशी खूप जवळचा संबंध येत असे. मुलांच्या अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्या सवयी, वर्तणूक, वाचन, आरोग्य, आहार इत्यादीविषयी अनेक समस्यांवर सल्ले द्यायची वेळ खूपदा येई. त्यापैकीच ही एक घटना. २०-२५ वर्षांपूर्वीची.

'खेळघर' - माझा अनुभव

दोन वर्षांपाठीमागे पालकनीतीचा एक उपक्रम म्हणून खेळघर सुरू झालं. खेळघराची मुख्य जबाबदारी जरी मी घेतली, तरी संस्थेच्या पाठबळानंच ते शक्य झालं होतं. आनंददायी शिक्षणाचं, ताणविरहित वातावरणात प्रसन्नपणे फुलणार्या बाल्याचं स्वप्न कुठंतरी आम्ही सगळेच पाहात होतो.

बडबड गीतांच्या निमित्ताने...

‘मामाच्या घरी येऊन’ - ‘ज्या’
माझ्या मुलीनं ओळ पुरी केली.
‘तूप रोटी खाऊन’ - ‘ज्या’
‘तुपात पडली’ - ‘आजी!’

माशीच्या ऐवजी आजीला तुपात पाडून वर ही ही करून हसलीसुद्धा! आपण काहीतरी गंमत केली हे समजून सव्वा वर्षांच्या सूनृतानं मग बाबाला, नानांना, बाउईला (बाहुलीला) अशा अनेकांना तुपात पाडलं. तिला आवडेल अशा खेळाचा यातूनच शोध लागला. तिला माहीत असलेल्या गाण्यात, गाण्यातल्या शब्दाच्या जागी दुसराच शब्द घालायचा! (मला तर भाषाशास्त्राच्या तासाला ट्रान्सफॉर्मेशनल जनरेटिव ग्रामर शिकले, त्याचीच आठवण झाली.)