अमृता ढगे
दत्तकाची वीण
आनंद द्विगुण
करोनिया उरली
घरादारा
नंद-यशोदेचे भाग्य
आम्हासी मिळता
जन्माचे कारण
आकळिले!
माणूसपण थोर
साधता हे तत्त्व
सुफळ जाहले
पालकत्व
स्वप्नांना अमुच्या
नुरलाच बंध
इतुका हा गोड
अनुबंध
उराशी घेतले
तान्हुल्या बाळां
पटली ती खूण
जन्मोजन्मां
चातकाची आस
त्याला मलाही
थांबला काळही
त्याच क्षणी
कवेत घेतले
आभाळ सानुले
फाटले होते का
कधी काळी
अमृता ढगे
