आदरांजली – बनविहारी (बॉनी) निंबकर
प्रसिद्ध कृषीशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते बनविहारी (बॉनी) निंबकर ह्यांचे 25 ऑगस्ट रोजी निधन झाले. शेतीक्षेत्रातील संशोधनाचा त्यांनी आयुष्यभर ध्यास घेतला. सातारा जिल्ह्यातील फलटण ही त्यांची कर्मभूमी. निंबकर अॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेतबियाणांमध्ये संशोधन करून शेतकर्यांना सुधारित बियाणी उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे शेळी-मेंढीपालन व्यवसायासाठीही मोठे योगदान दिले. शेतीक्षेत्रातील त्यांच्या ह्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी 2006 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. 2016 मध्ये जमनालाल बजाज पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली. निंबकरांच्या कार्याचे महत्त्व ह्यातून अधोरेखित होते. पालकनीती परिवाराची मैत्रीण प्रगत शिक्षण संस्था त्यांच्या प्रोत्साहनातून उभी राहिलेली आहे.
दादांना पालकनीतीचा सलाम.