News not found!

१२ वर्षांपुढील मुलांच्या पालकांसाठी

एप्रिल २०१६

Magazine Cover

आदिवासी मुलांपर्यंत बालसाहित्य पोहोचावे यासाठी क्वेस्टतर्फे पुस्तकगाडी हा उपक्रम केला जातो. मुलांची साक्षरता दृढ होण्यामध्ये बालपुस्तकांचे मोठे योगदान असते असे अलीकडील संशोधन दाखवते. या गाडीबरोबर चार प्रशिक्षित व्यक्तीही जातात व त्या मुलांसोबत पुस्तकांशी संबंधित विविध खेळ, उपक्रम करतात. आठवड्यातून एकदा येणाऱ्या गाडीची मुले आतुरतेने वाट पाहत असतात.

मॉमी!!!

Magazine Cover

मॉडर्न फॅमिली या मालिकेतलं कॅमरिन आणि मिचेल हे एक गे जोडपं- मिच आणि कॅम. लिली ही त्यांची व्हिएतनामीज दत्तक मुलगी. आज दोघांनी लिलीच्या डॉक्टर बाईंना घरी जेवायला बोलावलंय. गप्पा चालू असताना दीडेक वर्षांची छोटी लिली डॉक्टर बाईंकडे पाहून तिचा आयुष्यातला पहिला शब्द उच्चारते- ‘मॉमी’! (मिचच्या शब्दांत सांगायचं तर- Every gay father’s worst nightmare!) मिच आणि कॅमच्या पायाखालची जमीनच सरकते.

MOMI.jpg

‘बेशिस्तीकडे’ बघण्याचा नवा दृष्टिकोण

‘क्रेमर व्हर्सेस क्रेमर’ या सिनेमातलं एक दृश्य मला आठवतंय. पाच-सहा वर्षांचा सिद् हा पराकोटीच्या संतापानं बाबांवर ओरडत असतो, ‘‘वाईट्ट आहात तुम्ही! मला खूप राग येतो तुमचा.’’ वडील त्याला फरपटत त्याच्या खोलीकडे नेतात, रागारागानं पलंगावर ढकलतात आणि ओरडतात, ‘‘चूप! मूखा, किती त्रास देशील अरे!’’

‘सांगा माझ्या बापानं नाही केला पेरा, तर तुम्ही काय खाल धत्तुरा?’

‘उसाच्या भाववाढीसाठी शेतकरी रस्त्यावर.’ अशी बातमी वर्तमानपत्रात छापून आली होती. शाळेच्या परिपाठात आम्ही ती वाचली. बातमीवर चर्चा सुरू झाली. मुलं मतं मांडू लागली. ‘‘शेतकर्‍यांला भावासाठी आंदोलन का बरं करावं लागतं?’’ एकानं मधेच प्रश्‍न विचारला. मुलांच्या प्रश्‍नांना, शंकांना आधी मुलांनीच उत्तरं द्यायची असा एक नियम आम्ही आखून घेतलेला आहे. त्याप्रमाणे मुलांनीच प्रश्‍नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा होता.

सकारात्मक शिस्त - फेब्रुवारी २०१४

मुलांचं बेशिस्त वागणं, सातत्यानं उलटून बोलणं, न ऐकणं अनेकदा पालकांना सहन होत नाही. यांना शिस्त लावण्यासाठी करायचं तरी काय? अशा अस्वस्थेतनं ते अगदी त्रस्त होऊन जातात. अशा वेळी अनेकदा, ‘‘आमच्या वेळी नव्हतं असं, त्या काळातला आज्ञाधारकपणा आता कुठं गेला?’’ असा त्यांना प्रश्‍न पडतो. बालपणी वडिलांकडे मान वर करून बघायची टाप नसलेल्या पालकांना आजच्या मुलांचे प्रतिप्रश्‍न, विरोध, मनमानी वागणं समजू शकत नाही.

सकारात्मक शिस्त

मुलांना शिस्त नेमकी कशी लावायची, मुलांच्या वर्तनात बदल कसा घडवून आणायचा-या विषयावरचे ‘जेन नेल्सन’ यांचे ‘सकारात्मक शिस्त’ हे पुस्तक हाती आले. अतिशय स्पष्ट, नेमकी आणि मुद्देसूद मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्यक्ष व्यवहारातल्या अनेक छोट्या छोट्या उदाहरणांतून सकारात्मक शिस्तीची पद्धत जेन उलगडून दाखवतात.
पालकनीतीच्या वाचकांसाठी पुढील अंकापासून या पुस्तकाचे संक्षिप्त रूपांतर लेखमालेच्या स्वरूपात देत आहोत. या विषयाची थोडक्यात ओळख या लेखात करून घेऊ या-

‘‘किती वेळा सांगितलं तरी मुलं ऐकतच नाहीत हो!’’ हे वाक्य आपण सर्वांनीच अनेकदा ऐकलं असेल, अनुभवलंही असेल. पालक-शिक्षकांकडून सातत्यानं ऐकू येणारी ही तक्रार आहे !

मर्यादांच्या अंगणात वाढताना

नुकतंच ‘मर्यादांच्या अंगणात वाढताना’ या सुजाता आणि अरुण लोहकरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात झालं. विशेष म्हणजे ब्रेलमधल्या या पुस्तकाचं प्रकाशनही याच समारंभात झालं. ‘निवांत’नंच ते ब्रेलमध्ये करून दिलेलं आहे. सईला- आपल्या मतिमंद मुलीला चांगल्या प्रकारे वाढवण्याचं आव्हान त्यांनी डोळसपणानं स्वीकारलं. धडपडत, पण निश्‍चयपूर्वक; माणसाच्या चांगुलपणावर विश्‍वास ठेवत, विवेकाची कास धरत, सईच्या आणि स्वत:च्याही आयुष्यात आनंद पेरत त्यांनी ते समर्थपणे पेललं. त्याची अंतर्मुख करणारी कहाणी म्हणजे हे पुस्तक आहे. सुजाता गेली अनेक वर्षं पालकनीतीची मैत्रीण आहे. अनेकदा तिचं लेखन आपण वाचलेलं आहे. संपादनातही तिनं अनेकदा मोलाचं सहकार्य केलेलं आहे.
सुजाता-अरुणच्या पुस्तकाचा हा एरवी असतो तसा पुस्तक-परिचय नाही. हे पुस्तक वाचताना पालकनीती गटातल्या मैत्रिणी-मित्रांना जाणवलेल्या काही विशेष मुद्यांविषयी त्यांनी जे मांडलं ते एकत्र करून इथं देत आहोत. ‘साधना व्हिलेज’ या अशाच मर्यादांच्या अंगणात वाढणार्‍या, शरीरवयानं प्रौढ पण तरीही मनाबुद्धीनं बालक असणार्‍यांसाठी असलेल्या संस्थेच्या वसंत देशपांडेसरांनी उत्स्फूर्तपणे लिहिलेल्या प्रतिक्रियेचाही यात अंतर्भाव आहे. सहपथिक, सहसंवेदक या नात्यानं त्यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेला विशेष मोल आहे.

सुजाता व अरुण यांनी त्यांची ‘विशेष’ मुलगी सई हिला वाढवताना परिस्थितीशी ज्या असाधारण धैर्यानं लढा दिला, त्याची ही संवेदनशील कहाणी आहे. भावनेच्या भरात वाहून न जाता केलेलं , तरीही मन हेलावून टाकणारं आणि मुख्यतः कोणताही आडपडदा न ठेवता केलेलं हे कथन आहे. सईचं स्वास्थ्य, सुयोग्य संगोपन आणि विकास हे दोघांच्याही आयुष्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. सुजाता शिक्षण-अधिकारी तर अरुण पत्रकार आहेत. दोघांची कामं चाकोरीबद्ध नव्हेत. तिथली आव्हानं पेलत असतानाही त्यांनी जीवनाचं हे उद्दिष्ट जराही नजरेआड होऊ दिलं नाही.

पालकत्वाचा परीघ विस्तारताना

Magazine Cover

सत्तरचं दशक होतं. १९७२ साली भीषण दुष्काळ पडलेला होता. त्याचे ग्रामीण समाजाला बसणारे चटके वृत्तपत्रांतून आमच्यापर्यंत पोचत होते. आणि मन अस्वस्थ होत होतं. सांगली जिल्ह्यातला रामापूर, कमलापूर, बलवडी, खानापूर हा भाग म्हणजे पर्जन्यछायेतला प्रदेश. त्यामुळे तो कायमचा दुष्काळी भाग. पण ७२ च्या दुष्काळानं लोकांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. जगणं मुष्कील केलं होतं. त्यावेळी मी सांगलीतल्या विलिंग्डन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालेलो होतो. दुष्काळाचं वास्तव माझ्या फार जवळ होतं.