पालकनीती परिवारातर्फे काही प्रकाशने नियमितपणे केली जातात तर काही प्रकाशने ही त्या-त्या वेळी महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयांना धरून केली जातात. त्यातील प्रमुख प्रकाशने खालीलप्रमाणे आहेत.   

महिन्याचा पालकनीतीचा अंक:

दर महिन्याच्या १५ तारखेला प्रकाशित होणाऱ्या अंकातून मुख्यत: ० ते १८ या वयोगटाच्या संदर्भातून पालकत्वाचा विचार प्राधान्यानं मांडला जातो. एकल पालकत्व, बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार, शिक्षण-माध्यम, स्पर्धा, आमिषं –शिक्षा, शिक्षण, कला, खेळ, वाचन, उतसव, बालकांचे हक्क, स्त्रीपुरूष समानता, भाषाशिक्षण, बालसाहित्य, लैंगिकता शिक्षण, सामाजिक शास्त्रे, अशा पालकांच्या मनात ठाण मांडून बसलेल्या प्रश्नांवर तसेच तरुणाईचे जीवन, परिवर्तन अशा अनेक विषयावर मासिकातून मांडणी होत असते. आहार- आजार यासारख्या इतर माध्यमांमधून भरपूर माहिती दिली जात असलेल्या विषयांवर क्वचितच काही लेख असतात. मुळात ‘फक्त माहिती देणे’ हा पालकनीतीचाहेतूच नाही. अभ्यास, विचार, धारणा आणि कृती यांना चालना देण्याचा आहे.

ताजा अंक तसेच मागील अंक पाहण्यासाठी, त्यातील लेख ऐकण्या/ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

दिवाळी अंक

प्रत्येक वर्षीचा दिवाळी अंक हा एका विशिष्ट विषयाला धरून, त्या विषयाचे विविध कंगोरे, छटा उलगडून दाखविणारा असतो. एखाद्या विषयाकडे सर्वांगाने, विविध दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न यात केला जातो. 

मागील दिवाळी अंक पाहण्यासाठी त्यातील लेख ऐकण्या/ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

खेळघर प्रकाशने

पालकनीती परिवाराच्या खेळघराच्या अनेक वर्षांच्या कामाच्या अनुभवातून काही पुस्तिका / पुस्तकांची निर्मिती झाली आहे. खेळघराच्या पुस्तिका / पुस्तकं वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

जानेवारी २०२६ पासून पालकनीती चा अंक online प्रकाशित होणार आहे.

संदर्भ

जगातल्या प्रत्येक गोष्टीला विज्ञानाचा संदर्भ असतो. निसर्ग, प्रकाश, माणसाची वागणूक; अगदी कलात्मकता आणि भाषा यांनासुद्धा. हा संदर्भ कळला, की जग सुंदर करायची उमेद वाढते, आणि आत्मविश्वासदेखील. हा शोध घेत शिकावे असे ज्यांना वाटते त्या सगळ्यांसाठी हे द्वैमासिक आहे. शाळेत जाणार्‍या मुलामुलींसाठी, शिक्षकांसाठी, आणि शिक्षकाची भूमिका निभावणार्‍या पालकांसाठीही.

संदर्भ सोसायटीच्या संकेतस्थळासाठी येथे क्लिक करा.

सोडवावे नेटके

सोडवावे नेटके

आमची मैत्रीण अपर्णा क्षीरसागर हिने लिहिलेल्या सोडवावे नेटके या नवीन पुस्तकाचे दिनांक १५.३.२०२५ ला छोटेखानी प्रकाशन झाले. मुलांमध्ये व्याकरणाची समज...
Read More
Towards Joyful Learning (Khelghar methodology book)

Towards Joyful Learning (Khelghar methodology book)

We pursue the dream of Joyful learning of deprived children.We have tried to implement this concept in our learning centre...
Read More
अमिषांचा मुका आणि शिक्षेचा दम

अमिषांचा मुका आणि शिक्षेचा दम

अमिषांचा मुका आणि शिक्षेचा दम - किंमत ४० रुपये (आमिष आणि शिक्षांच्या पकडीतून संगोपन मोकळे व्हावे म्हणून..)
Read More
आनंदाने शिकण्याच्या दिशेने

आनंदाने शिकण्याच्या दिशेने

आनंदाने शिकण्याच्या दिशेने (खेळघर हस्तपुस्तिका) किंमत ८५०/- रुपये  (हिंदी आणि मराठी)
Read More
चित्रवाचन सेट

चित्रवाचन सेट

लिपीचा उंबरठा ओलांडताना मुलांना मदत होईल असे एक मस्त शैक्षणिक साधन खेळघराने तयार केले आहे, ‘चित्रांचा हात धरून...’यासाठीची चित्रे अपर्णा...
Read More
चौकटींचे कागद – एक अनोखे गणिती साधन

चौकटींचे कागद – एक अनोखे गणिती साधन

चौकटींचे कागद – एक अनोखे गणिती साधन किंमत १०० रुपये या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच  गणितातील निरनिराळ्या संकल्पनांचे दृढीकरण करण्यासाठीची ही एक...
Read More
ठिपके जोडू या, भूमितीशी मैत्री करूया!

ठिपके जोडू या, भूमितीशी मैत्री करूया!

ठिपके जोडू या, भूमितीशी मैत्री करू या किंमत १०० रुपये (ठिपक्यांच्या कागदाचा वापर करून भूमिती समजून घेता यावी म्हणून... )...
Read More
पालकनीती मासिक

पालकनीती मासिक

(पालकत्वाला वाहिलेले) मासिक वार्षिक वर्गणी - ३०० रुपये मासिक - ताजा अंक
Read More
भाषा नकाशाची

भाषा नकाशाची

भाषा नकाशाची किंमत ७० रुपये (नकाशाच्या माध्यमातील माहिती मुलांना सहज वाचून, समजून घेता यावी म्हणून ) शालेय अभ्यासक्रमात भूगोलाच्या पाठ्यपुस्तकांमुळे,...
Read More
माझी गोष्ट : कृती पुस्तिका

माझी गोष्ट : कृती पुस्तिका

माझी गोष्ट : कृती पुस्तिका किंमत २० रुपये मुलांच्या भावविश्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘मी’ आणि ‘माझी गोष्ट’ या पासून या पुस्तिकेची...
Read More
सकारात्मक शिस्त

सकारात्मक शिस्त

सकारात्मक शिस्त किंमत ७० रुपये मुलांबरोबर काम करताना शिक्षकांना सर्वात सतावणारा प्रश्न म्हणजे वर्गनियंत्रण कसे करावे?  कधीकधी मुलं अजिबात ऐकत...
Read More