पालकनीती परिवार संस्थेची भूमिका

आपण ज्या काळात असतो, जगतो, वाढतो त्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिघात सजगपणे पालकत्व निभावणं हे सोपं काम नाही. त्यासाठी वैयक्तिक पालकत्वासोबतच सामाजिक पालकत्वाचा विचारदेखील  महत्त्वाचा ठरतो.

अर्थात, त्यात घडोघडी मर्यादा जाणवतात, योग्यायोग्यतेचा निर्णय करणं अवघड होतं. मात्र हा कुणा एकाचा प्रश्न नाही. सभोवतालच्या घटनांकडे उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या सर्वांना ह्या परिस्थितीची जाणीव होतच असते. ह्यासाठी ह्या काळात वैयक्तिक तसेच सामाजिक पालकत्व निभावणार्‍या सर्वांशी जोडून घ्यावे, म्हणजे प्रश्नांची समज विस्तारेल, उत्तरांच्या दिशा नजरेत येतील ही ‘पालकनीती’ या विचारधारेमागची कल्पना आहे.

पालकनीती परिवार या संस्थेची  ‘पालकनीती’ हे मासिकपत्र आणि ‘खेळघर’ हा वंचित मुलां-मुलींच्या शिक्षणाला वाहिलेला प्रकल्प अशी  दोन कामे सुरू आहेत.

पूर्वी ‘माहितीघर’ हे पालकत्वाबद्दलचे वाचनालय चालवले जात होते, तसेच संस्थेच्या वतीने ‘कृतज्ञता’ आणि ‘प्रोत्साहन’ असे वार्षिक पुरस्कार दिले जात असत.  हे दोन्ही प्रकल्प आता थांबवण्यात आलेले आहेत. ‘संदर्भ’ नावाचे द्वैमासिकही सुरू करण्यात आले होते. त्यासाठी आता ‘संदर्भ’ ही वेगळी संस्था स्थापन करून त्या संस्थेला हे द्वैमासिक चालवायला दिले आहे.

पालकनीती मासिक

पालकनीती

पालकत्वाला वाहिलेले मासिक.

२६ जानेवारी १९८७ रोजी पालकत्वाबाबत समाजजाणिवा सजग करणारे, त्या संवादात सर्वांना सामील करून घेणारे मासिकपत्र, ‘पालकनीती’ सुरू झाले. पालकत्वाबद्दलच्या सर्व विषयांना या मासिकात स्थान असते. गेली ३७ वर्षे एकही अंक न गाळता ‘पालकनीती’ प्रकाशित होत आहे. पहिल्या चार वर्षांनंतर मोठा दिवाळी अंक प्रसिद्ध व्हायला लागला. बालकारणातल्या शक्य त्या सर्व विषयांवर मासिकामध्ये लेख छापले जातात.

३७ वर्षे

अखंड कार्यरत

४०७

मासिक अंक

२५५० +

लेख​

१५

पुस्तके प्रकाशित

खेळघर उपक्रम

खेळघर

प्रत्येक मुलाला आपण होऊन, आनंदाने शिकण्याची संधी मिळावी’, हे आपणा सर्वांचेच स्वप्न आहे. ‘खेळघर’ ही या दिशेने काम करणारी एक अर्थपूर्ण रचना आहे.

२०२४ पर्यंत :

खेळघराचे लक्ष्मीनगरमधील १६२ माजी विद्यार्थी सन्मानाचे जीवन जगत आहेत.

कार्यकर्त्यांची १२७ प्रशिक्षणे पूर्ण झाली.

१८६० कार्यकर्त्यांबरोबर काम केले.

खेळघर

१९९६ साली पालकनीती मासिकाच्या कामाच्या पायावरच ‘ खेळघर’ हा उपक्रम सुरू झाला. पुण्यातील, कोथरूडमधील  लक्ष्मीनगर या झोपडवस्तीतील मुलांना आनंददायक बालपण मिळावे, त्यांना आनंदाने शिकता यावे, मोकळेपणाने व्यक्त होता यावे यासाठी खेळघर प्रयत्न करते. परिस्थितीने निर्माण केलेले अडथळे दूर करून या मुलांना शिकण्यासाठी मोकळे अवकाश मिळवून देणे हे खेळघराचे ध्येय आहे.

खेळघरातील आनंदाने  शिकण्याची अनुभूती इतरही वंचित मुलां-मुलींपर्यंत पोचावी म्हणून २००७ पासून खेळघर इतर संस्थांमधील कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाचे कामदेखील करते.

'खेळघर' म्हणजे काय?

‘खेळघर’ या नावामागेही एक विचार आहे. मुलांच्या दुनियेत ‘खेळ’ ह्या गोष्टीला वेगळेच महत्त्व आहे. लहान वयात मुलांसाठी जग समजून घेण्याचे ‘खेळ’ हे एक माध्यम आहे. खेळघरात खेळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलांना आवडणारी दुसरी जागा म्हणजे ‘घर’. घरांतून मिळणाऱ्या प्रेम, आधार, संगोपन, सुरक्षितता यांची मुलांना खूप आवश्यकता असते. अशा मुलांना अत्यंत आवडणाऱ्या दोन गोष्टींपासून ‘खेळघर’ हे नाव बनले आहे..

२५ वर्षे

​प्रकल्प कार्यरत

३४८०+

मुलांसोबत प्रत्यक्ष काम

८०,०००+

मुलांबरोबर प्रत्यक्ष तास

४०

विस्तार खेळघरे

१९८७

पालकनीती मासिकाची सुरुवात

१९९६

पालकनीती परिवार ह्या न्यासाची स्थापना

१९९६

खेळघर हा वस्तीतल्या मुलांसाठीचा प्रकल्प सुरु

१९९९

शैक्षणिक संदर्भ ह्या द्वैमासिकाची सुरुवात

२००७

‘नवी खेळघरे सुरू व्हावीत म्हणून…’ प्रकल्पाची सुरुवात

२००८

पालकनीती मासिकाला महाराष्ट्र फौंडेशन चा पुरस्कार

२०१५

‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने…’ या खेळघर मॅन्युअलचे प्रकाशन

२०१५-१६

प्रगत शिक्षण संस्था आणि क्वेस्ट या संस्थेने  प्रत्येकी एक एक वर्ष पालकनीतीचे अंक काढले.

२०१८

पालकनीती मासिकाच्या संपादक मंडळात तरुण मंडळींनी भाग घेतला.
पालकत्व ह्या विषयाच्या कक्षा बदलत्या आहेत. काळ जसा बदलतो, पुढे जातो तशी पालकत्वाची जाणीवही. यासाठी हा बदल पालकनीतीने केला, तरुणाईनेही तो स्वीकारला.

२०२३

‘ निवडक पालकनीती’ पालकनीतीत आलेल्या लेखांपैकी निवडक लेखांचे दोन खंड प्रकाशित झालेले आहेत. २९ एप्रिल २०२३ रोजी  हे प्रकाशन झाले.