News not found!

श्रम

श्रमाधारित शिक्षण

ऑगस्ट २०१६

Magazine Cover

बागकाम करणं, दुकानजत्रा, स्वैपाक करणं यासारख्या कृतींमधून शिकणारी काही मुलं

पडद्यावरचे बालमजूर

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. टी.व्ही. वर एक नाचाचा कार्यक्रम सुरु होता. एक चिमुरडा मुलगा अतिशय लवचीकपणे सुंदर नाच करीत होता. त्याचा नाच झाल्यावर स्टेजवरील मान्यवरांनी त्याला प्रश्न केला की तुला नाचाची प्रेरणा कशी मिळाली आणि इथ पर्यंतचा प्रवास कसा केला. त्यावेळी त्या चिमुरड्याने जे उत्तर दिले ते ऐकून स्टेजवर बसलेल्या जरा संवेदनशील मंडळींनी डोक्यालाच हात लावला. त्याने सांगितले जोवर मी दिवसातून दोन-दोन तासांची तीन वेळा प्रक्टिस करीत नाही तोवर माझी आई मला जेवायला देत नाही. त्यावर त्याच्या आईची प्रतिक्रिया तर अजूनच असंवेदनशील होती.

परंपराजन्य श्रमघृणा आणि श्रमप्रतिष्ठा


किशोर दरक हे शिक्षणशास्त्राचे अभ्यासक व चिकित्सक आहेत. अनेक संशोधन प्रबंधांबरोबरच विविध वृत्तपत्रे व मासिकांमधूनही त्यांनी शिक्षण व समाजशास्त्र या विषयांवर लेखन केले आहे. शिक्षणाचे सांस्कृतिक राजकारण, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके यांच्या अभ्यासात त्यांना विशेष रस आहे. भारत ज्ञान विज्ञान समुदायासोबत त्यांनी एक दशकाहून अधिक काळ शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

‘अरे, तुझी बायको/आई घरात नाहीये? मग तू जेवायचं काय करतोस?” भारतीय मध्यमवर्गीय समुदायात कुठल्याही पुरुषाला कधीही विचारला जाणारा प्रश्न. त्यामागं काही गृहितकं- एक म्हणजे स्वयंपाक हे स्त्रियांचं जन्मसिद्ध काम आहे (हे फक्त काम आहे, कौशल्य किंवा ज्ञान नाही), दुसरं म्हणजे हे काम पुरुषांनी करायचं नसतं, तिसरं म्हणजे हे काम ते करू शकत नाहीत, चौथं म्हणजे स्त्रीवर्गाच्या अनुपस्थितीत क्वचित प्रसंगी हे काम करायला हरकत नाही (कुणाची?), इत्यादी इत्यादी. यादी अजूनही लांबवता येईल (नव्हे, ती तशी आहेच.) पण यामागचं सर्वात महत्त्वाचं सूत्र म्हणजे श्रमांचा अनादर.

श्रम हाच जीवनाचा स्रोत

समताधिष्ठित समाजाचे स्वप्न भारतीय राज्यघटनेने पाहिले आणि हजारो वर्षांची विषमता गाडून वर्गहीन, जाती-वर्णहीन मानवी समाज घडवण्यासाठी घटनाकारांनी राज्यघटना देशाकडे सुपूर्द केली. घटनेच्या आधाराने भारतीय समाजातील उच्च-नीचता, स्पृश्य-अस्पृश्यता, जाती-पोटजाती नष्ट करून समाजव्यवस्था समान पातळीवर आणण्याचे प्रयत्न झाले. परंतु आजही ते सफल होऊ शकले नाहीत. सिंधू आणि गंगा नदी खोऱ्यातील मूळ अनार्य रहिवासी आज वेगवेगळ्या जाती – जमातींमध्ये विखुरले आहेत. ते मूलतः सुसंस्कृत, शांतताप्रिय, शेती करणारे, धरणे बांधणारे, स्थापत्यविशारद, गोपालक, शेतकरी व कारागीर होते.