News not found!

लैंगिकता शिक्षण

बालकांची लैंगिक सुरक्षा : एक उपेक्षित प्रश्‍न

Magazine Cover

सप्रेम नमस्कार,

मला आपल्या सर्वांशी काही बोलायचं आहे. गेले काही दिवस मी एका विषयावर अभ्यास करते आहे. या अभ्यासात मला काय दिसलं, त्यातून काय सुचलं, ते मला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. पालकनीतीमधून गेली सव्वीस वर्षं सातत्यानं आपली गाठ पडते आहे, त्यामुळे त्याच वाटेनं आपल्यापर्यंत पोचायचा प्रयत्न मी करते आहे.

मूल - मुलगी नकोच

माझ्या दवाखान्यात आलेली ती बावीस वर्षांची मुलगी, खूप घाबरलेली होती. नुकतंच लग्न झालेलं होतं. मासिक पाळीचा त्रास होतो म्हणून नवरा तिला घेऊन आला होता.
तपासणीच्या खोलीत मी तिला तपासत होते, तेव्हा ती घाबरलेली वाटली. ‘‘डॉक्टर सब ठीक है ना? इस तकलीफ की वजहसे मुझे बच्चा नही होगा ऐसा तो नही?’’ मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, ‘‘आत्ता तर तू बावीस वर्षांची आहेस. रक्तस्राव थांबल्यानंतर आपण बघू काय करायचं ते, काही काळजी करू नकोस.’’

संवादकीय -मार्च २०१३

लैंगिक अत्याचार या विषयावर गेल्या दोन-तीन महिन्यांत अनेक ठिकाणी लिहून आलं, अनेकांचं म्हणणं माध्यमांनीही समोर आणलं. पण अजूनही या विषयावर एक किमान शहाणपण सामान्यपणे आलेलं नाही, असंच त्यातून स्पष्ट झालं. गुन्हेगाराला भीती वाटावी अशी शिक्षा द्या, पुरुषांना चळवणारे मुलींचे कपडे, उशिरापर्यंत घराबाहेर राहणं बंद करा, मुलींचीच काही प्रमाणात तरी चूक असतेच, असले मुद्दे आजही अगदी मोठमोठी म्हणावी अशी, देशाचा कारभार चालवणारी माणसंही मांडतात, तेव्हा आपला देश कधीच सुधारणार म्हणून नाही - अशी भीती, नव्हे, खात्रीच वाटू लागते.

संवादकीय - जानेवारी २०१३

‘निर्भया’ असं तिचं खरं नाव नव्हतं, एका माध्यमसंस्थेनं तिला दिलेलं ते नाव होतं. दिल्लीच्या भर रस्त्यावर फिरणार्याा बसमध्ये तिच्यावर अनेकांनी पाशवी बलात्कार केल्यापासून तिची गोष्ट सुरू झाली. तिच्यावर उपचार सुरू होते, पण त्यांना यश आलं नाही. त्या क्रूर नराधमांशी आणि पुढे मृत्यूशीही निर्भयपणे लढणारी निर्भया आता या जगात नाही.

मुलांच्या संगतीत

‘स्टाईल में रहनेका’ किंवा फटेला जेब सिल जाएगा जो चाहेगा मिल जायेगा’! या गाण्याच्या ओळी साठे कॉलनीतल्या लोकांच्या कानावर पडणं नवीन नाही. कारण या कॉलनीला लागून असलेल्या हिराबाग झोपडपट्टीतील मुलं दिवसभर इथल्या रस्त्यावर खेळत असतात. खेळताना मध्येच एखादं मूल हिटलिस्टवरील गाणं मोठ्यानं गात असतं.

दोन-दोन मुलांनी किंवा छोट्या छोट्या गटांनी रस्त्यावर खेळणं व गाणी म्हणणं नवीन नव्हतं. पण मधल्या काळामध्ये आठवड्यातून एक दिवस इथली बरीचशी मुलं एकत्र जमून गटाने खेळताना व गाताना दिसत होती. या ठिकाणी काय चाललं होतं बरं?

खिडकी दृष्टिकोन

दि. १९ फेब्रुवारी २००६ रोजी ‘मुस्कान’ ने एक कार्यशाळा आयोजित केली होती. ‘मुस्कान’ हे बाल लैंगिक अत्याचारासंबधी जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करणारं, पुण्यातील अभियान आहे. ही कार्यशाळा मुलांसोबत काम करणार्यांंसाठी तसेच समुपदेशक, शिक्षक यांच्याकरिता होती. या कार्यशाळेच्या माध्यमातून बाल लैंगिक अत्याचारांची व्याप्ती आणि मुलांवर होणारे परिणाम लक्षात घेता मुलांशी संवाद कसा साधायचा, मुलांकडून अत्याचाराची माहिती कशी मिळवायची, त्याचे स्वरूप आणि परिणाम कसे जाणून घ्यायचे, या तणावातून मुलांना मुक्त करण्यासाठी कशी आणि काय मदत करता येईल इ. मुद्यांबाबत चर्चा झाली. बेंगलोरमधील ‘निम्हान्स’ (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ऍन्ड न्युरोसायन्सेस) या संस्थेतील बालमनोविकारतज्ञ डॉ. शेखर शेषाद्री यांना यासाठी खास आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यशाळेबद्दल -

डॉ शेषाद्री यांनी मुलांना लैंगिकता शिक्षण देणे खूप महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. प्रत्यक्षात लैंगिकता या शब्दालाच खूप विरोध होत असतो. यासंदर्भातली माहिती देण्याबरोबर मुलांमध्ये आत्मविश्वास, धैर्य, आत्मभान निर्माण होईल यासाठीही प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच त्यांना ‘जीवन कौशल्यांचं’ शिक्षण देणं आवश्यक आहे असं ते मांडतात. यासाठी खिडकी दृष्टिकोन (window approach) या तंत्राची ओळख त्यांनी करून दिली. हा ‘खिडकी दृष्टिकोन’ नेमका काय आहे, कसा आहे - याची ओळख या लेखाद्वारे करून दिलेली आहे.

जीवन कौशल्य शिक्षण

आधीच सांगितलं असतं तर...

लहान मुलामुलींना बाल लैंगिक अत्याचाराबद्दल कसं सांगावं-हा एक अडचणीत टाकणारा प्रश्न. दिल्ली येथील जागोरी संस्था आणि बुक्स फॉर चेंज यांनी यासाठी एक सुंदर हिंदी पुस्तिका प्रकाशित केली आहे. काश-मुझे किसीने बताया होता!! त्याबद्दल -

बाल लैंगिक अत्याचारांचं प्रमाण खूप मोठं आहे. दहा पैकी सहा मुली आणि चार मुलगे यांना बाल लैंगिक अत्याचाराला तोंड द्यावं लागतं असं एक अभ्यास सांगतो. इतकं मोठं प्रमाण असूनही त्याबद्दल बोललं मात्र जात नाही. कधी तिनं/त्यानं सांगायचा प्रयत्न केलाच तर तिलाच गप्प बसवलं जातं. गुन्हेगार मात्र मोकळा - खुलेआम वावरतो. त्यामुळे त्या मुलांना स्वतःवरचे अत्याचार, स्वतःचे हे दुःखद अनुभव, वेदना स्वतःजवळच ठेवून कुढत त्या अनुभवाचे चरे आयुष्यभर स्वतःजवळ बाळगत जगावं लागतं.

‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं? - लेखांक २

मुलांची स्त्रियांबद्दलची मतं कोणत्या प्रकारची असतात, ती कशी तयार होतात, ती मोजायला कोणत्या चाचण्या वापरतात याचा आपण आधीच्या लेखात आढावा घेतला.

या लेखात मी लिंगभाव भूमिका (Gender Roles) या बद्दल लिहिणार आहे.