खेळघराच्या हायस्कूल गटाची दिवेआगरची सहल

गेल्या वर्षी मुलांना समुद्र किनाऱ्यावर जायची फार इच्छा होती पण आपल्याकडे असणारे trip साठीचे तुटपुंजे पैसे यामुळे तिकडे जाणे राहूनच गेले होते. शेवटी आपली खेळघराची मुलं आहे त्या परिस्थितीला स्वीकारून सज्जनगड ला जायला तयार झाली होती.
या वर्षी मात्र सुषमा भुजबळ ताईने आणि मुलांनी लावूनच धरले की आपली ट्रीप समुद्र किनारीच न्यायची. अर्थात आधी बजेट पाहिले त्यानुसारच फायनल ठरवले. त्यासाठी सुषमा ताईने तिच्या मित्रांकडून दिवेआगर च्या खानावळ वाल्या काकांचा नंबर घेऊन जेवणाचा मेनू ठरवणे ट्रीप च्या दिवसापर्यंत त्यांच्या संपर्कात राहणे, bus ठरवणे, परमिट साठी मुलांची यादी पाठवणे, या सगळ्याचा चांगलाच पाठपुरावा केला. ट्रीप साठी प्रत्येक मुलासोबत बोलणे, त्यांच्या पालकांशी बोलणे, मुलांना काही गोष्टी नका करू हे सांगण्यासाठी ताईला मुलांना पटेल अशा शब्दांत/ काही उदाहरणे देऊन मुलांशी वेळोवेळी बोलायला लागले.
नवीन अनुभव तो ही समुद्र किनारी जाण्याचा! त्यामुळे थोडा अभ्यास/ थोडी माहिती तर हवीच ना! शुभदा काकूंनी त्यांचा आवडता विषय ‘ भूगोल ‘ आधी तायांना समजून सांगितला. अगदी भू- रचना, समुद्र किनारा, आजूबाजूचे वातावरण, तिथे निरिक्षणासाठी काय काय संधी आहेत या सगळ्याचा अभ्यास काकूंनी अगदी उत्साहाने तायांना समजावला. तायांनी त्याबद्दलचे संवाद गट मुलांसोबत घेतले.
ट्रीप module च तयार झाले या निमित्ताने – अगदी ट्रीप ला जाण्याचे उद्देश काय यावर चर्चा असेल, घरच्यांची परवानगी मागण्याचे संमती पत्र तयार करणे असेल, google वरून एखाद्या ठिकाणची माहिती शोधणे असेल, आपणच आपल्यासाठी नियम बनवणे असेल या सर्वात मुलांचा सहभाग आणि प्रत्यक्ष ट्रीप. या सर्व गोष्टी गटाच्या तायांनी मुलांसोबत करून घेतल्या.
प्रत्यक्ष ट्रीप ला जाण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा hsg २ च्या सुषमा ताई ला काही कारणामुळे नाही यायला जमणार हे समजल्यावर मुलं थोडी नाराजच झाली, ताई,” आम्ही घेऊ तुमची काळजी तुम्ही चला आमच्यासोबत “असे मुलं म्हणत होती. अर्थात ते शक्य न्हवते. पूर्वतयारी मधला सगळा सेटअप सुषमा ताईने बसवून मात्र दिला.
आपल्या खेळघरात आम्हा तायांचे इतके एकमेकांबद्दल नाते छान आहे की एकमेकींना समजून घेऊन, एकमेकांसाठी उभेही राहतो. हीच तर Harmony आहे आमची!
प्रत्यक्ष ट्रीप साठी admin च्या प्रियांका ताई, मुलांच्या लाडक्या अपर्णा काकू, स्वतःहून मी मदतीला येते म्हणणाऱ्या volunteer मेधा ताई, मुलांची आवडती प्रतिभा ताई आणि सगळ्यात जास्त जबाबदारी ज्यांच्यावर होती ते दोन युवक गटातील आमची मुलं – परशुराम दादा आणि अजय दादा. यांची फार मदत झाली. या सर्वांमुळे मुलांना कधीही न विसरता येणारा अनुभव मिळाला. खूष झाली मुलं सगळी!
एखादा ऑर्केस्ट्रा सुंदर ऐकायला मिळतो त्यामध्ये एका लयीत सगळा वाद्यवृंद वाजतो , त्याच्या अलीकडे पलीकडे ते घडवून आणण्यासाठी जे हात असतात त्यांचे कौतुक तर करायलाच हवे.
तसेच ही ट्रीप घडवून आणण्यासाठी असलेले सर्व हात म्हणजे सगळ्या ताया , दादा आणि मुलं या सगळ्यांचे कौतुक