स्वयंसेवक, तेजस्विनी शेंड्ये.

तेजस्विनी शेंड्ये आमची मैत्रीण !
खेळघराच्या कामाशी ती मनापासून जोडली गेली आहे. सुमारे १२-१४ वर्षांपासून संपर्कात आहे. IT मध्ये अतिशय जबाबदारीच्या पदावर काम करते आहे. कामानिमित्त अनेकदा देशी – विदेशी फिरावे लागते.
इतक्या व्यस्त दिनक्रमात खेळघरासाठी काही करावेसे वाटले तरी जमतच नाही… हे म्हणणे अगदीच सयुक्तिक!
पण तेजूने ते मानले नाही. तिने creatively अनेक जागा शोधून काढल्या, जिथे ती खेळघराला मदत करू शकेल.
मुलांना शैक्षणिक मदत मिळावी म्हणून देणगी देणे, नातेवाईक मित्रांकडून विशिष्ठ कारणासाठी आर्थिक मदत मिळवून देणे, LTI या तिच्या कंपनीमध्ये सहकाऱ्यांशी मला बोलायला बोलावणे अशा अनेक गोष्टी तिने आपणहून केल्या.
गेल्या वर्षी तिने वयाची ५० वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने तिने खेळघरातील सर्व (२०० ) मुलांना ५० आठवडे खाऊ द्यायचा ठरवला. त्या त्या सीझन ची फळे, dry fruits, चिक्की, बाकरवडी असे उत्तम खाऊचे पर्याय ती स्वतःच शोधते.
काल परवा तर उत्तम हापूसच्या आंब्याच्या पेट्या ऑफिसमध्ये बघून माझेच डोळे भरून आले.
पुढील वर्षी नवऱ्याच्या पन्नाशी निमित्त असेच ५० आठवडे खाऊ मिळणार आहे खेळ घरातील मुलांना!
तिला अनेक कल्पना सुचतात, त्यातल्या काही प्रत्यक्षात येतात काही नाही जमत…पण ठीक आहे, त्यातूनही करत राहायचे हा स्वभाव!
अशा जीवाभावाच्या मित्र मंडळींमुळे काम चालू राहते…अधिक समृद्ध होते…