आदरांजली

नारी समता मंच संस्थेच्या मुख्य कार्यकारी समिती सदस्य आणि प्रयास संस्थेच्या अंतर्गत तक्रार समितीवर कार्यरत असलेली आमची मैत्रीण प्रीती करमरकर ह्यांचे नुकतेच निधन झाले.
सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे योगदान मोठे आहे. यशदा, बाएफ अशा निरनिराळ्या संस्थांमध्ये त्यांनी काम केले. २०१३ च्या लैंगिक छळ (प्रतिबंध आणि निवारण) अधिनियमातील तरतुदी त्या त्यांच्या कार्यशाळांमधून समजावून सांगत.
त्यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झालेली आहे.
पालकनीती परिवाराच्या वतीने प्रीती करमरकर ह्यांना भावपूर्ण आदरांजली!