पालकनीती परिवारातर्फे काही प्रकाशने नियमितपणे केली जातात तर काही प्रकाशने ही त्या-त्या वेळी महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयांना धरून केली जातात. त्यातील प्रमुख प्रकाशने खालीलप्रमाणे आहेत.
महिन्याचा पालकनीतीचा अंक:
दर महिन्याच्या १५ तारखेला प्रकाशित होणाऱ्या अंकातून मुख्यत: ० ते १८ या वयोगटाच्या संदर्भातून पालकत्वाचा विचार प्राधान्यानं मांडला जातो. एकल पालकत्व, बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार, शिक्षण-माध्यम, स्पर्धा, आमिषं –शिक्षा, शिक्षण, कला, खेळ, वाचन, उतसव, बालकांचे हक्क, स्त्रीपुरूष समानता, भाषाशिक्षण, बालसाहित्य, लैंगिकता शिक्षण, सामाजिक शास्त्रे, अशा पालकांच्या मनात ठाण मांडून बसलेल्या प्रश्नांवर तसेच तरुणाईचे जीवन, परिवर्तन अशा अनेक विषयावर मासिकातून मांडणी होत असते. आहार- आजार यासारख्या इतर माध्यमांमधून भरपूर माहिती दिली जात असलेल्या विषयांवर क्वचितच काही लेख असतात. मुळात ‘फक्त माहिती देणे’ हा पालकनीतीचाहेतूच नाही. अभ्यास, विचार, धारणा आणि कृती यांना चालना देण्याचा आहे.
ताजा अंक तसेच मागील अंक पाहण्यासाठी, त्यातील लेख ऐकण्या/ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
दिवाळी अंक
प्रत्येक वर्षीचा दिवाळी अंक हा एका विशिष्ट विषयाला धरून, त्या विषयाचे विविध कंगोरे, छटा उलगडून दाखविणारा असतो. एखाद्या विषयाकडे सर्वांगाने, विविध दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न यात केला जातो.
मागील दिवाळी अंक पाहण्यासाठी त्यातील लेख ऐकण्या/ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खेळघर प्रकाशने
पालकनीती परिवाराच्या खेळघराच्या अनेक वर्षांच्या कामाच्या अनुभवातून काही पुस्तिका / पुस्तकांची निर्मिती झाली आहे. खेळघराच्या पुस्तिका / पुस्तकं वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जानेवारी २०२६ पासून पालकनीती चा अंक online प्रकाशित होणार आहे.
संदर्भ
जगातल्या प्रत्येक गोष्टीला विज्ञानाचा संदर्भ असतो. निसर्ग, प्रकाश, माणसाची वागणूक; अगदी कलात्मकता आणि भाषा यांनासुद्धा. हा संदर्भ कळला, की जग सुंदर करायची उमेद वाढते, आणि आत्मविश्वासदेखील. हा शोध घेत शिकावे असे ज्यांना वाटते त्या सगळ्यांसाठी हे द्वैमासिक आहे. शाळेत जाणार्या मुलामुलींसाठी, शिक्षकांसाठी, आणि शिक्षकाची भूमिका निभावणार्या पालकांसाठीही.