पर्यावरणव्रती कुसुम
पर्यावरणाच्या क्षेत्रात मोठं काम असलेल्या कुसुमताई कर्णिक जाऊन वर्ष झालं. त्या निमित्तानं ‘पर्यावरणव्रती कुसुम, पर्यावरण रक्षण आणि…’ हे पुस्तक अमित प्रकाशनानं प्रकाशित केलं. ह्याचं संपादन ‘मिळून सार्याजणी’च्या डॉ. गीताली वि. म. ह्यांनी केलेलं आहे. त्यात कुसुमताईंच्या आठवणींचा भाग आहे, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करणार्या अनेकांचे अनुभव, दृष्टिकोन आणि पुढची दिशा मांडण्याचाही भाग आहे. पालकनीतीचा जुलैचा अंक पर्यावरण या मोठ्या विषयाभोवती घुटमळताना आणि त्याच स्थळ-काळात हे पुस्तक प्रकाशित होत असताना त्याचा आणि त्या निमित्तानं कुसुमताईंचा उल्लेख अपरिहार्य आहे.
पुस्तक खरेदी करण्यासाठी 9921272546 ह्या व्हॉट्सॅप् क्रमांकावर संपर्क साधता येईल.