News not found!

निवडक लेख

मुले आणि आपण
मुलं झाली म्हणजे आपल्या जगण्यात काय फरक पडतो?
घर सर्वांचं
मुलं लहानाची मोठी होत असतात त्या सुरुवातीच्या काळात मुलं आणि पालक यांच्यातले संबंध खूपसे एकेरी स्वरूपाचे असतात. पालकांनी सूचना द्यायच्या, त्या मुलांनी ऐकायच्या; पालकांनी नियम करायचे ते मुलांनी पाळायचे. हा सगळा प्रवास एका बाजूचाच असतो. मुलांनी आईवडिलांचं ऐकलं नाही, नियमांचं पालन केलं नाही तर वेगवेगळ्या प्रमाणात शिक्षा दिल्या जातात. चांगलं वागल्याबद्दल, काही विशेष करून दाखवल्याबद्दल कौतुक होतं. बक्षिसं दिली जातात. पण या सर्वामध्ये परस्परसंबंध अशी काही स्थिती अस्तित्वात नसते.
मातृत्व
जरा उशीरच झालाय् - पण विचार करतोय् आम्ही मूल व्हावं असा - तू काय म्हणशील?’’ माझ्या घशात काही अडकलं. तिच्याकडे बघत म्हटलं, ‘‘आयुष्य खूपच बदलतं - एवढंच म्हणेन मी’’ ‘‘माहितीय् मला. रात्रीची जाग्रणं - सुट्ट्या - सहलींना राम राम’’ खरं तर हे मला म्हणायचं नव्हतं. अजिबात नाही. तिला सांगायचं होतं वेगळंच काही. जे मूल झाल्यावरच कळतं आईला - शिकवता येत नाही. शरीर फाडून मुलाला जगात आणतानाच्या वेदना - भरून येतात लगेचच. पण आई होणं म्हणजेच घायाळ होणं कायमचं! हळव्या मनाचं ओझं बाळगत जीव सतत धास्तावून घेणं. वर्तमानपत्रातल्या प्रत्येक बातमीचा संबंध आपल्याच मुलाशी जोडणं.
अडीच अक्षरांची पालकनीती!
"ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय|’’ असे आपण संत कबीरांच्या वाणीचे उद्गार सहज उद्धृत करतो. पण या अडीच अक्षराच्या वाचनाचा मेळ कबीरांनी पंडित होण्याशी का आणि कसा जोडला याचा खरे तर दरवेळी वेगळा शोध घेणे शक्य आहे असे लक्षात येते. पालकनीतीपुरता विचार केला तर प्रेमातून ज्ञान हा प्रवास या नात्यात अगदी खात्रीचा मार्ग आहे. पण प्रेम ‘पढणे’ म्हणजे काय हे उमगलेले नसेल तर या मार्गावरून चालता येत नाही. कवि पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’
व्यक्तिमत्त्व विकास?
(....) व्यक्तिमत्त्व विकासाचे फार विकृत पैलू सध्या दिसायला लागलेत. समोरच्या माणसावर आपली छाप पडणं, कोणत्याही प्रश्नाला न बिचकता चटपटीत उत्तर देता येणं, अस्खलित (?) इंग्लिश बोलता येणं, कुठेही बुजायला न होणं, कोणत्याही मर्यादा (inhibitions) नसणं म्हणजे चांगलं व्यक्तिमत्त्व अशी समजूत होते आहे. स्वतःकडे पाहायचं ते इतरांच्याच डोळ्यांनी! त्यांना आपण कसे दिसतो ते महत्त्वाचं. आपलं आपण कधी आपल्या आत डोकावून पाहायचंच नाही. हे कुठलं शिक्षण आहे? का हा दिखाऊपणा, उथळपणा मुलांच्या माथी मारायचा?
समानतेचा गोंधळ
दुसरी मुलगी झाल्याबरोबर त्यांनी ऑफिसमध्ये मोठ्ठाले पेढे वाटले. पेढे छानच होते. पण ते देतानाची त्यांची पुस्ती मला खटकली. कमालीच्या औदार्याच्या आवेशात ते वरचेवर सांगत राहिले, ‘‘आम्ही मुलगामुलगी असा फरक करीत नाही ना, म्हणून हे पेढे.’’
शोध
डेव्हिड ससूनमधील मुलांच्या सहवासातून एक वेगळं जग माझ्यापुढे उलगडलं गेलं. या जगाची मला किंचितही कल्पना नव्हती, किंबहुना अशी एखादी दुनिया अस्तित्वात असते याविषयी जाणीवच नव्हती मुळी. पण ‘गुन्हेगारीची दुनिया’ म्हणून जगानं हिणवलेलं हे विश्व किती विलक्षण आहे याचं कणभर दर्शन डेव्हिड ससूनमधील मुलांच्या माध्यमातून झालं आणि मी अक्षरशः हादरून गेले.
भूमिका
एखादी कल्पना मनात उपजते तेव्हा त्याचं तात्कालिक असं एखादं कारण असतं आणि ही विचारांची वाटचाल मात्र फार आधीपासून सुरू होती असं लक्षात येतं. गर्दीच्या रस्त्यावरून हातातल्या जड पिशव्या सावरत जाणारं ७-८ वर्षांचं पोर. चेहर्यावर समजूतदार मोठेपणा, गरिबीनं शिकवलेला. हातातली जड पिशवी भारानं काहीशी फाटते, आतले तांदूळ बाहेर सांडू लागतात. मुलगा थांबतो. तांदूळ न सांडवता पिशवी नेता येईल का, प्रयत्न करतो. ते जमत नाही. गर्दी त्याला डावी-उजवी घालून पुढं सटकते. तत्त्व म्हणून ‘मदत करणं’ हे सर्वांना मान्यच आहे, पण कुणी केली नाही. बरोबरच्यांना विचारलं, तर म्हणाले, ‘लक्षातच आलं नाही.’ किंवा -
प्रज्ञांचे सप्तक
शिक्षणाचा एक हेतू क्षमता-विकसन हा असावा हे अनेकांनी मांडलेले आहे. क्षमता असते आणि ती विकसित होते, होऊ शकते यावर विश्वास ठेवणे फारसे अवघड नाही. अजूनही काहींची ‘मूल म्हणजे मातीचा गोळा किंवा संगणक’ आणि ‘आकार देऊ तसे किंवा डाटा भरू त्याप्रमाणे व्यक्तिमत्त्व तयार होते’ अशी कल्पना आहे. तर काहींचा संपूर्ण विश्वास ‘मूल आपल्यासोबत खास काही घेऊन येते, तेच व्यक्त होते’ असा आहे.
भय इथले संपत नाही... (संवादकीय) - जानेवारी २००७
अनुष्का-सहा वर्षांची चिमुरडी एका लग्नासाठी परगावी येते आणि लग्नाच्या कोलाहलात तिनं मारलेली आर्त किंकाळी कुणाला ऐकूही येत नाही. लग्नघरातल्याच एका खोलीत तिच्यावर बलात्कार होतो. चिमुकली योनी वेडीवाकडी फाटते. नंतर दोनतासांनी रक्ताच्या थारोळ्यात सापडलेली लेक उचलून वडील धावत सुटतात, अर्ध्या रात्री तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. जवळच्या नात्यातल्याच माणसानं हे केल्याचं एव्हाना कळतं. पण तो माणूस सामाजिक नातेसंबंधांच्या वजनकाट्यावर भारी आहे, त्यामुळे कुणी काही बोलायचं नाही. अनुष्काचे वडील अगतिक हरलेल्या चेहर्यानं डॉक्टरांचे पाय धरत ‘‘कुणाला सांगू नका’’ अशी विनवणी करतात.