News not found!

सामाजिक पालकत्व

मॉमी!!!

Magazine Cover

मॉडर्न फॅमिली या मालिकेतलं कॅमरिन आणि मिचेल हे एक गे जोडपं- मिच आणि कॅम. लिली ही त्यांची व्हिएतनामीज दत्तक मुलगी. आज दोघांनी लिलीच्या डॉक्टर बाईंना घरी जेवायला बोलावलंय. गप्पा चालू असताना दीडेक वर्षांची छोटी लिली डॉक्टर बाईंकडे पाहून तिचा आयुष्यातला पहिला शब्द उच्चारते- ‘मॉमी’! (मिचच्या शब्दांत सांगायचं तर- Every gay father’s worst nightmare!) मिच आणि कॅमच्या पायाखालची जमीनच सरकते.

MOMI.jpg

आम्हालाही ग्रामसभेत आमचे मुद्दे मांडायचेत...

नागरिक शास्त्राचा तास होता. ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांचे कामकाज हा विषय चालू होता. त्या अनुषंगाने ‘आपले सरपंच कोण आहेत? ग्रामसेवक कोण आहेत? ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोण कोण गेले आहे? ग्रामसभा कोणी पाहिलीये?’ अशा अनेक प्रश्‍नांची चर्चा सुरू झाली. सरपंचाचे नाव बर्‍याच मुलांना माहिती होते. काही थोड्या जणांना ग्रामसेवक कोण आहे हे माहिती होते. परंतु ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कोणीच गेलेले नव्हते, ग्रामसभा पाहिलेली नव्हती. नागरिकशास्त्र शिकवायचे तर पुस्तकात अडकलेल्या माहितीला आधी मुक्त करायला हवे. आणि या माहितीसह मुलांना प्रत्यक्षाच्या अंगणात घेऊन जायला हवे.

सत्तांतरासाठी ‘फिरणारं चाक’

Magazine Cover

मार्च २००६ मध्ये केंद्र सरकारनं केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये ओ.बी.सी. प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना २७% आरक्षण देण्याची घोषणा केली. ओ.बी.सी. आरक्षण लागू झालं तर आपला ‘उच्चशिक्षणाचा हक्क’ हिरावून घेतला जाईल, आपण बेरोजगार होऊ या भावनेतून उच्चजातीय तरुणांनी निदर्शनं सुरू केली होती. या निदर्शनांचा एक भाग म्हणून या तरुणांनी रस्त्यांवर उतरून रस्ते झाडणं, गाड्या पुसणं, बूट पॉलिश करणं, भाज्या विकणं अशी ‘हलकी’ कामं सुरू केली होती. या ‘आंदोलनाला’ तेव्हाच्या माध्यमांनी -(तुलनेनं कमी आक्रमक, पण स्वभावतः ब्राह्मणी) - भरपूर प्रसिद्धी दिली.

सकारात्मक शिस्त - उपायांच्या दिशेनं...

मुलांच्या हातून काही चूक झाली आणि त्यामुळे त्यांचं स्वतःचं किंवा इतरांचं काही नुकसान झालं की अर्थातच मोठ्या माणसांना राग येतो. त्यांच्या मनात आणि अनेकदा तोंडातूनही प्रतिक्रिया उमटतात...
‘केली आहेस ना चूक... भोग आता आपल्या कर्माची फळं !’

‘आता अजिबात पांघरूण घालू नका तिच्या चुकांवर, नाहीतर आणखी बेजबाबदार बनेल ती !’

‘निस्तरणार कोण आता हा घोळ !’

रसिका : एक प्रकाश-शलाका

ताम्हिणी घाटाच्या सुरुवातीला, मुख्य रस्त्याला लागूनच १२-१५ झोपड्यांचा एक समूह दिसतो. हा ताम्हिणी गावाचाच पण गावापासून अलग असा कातकरी पाडा. छोट्या छोट्या कुडाच्या, शेणामातीनं सारवलेल्या झोपड्या, जमतील तशा, जागा मिळेल तिथे बांधलेल्या. पाड्यावर पाणी, शौचालयं, वीज अशा मूलभूत सुविधांचंही नाव नाही. काम न मिळालेली किंवा न करू शकणारी मोठी माणसं डोक्याला हात लावून पाड्यावर विमनस्क बसलेली दिसतात आणि लहान मुलं दिसेल त्या वस्तूशी खेळताना दिसतात.

आदिवासी संस्कृती जपण्यासाठी...

प्रमोद गोवारीची ओळख करून देताना मला विशेष आनंद होतो आहे. मी २००७ पासून पालघर भागातल्या ‘आदिवासी सहज शिक्षण परिवार’ या संस्थेचं काम करू लागले. त्यावेळी संस्थेच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून प्रमोदशी माझी ओळख झाली.

अदिती-अपूर्वा, तुम्ही कमाल आहात !!

विचार करणारी मुले

मळलेल्या वाटेनं, यशाच्या-प्रतिष्ठेच्या चाकोर्‍यांनी आखलेल्या वाटेनं बहुतेक जण जाताना दिसतात. काही जण मात्र वेगळ्याच दिशेनं, रस्त्यानं जायला निघतात आणि सरळ चालू पडतात. आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी पहातात, समाजाचे, परिस्थितीतले प्रश्न समजावून घेतात. त्यांना उत्तरंही शोधतात. त्यांचं हे शोध घेणं, त्यासाठी धडपड करणं, बघताना आपण चकित होतो. अशी काही वेगळी तरुण मुलंमुली आम्हाला दिसली. ही सगळीजणं वीशी ते तीशीच्या आतबाहेरचीच आहेत. त्यांच्या विचारांकडे, करत असलेल्या कामांकडे, जीवनदृष्टीकडे बघताना अंधारलेल्या भविष्याच्या आशंकेनं काहीसं धास्तावलेलं आपलं मन उचल खातं. कदाचित काही बरं घडेलही, असा दिलासा या मुलांच्या अस्तित्वानं मिळून जातो.
वेगवेगळी कौटुंबिक, आर्थिक-सामाजिक, शैक्षणिक पार्श्वभूमी असणारी ही मुलंमुली ‘आयुष्य अर्थपूर्ण करण्यासाठी’ धडपडत आहेत. देशाच्या कानाकोपर्‍यात, उत्तरांच्या शोधात निघालेली, त्यासाठी धडपडणारी अशी कितीतरी तरूणमंडळी असणार. त्यातला हा केवळ एक नमुना आहे. आम्हाला भेटलेली, परिचयातली असल्यानं त्यांची ओळख आम्हाला अधिक विश्वासानं करून देता येते आहे इतकंच.

या मुलामुलींना सगळं जग समजलंय, गवसलंय असा आमचा दावा नाही, त्यांचा तर नाहीच नाही. मात्र आपल्याला नेमकं काय वाटतंय, पुढे काय करायचंय याचा अंदाज घेण्याइतकी त्या वाटेवर ती सरावली आहेत. एक साम्य मात्र वैविध्यांना मागं सारून ठळकपणे समोर दिसतं, ते म्हणजे, या सगळ्यांच्या घरातून त्यांना पाठिंबा आहे. घराच्या, पालकांच्या सोबतीमुळे निर्णय घेणं, वाट चालणं सोपं झालं असलं तरी ती वाट चालण्याचा निर्णय मुलांचा स्वत:चाच आहे.

या अंकात अशा काही मुलामुलींची ओळख वाचकांशी करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

अदिती तीन वषार्ची असल्यापासून आणि अपूर्वाच्या जन्मापासून मी त्यांना जवळून पाहिलंय. पंचविशीच्या आसपासच्या या दोघी बहिणी पुण्याजवळ सिंहगड रस्त्यावरच्या सणसवाडी गावात, डोंगरपायथ्याजवळ गेली तीन वर्षं शेतीचे प्रयोग करतायत. प्रत्येक ऋतूमध्ये होणार्‍या बदलांचं आणि त्यामुळे जमिनीवर होणार्‍या परिणामांचं निरीक्षण करत, हळूहळू जमिनीची मशागत करतायत आणि जमीन घडवताना स्वतःही घडतायत. तिथंच त्यांनी स्वतः कष्ट करून हातांनी घरही बांधलंय.
अदिती-अपूर्वाची शेती करण्याची तळमळ, त्यांना त्यातून मिळणारा आनंद, त्यासाठी पडतील ते शारीरिक कष्ट घ्यायची तयारी, त्यांचा साधेपणा आणि सच्चेपणा शब्दात पकडता येणं फारच कठीण आहे.

‘खेळघर’ कादंबरीबद्दल

‘खेळघर’ ही आजच्या काळातली कादंबरी आहे. लेखक रवीन्द्र रु. पं. यांची ही पहिलीच कादंबरी आहे. कौतुकाची बाब अशी की तिला दोन-तीन महत्त्वाचे म्हणावेत असे पुरस्कारही मिळालेले आहेत. या लेखकानं आजवर कथादेखील लिहिलेल्या नाहीत. लिहिले आहेत ते वैचारिक-सामाजिक लेख, वैज्ञानिक नियतकालिकांमधील संशोधनात्मक लेख किंवा अनुवाद इत्यादि. ते संपादक आहेत, शिवाय त्यांचा हिंदी चित्रपटसंगीताचाही अभ्यास आहे.

लीलावती भागवत : मराठी बालसाहित्याच्या जगातलं एक वेधक नाव

वयाच्या ९४व्या वर्षापर्यंत समृद्ध जीवन साजरं करून, गेल्या नोव्हेंबरमध्ये लीलावती भागवत गेल्या. लहान मुलांसाठी लेखन करणार्‍यांमध्ये त्यांचं नाव विशेष आदरानं घेतलं जातंच, पण त्यापलीकडेही त्यांचं सदैव कार्यरत जीवन लक्षवेधी आहे.