News not found!

शिस्त

कुटुंबसभा

सकारात्मक शिस्त - लेखांक ६ - वर्गसभा

सकारात्मक शिस्तीच्या पद्धतींमध्ये परस्पर आदर, विश्‍वास आणि समजुतीनं होणार्‍या संवादाला फार महत्त्व आहे. शाळांमध्ये शिक्षकांनीमुलांशी संवाद साधणं अनेक कारणांमुळे आव्हानात्मक बनतं. मुलांची संख्या, अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं दडपण, तास आणि उपक्रमांची घट्ट चाकोरी अशी अनेक कारणं सांगता येतील. त्यातलं नियंत्रक-नियंत्रित असं नातं या संवादामध्ये सर्वात मोठा अडथळा निर्माण करतं.

सकारात्मक शिस्त - लेखांक - ५

प्रोत्साहन

‘‘मी लहान आहे, मला तुम्ही आपलं म्हणायला हवं आहे!’’ असं एखादं लहान मूल आपल्याला सांगू शकेल का? पण ‘मुलाचं बेशिस्त वागणं’ हीच गोष्ट तुम्हाला त्याच्या खास भाषेत सांगत असतं. बर्‍याच मोठ्या माणसांना ही गुप्त भाषा समजत नाही. बेशिस्तीच्या वाटेनं तुमच्याजवळ येऊ इच्छिणार्‍या मुलांसाठी प्रोत्साहनाची सर्वाधिक गरज असते. ड्रकर्सच्या मते ‘प्रोत्साहन देता येणं’ हे सकारात्मक शिस्तीच्या पद्धतींमधलं सर्वात महत्त्वाचं कौशल्य आहे. मात्र स्वत:च्या रागातून बाहेर पडून बेशिस्त वागणार्‍या मुलाला प्रोत्साहन देणं ही सोपी गोष्ट नाही. हे कसं साधायचं हेच आपल्याला या प्रकरणात समजावून घ्यायचं आहे.

सकारात्मक शिस्त - उपायांच्या दिशेनं...

मुलांच्या हातून काही चूक झाली आणि त्यामुळे त्यांचं स्वतःचं किंवा इतरांचं काही नुकसान झालं की अर्थातच मोठ्या माणसांना राग येतो. त्यांच्या मनात आणि अनेकदा तोंडातूनही प्रतिक्रिया उमटतात...
‘केली आहेस ना चूक... भोग आता आपल्या कर्माची फळं !’

‘आता अजिबात पांघरूण घालू नका तिच्या चुकांवर, नाहीतर आणखी बेजबाबदार बनेल ती !’

‘निस्तरणार कोण आता हा घोळ !’

‘बेशिस्तीकडे’ बघण्याचा नवा दृष्टिकोण

‘क्रेमर व्हर्सेस क्रेमर’ या सिनेमातलं एक दृश्य मला आठवतंय. पाच-सहा वर्षांचा सिद् हा पराकोटीच्या संतापानं बाबांवर ओरडत असतो, ‘‘वाईट्ट आहात तुम्ही! मला खूप राग येतो तुमचा.’’ वडील त्याला फरपटत त्याच्या खोलीकडे नेतात, रागारागानं पलंगावर ढकलतात आणि ओरडतात, ‘‘चूप! मूखा, किती त्रास देशील अरे!’’

सकारात्मक शिस्त - मार्च २०१४

मुलांनी आनंदात रहावं आणि जबाबदारीनं वागायला शिकावं यासाठी सकारात्मक शिस्तीच्या पद्धतींबद्दल या लेखमालेतून आपण जाणून घेत आहोत. या पद्धतींचा आपल्याला खर्‍या अर्थानं उपयोग व्हावा म्हणून मानवी वर्तनासंदर्भातल्या काही

मूलभूत गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. मुलांशी कसं वागायचं, ह्याचबरोबर मुलांशी तसं का वागायचं आणि मुळात मुलं बेशिस्त का वागतात हे समजून घेणं फार आवश्यक आहे.
मुलांचं सहकार्य :

सकारात्मक शिस्त

मुलांना शिस्त नेमकी कशी लावायची, मुलांच्या वर्तनात बदल कसा घडवून आणायचा-या विषयावरचे ‘जेन नेल्सन’ यांचे ‘सकारात्मक शिस्त’ हे पुस्तक हाती आले. अतिशय स्पष्ट, नेमकी आणि मुद्देसूद मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्यक्ष व्यवहारातल्या अनेक छोट्या छोट्या उदाहरणांतून सकारात्मक शिस्तीची पद्धत जेन उलगडून दाखवतात.
पालकनीतीच्या वाचकांसाठी पुढील अंकापासून या पुस्तकाचे संक्षिप्त रूपांतर लेखमालेच्या स्वरूपात देत आहोत. या विषयाची थोडक्यात ओळख या लेखात करून घेऊ या-

‘‘किती वेळा सांगितलं तरी मुलं ऐकतच नाहीत हो!’’ हे वाक्य आपण सर्वांनीच अनेकदा ऐकलं असेल, अनुभवलंही असेल. पालक-शिक्षकांकडून सातत्यानं ऐकू येणारी ही तक्रार आहे !

मुलांना आता मारता येणार नाही

‘तुम्हाला मुलांसाठी एक गोष्ट करायची असेल, तर त्यांना मारणे सोडून द्या...’ गिजुभाई बधेका अगदी मोजक्या आणि नेमक्या शब्दात फार मोलाचं पालक-तत्त्व सांगून गेलेत. पण आपल्याला ते ऐकूही आलेलं नाही की जाणवलेलंही नाही. आमच्या इथले शिक्षक तर म्हणतात, प्राथमिक शाळेत आता नापास करायचं नाही, शिक्षाही करायच्या नाहीत, तर मग आम्ही मुलांवर दाब ठेवायचा तरी कसा आणि मग ती मुलं शिकणार तरी कशी? मुलांनी आनंदानं आवडीनं शिकावं ही शक्यता शिक्षकांना मान्यच नाही. परीक्षेची, शिक्षेची, अपमानांची भिती दाखवून आपल्याला जे काही हवं आहे ते शिकवायचं, वागायला लावायचं अशी शिक्षकांना सवय झालेली आहे.

अभ्यासात मागे

‘‘अहो हा फक्त दोन विषयात पास आहे! तेही काठावर!’’ बोलताना आईचा चेहरा लाल झाला होता. आवाजात किंचित थरथर होती. उद्वेग शब्दाशब्दात उमटला होता. शेजारी बारा वर्षाचा मुलगा. त्यालाही कमी गुणांची बोच जराशी जाणवत होती. मान खाली आणि नजरही खाली वळलेली होती. बोटं टेबलक्लॉथशी चाळा करत होती, त्यातूनही मनाची अस्वस्थता जाणवत होती.

महिन्यापूर्वी केलेल्या चाचणीत त्याचं बुद्धिमापन केलं होतं. बुद्धिगुणांक सरासरीपेक्षा किंचित वरचाच निघाला होता. सुविधांबद्दल म्हणावं तर म्हणू ती सुविधा पुरविणारं घर. शाळाही शहरातली नामांकित.