News not found!

शिक्षकांसाठी

बालभवन: बालकारणाचे पहिले पाऊल

‘बालकारण’ हा शब्द ताराबाई मोडक यांनी त्यांच्या कामाकडे लक्ष वेधताना आणि बालशिक्षणाविषयी जागृतीची चळवळ उभारताना वापरला, आणि आता बालह्क्काच्या सर्व प्रयत्नांना तो कवेत घेत आहे. बालविकास, बालरंजन, बालसाहित्य यांकडे प्रौढांनी एक जबाबदारी म्हणून बघायला पाहिजे, ही जाणीव गेल्या शतकात झालेल्या अनेक बदलांची परिणती आहे. औद्योगिक प्रगती, महानगरी समाज आणि आक्रसत गेलेला कुटुंबाचा आकार या सर्व गोष्टींचे परिणाम लक्षात येऊ लागल्यावर मुलांच्या खुरटणार्या विश्वाची बोच निर्माण झाली.

ऑगस्ट २०१६

Magazine Cover

बागकाम करणं, दुकानजत्रा, स्वैपाक करणं यासारख्या कृतींमधून शिकणारी काही मुलं

जुलै २०१६

Magazine Cover

शिक्षणक्षेत्रातील कसदार अनुभव असलेल्या लोकांकडून आपल्याला दृष्टी मिळावी, शिकायला मिळावे, आपल्या विचारांमध्ये अधिक स्पष्टता यावी, आपल्याच गटातील अनेकांच्या अनुभवांमधून शिकायला मिळावे, देवाणघेवाण-वादविवाद-चर्चा यातून आपण अधिक समृद्ध व्हावे. यासाठी अॅक्टिव्ह टिचर्स फोरमतर्फे 2014 पासून शिक्षण संमेलन आयोजित केले जाते.
यंदाचे संमेलन 8 आणि 9 मे 2016 रोजी संगमनेर येथील मालपाणी हेल्थ क्लबच्या अत्यंत रमणीय परिसरात संपन्न झाले. राज्यभरातून आलेले उत्साही, विचारी आणि प्रयोगशील शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ज्ञ, शिक्षक-प्रशिक्षक अशा मित्र-मैत्रीणींचा मेळाच तिथे जमला होता. हा अंक या शिक्षण संमेलनात झालेल्या सत्रांवर आधारित आहे. RTE आणि महाराष्ट्रातील सद्यस्थिती या विषयावरील गीता महाशब्दे, प्रल्हाद काठोले आणि राहुल गवारे यांचे लेख तसेच ‘भारतीय राज्यघटनेतील मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टीकोन’ या डॉ. विवेक माँटेरोंच्या सत्रावरील लेख जागेअभावी या अंकात घेऊ शकलो नाही. ते पुढील अंकांमध्ये आपल्याला वाचायला मिळतील.

ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट्स

भाषाशिक्षणाला माणसाच्या ‘आत’ नेणारे - नोम चोम्स्की
मुलं भाषा कशी शिकतात याबद्दलच्या स्किनर यांच्या वर्तनवादी मांडणीतील अनेक मूलभूत त्रुटी दाखवत त्यांच्या ग्रंथाची कठोर चिकित्सा करणारा दीर्घ लेख नोम चोम्स्कींनी 1959 साली म्हणजे वयाच्या 31 व्या वर्षी '‘लँग्वेज'’ या जर्नलमध्ये लिहिला. या लेखाने '‘भाषाशिक्षणक्षेत्रात किंवा तज्ज्ञांत खळबळ माजवली’' असं म्हणणं खूपच तोकडं ठरेल. हा लेख मुलांच्या भाषाग्रहणाच्या नव्या सिद्धांतनाची सुरुवात ठरला. एखाद्या पुस्तकाच्या परीक्षणातून, चिकित्सेतून काय घडू शकतं आणि नव्या कल्पना कशा आकाराला येऊ शकतात याचा वस्तुपाठ म्हणजे चोम्स्कींचा हा समीक्षणात्मक निबंध!

इराकमधल्या युद्धाबद्धल एक व्यक्ती जॉर्ज बुशला थेट जबाबदार धरते. तीच व्यक्ती शस्त्रास्त्र उत्पादन आणि जागतिक अशांतता यांचा सहसंबंध जगाला समजावून सांगते. माध्यमं केवळ समाजाला माहिती पुरवण्यासाठी नसून भांडवली जग आणि जागतिक युद्धखोरीसाठी सर्वसंमती निर्माण करणारी यंत्रणा आहेत (manufacturing consent) असं सोदाहरण दाखवते. मध्यपूर्वेतल्या आणि दक्षिण आशियातल्या युद्धोत्तर विस्थापनासाठी आपल्या देशाला म्हणजे अमेरिकेला (United States of America) जबाबदार धरते आणि त्याविषयी अत्यंत स्पष्ट शब्दांत सरकारचा निषेध करते. ही व्यक्ती गेली साडेपाच दशकं हे काम अव्याहतपणे करते आहे.

जून २०१६

Magazine Cover

गायन-वादन व चित्रकला हा प्राथमिक शाळेतील अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींना क्वेस्टच्या सक्षम या कार्यक्रमांतर्गत युनिसेफच्या सहकार्याने गेली चार वर्ष या विषयांचे पद्धतशीर शिक्षण दिले गेले. यासाठी शाळेतील कला शिक्षक व कला क्षेत्रातील काही तज्ज्ञ यांनी एकत्रित काम केले. मुलांच्या चित्रकलेच्या शिक्षणाचे नियोजन कसे करावे याची छोटेखानी शिक्षक-हस्तपुस्तिका या कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात येत आहे. त्यातले काही वर्ग आणि मुलींनी केलेल्या कला-कामाचे हे काही नमुने...

मे २०१६

Magazine Cover

शिक्षकांच्या अनेक कामांपैकी एक महत्त्वाचे काम संवादकर्त्याचे असते. मुलांशी प्रभावीरीतीने संवाद साधण्यासाठी विविध नाट्य-तंत्रांचे प्रशिक्षण क्वेस्टच्या ‘तारपा’ या उपक्रमांतर्गत शिक्षकांना दिले जाते. यात प्रभावी अभिवाचन, बालसाहित्याचे नाट्य-रुपांतर, बाहुली-नाटक, मुखवटा-नाटक असे विविध उपक्रम शिक्षकांना शिकवले जातात. वर्गात शिकवताना या तंत्रांचा मोठा फायदा होतो.

एप्रिल २०१६

Magazine Cover

आदिवासी मुलांपर्यंत बालसाहित्य पोहोचावे यासाठी क्वेस्टतर्फे पुस्तकगाडी हा उपक्रम केला जातो. मुलांची साक्षरता दृढ होण्यामध्ये बालपुस्तकांचे मोठे योगदान असते असे अलीकडील संशोधन दाखवते. या गाडीबरोबर चार प्रशिक्षित व्यक्तीही जातात व त्या मुलांसोबत पुस्तकांशी संबंधित विविध खेळ, उपक्रम करतात. आठवड्यातून एकदा येणाऱ्या गाडीची मुले आतुरतेने वाट पाहत असतात.