‘निवडक पालकनीती’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा –
‘निवडक पालकनीती’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा –
‘पालकनीती’ मासिकात १९८७ पासून २०१४ पर्यंतच्या काळात प्रसिध्द झालेल्या
काही पथदर्शी लेखांचे संकलन सिद्ध झाले आहे. ज्योत्स्ना प्रकाशनाने ‘निवडक पालकनीती’चे हे दोन खंड प्रकाशित केले आहेत. २९ एप्रिल २०२३ रोजी अक्षरनंदन शाळेत पार पडलेल्या या कार्यक्रमात नव्या पिढीतील चार शिक्षणकर्मीसह ‘ शिक्षा, स्पर्धा आणि धर्म याबाबत मुलांशी वागताना आपले नेमके धोरण काय असावे?’ या विषयावर चर्चा झाली. नंतर पालकनीती परिवारच्या खेळघराबद्दल नुकतीच तयार झालेली चित्रफीतही दाखवली गेली.
भरपूर प्रमाणात मित्र परिवार या कार्यक्रमाला उपस्थित होता . ‘निवडक पालकनीती’च्या या पुस्तक-संचाला चांगला प्रतिसाद लाभला….या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…… https://youtu.be/aPW1e7swpHQ