News not found!

स्त्री-पुरुष समानता

जुलै २०१६

Magazine Cover

शिक्षणक्षेत्रातील कसदार अनुभव असलेल्या लोकांकडून आपल्याला दृष्टी मिळावी, शिकायला मिळावे, आपल्या विचारांमध्ये अधिक स्पष्टता यावी, आपल्याच गटातील अनेकांच्या अनुभवांमधून शिकायला मिळावे, देवाणघेवाण-वादविवाद-चर्चा यातून आपण अधिक समृद्ध व्हावे. यासाठी अॅक्टिव्ह टिचर्स फोरमतर्फे 2014 पासून शिक्षण संमेलन आयोजित केले जाते.
यंदाचे संमेलन 8 आणि 9 मे 2016 रोजी संगमनेर येथील मालपाणी हेल्थ क्लबच्या अत्यंत रमणीय परिसरात संपन्न झाले. राज्यभरातून आलेले उत्साही, विचारी आणि प्रयोगशील शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ज्ञ, शिक्षक-प्रशिक्षक अशा मित्र-मैत्रीणींचा मेळाच तिथे जमला होता. हा अंक या शिक्षण संमेलनात झालेल्या सत्रांवर आधारित आहे. RTE आणि महाराष्ट्रातील सद्यस्थिती या विषयावरील गीता महाशब्दे, प्रल्हाद काठोले आणि राहुल गवारे यांचे लेख तसेच ‘भारतीय राज्यघटनेतील मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टीकोन’ या डॉ. विवेक माँटेरोंच्या सत्रावरील लेख जागेअभावी या अंकात घेऊ शकलो नाही. ते पुढील अंकांमध्ये आपल्याला वाचायला मिळतील.

परंपराजन्य श्रमघृणा आणि श्रमप्रतिष्ठा


किशोर दरक हे शिक्षणशास्त्राचे अभ्यासक व चिकित्सक आहेत. अनेक संशोधन प्रबंधांबरोबरच विविध वृत्तपत्रे व मासिकांमधूनही त्यांनी शिक्षण व समाजशास्त्र या विषयांवर लेखन केले आहे. शिक्षणाचे सांस्कृतिक राजकारण, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके यांच्या अभ्यासात त्यांना विशेष रस आहे. भारत ज्ञान विज्ञान समुदायासोबत त्यांनी एक दशकाहून अधिक काळ शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

‘अरे, तुझी बायको/आई घरात नाहीये? मग तू जेवायचं काय करतोस?” भारतीय मध्यमवर्गीय समुदायात कुठल्याही पुरुषाला कधीही विचारला जाणारा प्रश्न. त्यामागं काही गृहितकं- एक म्हणजे स्वयंपाक हे स्त्रियांचं जन्मसिद्ध काम आहे (हे फक्त काम आहे, कौशल्य किंवा ज्ञान नाही), दुसरं म्हणजे हे काम पुरुषांनी करायचं नसतं, तिसरं म्हणजे हे काम ते करू शकत नाहीत, चौथं म्हणजे स्त्रीवर्गाच्या अनुपस्थितीत क्वचित प्रसंगी हे काम करायला हरकत नाही (कुणाची?), इत्यादी इत्यादी. यादी अजूनही लांबवता येईल (नव्हे, ती तशी आहेच.) पण यामागचं सर्वात महत्त्वाचं सूत्र म्हणजे श्रमांचा अनादर.

मॉमी!!!

Magazine Cover

मॉडर्न फॅमिली या मालिकेतलं कॅमरिन आणि मिचेल हे एक गे जोडपं- मिच आणि कॅम. लिली ही त्यांची व्हिएतनामीज दत्तक मुलगी. आज दोघांनी लिलीच्या डॉक्टर बाईंना घरी जेवायला बोलावलंय. गप्पा चालू असताना दीडेक वर्षांची छोटी लिली डॉक्टर बाईंकडे पाहून तिचा आयुष्यातला पहिला शब्द उच्चारते- ‘मॉमी’! (मिचच्या शब्दांत सांगायचं तर- Every gay father’s worst nightmare!) मिच आणि कॅमच्या पायाखालची जमीनच सरकते.

MOMI.jpg

शिकतं घर आणि बाबा

‘घर शाळेत आणि शाळा घरात शिरली पाहिजे. आई–बाबांनी शिक्षक आणि शिक्षकांनी आई–बाबा बनलं पाहिजे,’ हा विनोबांचा शिक्षणविषयक विचार मला खूप आवडतो. शिक्षण अर्थपूर्ण आणि आनंददायी बनवण्यासाठी हे खूपच उपयुक्त ठरू शकतं. माझे आई–बाबा दोघंही शाळेत शिक्षक होते. पालक म्हणून भूमिका बजावताना त्यांच्यातलं शिक्षकपण घरीसुद्धा जागं असायचं हे मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे.

ओ.बी.आर.च्या नंतर...

Magazine Cover

१४ फेब्रुवारी ! वन बिलीयन रायझिंग (ओ.बी.आर.)चा दिवस ! महिलांवर होणार्या अत्याचारांचा विरोध करण्यासाठी या दिवशी जगभरातून दोनशे देशातील कोट्यवधी लोक रस्त्यावर आले, नाचले, गायले, मिरवणुका काढल्या !! घरकामगार, बचतगटातल्या महिला, महाविद्यालयीन युवक, स्त्री चळवळीतल्या कार्यकर्त्या, चित्र, नाटय, कला, इ. क्षेत्रांतील मान्यवर, सर्वसामान्य नागरिक मोठया संख्येनं आणि उत्साहानं या मोहिमेत सामील झाले. हिंसेचा अनुभव घेतलेल्या प्रत्येकीला, तिच्या हिंसेविरुद्धच्या लढयात साथ द्यायला जगात आणखी एक तरी व्यक्ती तिच्या पाठीशी उभी आहे हा विश्वास देण्यासाठी !

मूल - मुलगी नकोच

माझ्या दवाखान्यात आलेली ती बावीस वर्षांची मुलगी, खूप घाबरलेली होती. नुकतंच लग्न झालेलं होतं. मासिक पाळीचा त्रास होतो म्हणून नवरा तिला घेऊन आला होता.
तपासणीच्या खोलीत मी तिला तपासत होते, तेव्हा ती घाबरलेली वाटली. ‘‘डॉक्टर सब ठीक है ना? इस तकलीफ की वजहसे मुझे बच्चा नही होगा ऐसा तो नही?’’ मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, ‘‘आत्ता तर तू बावीस वर्षांची आहेस. रक्तस्राव थांबल्यानंतर आपण बघू काय करायचं ते, काही काळजी करू नकोस.’’

उन्मेषांची अब्जावधी

Magazine Cover

संयुक्त राष्ट्राचा अहवाल म्हणतो, जगात दर तीन स्त्रियांपैकी एकीला आयुष्यात एकदा तरी लैंगिक अत्याचाराचा, हिंसेचा अनुभव येतो. (भारताबाबत बोलायचं तर बाई म्हणून आयुष्यात एकदाही कोणत्याही प्रकारचा हिंसेचा अनुभव आला नाही, अशी बाई सापडणंच दुर्मिळ) जन्माला यायचा अधिकार नाकारण्यापासून ते जन्माला आलीच तर तिला स्थूल, सूक्ष्म, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अशा अनंत भेदभावांना, हेळसांडीला, अत्याचारांना तोंड द्यावं लागतं, केवळ ती बाई आहे म्हणून.

संवादकीय - जानेवारी २०१३

‘निर्भया’ असं तिचं खरं नाव नव्हतं, एका माध्यमसंस्थेनं तिला दिलेलं ते नाव होतं. दिल्लीच्या भर रस्त्यावर फिरणार्याा बसमध्ये तिच्यावर अनेकांनी पाशवी बलात्कार केल्यापासून तिची गोष्ट सुरू झाली. तिच्यावर उपचार सुरू होते, पण त्यांना यश आलं नाही. त्या क्रूर नराधमांशी आणि पुढे मृत्यूशीही निर्भयपणे लढणारी निर्भया आता या जगात नाही.

संवादकीय - जुलै २०१२

मुलीचा गर्भ असला तर तो पाडून टाकण्याच्या प्रवृत्तीवर हल्ला चढवणारा एक कार्यक्रम टी.व्ही. वर चालू असताना माझ्या नऊ वर्षाच्या मुलीनं विचारलं, ‘‘...म्हणजे काय?’’ तिला कसं उत्तर द्यावं या विचारानं मीच गोंधळून गेले होते. लोकांना फक्त मुलगा हवा असतो... मुलगी नको असते... म्हणून मग आईच्या पोटात असतानाच... एकेक शब्द उच्चारताना माझ्या पोटात गोळा येत होता. मुलगी असेल तर बाळाचा जन्मच होऊ देत नाहीत या उत्तरानं तीही हबकली होती.

‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ? - सप्टेंबर २००५

गेल्या सप्टेंबरमधे सुरू झालेल्या या लेखमालेचा हा शेवटचा भाग. तरुण मध्यमवर्गीय मुलगे स्त्रियांबद्दल, आईबद्दल आणि पुढे भावी जोडीदाराबद्दल काय विचार करतात? त्यामध्ये ‘कमावतेपणा’ने फरक पडतो का? पुढच्या आयुष्यात जोडीदार-गृहस्थ-बाप या भूमिकांबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? या सर्वच विषयांबद्दल मुलग्यांशी झालेल्या चर्चेतून सापडलेले निष्कर्ष आपण वाचले. आपली गृहीतं तपासून, त्यामधे योग्य बदल घडवण्यासाठी या लेखमालेचा निश्चित उपयोग झाला, होईल. डॉ. साधना नातूंचे मनःपूर्वक आभार.
- संपादक

तरुण मुलांवरचे संशोधन व त्यांच्या मुलाखती घ्यायच्या असे ठरवले तेव्हा एक साचेबद्ध मत ऐकायला मिळाले - ‘‘मुलगे फार विचारपूर्वक, पारदर्शकतेने, दीड तास घालवून प्रश्नावली भरणार नाहीत.’’ माझा अनुभव मात्र त्याला खोडून काढणारा होता! मुलगे आणि मुली दोघंही त्यांच्यापर्यंत पोचेल अशा तर्हेळने सांगितल्यावर ऐकायला, चर्चा करायला तयार असतात.