टीकेविना

पदवीपूर्व शिक्षणाचा भाग म्हणून काही अनुभव घेण्यासाठी हॉलंडहून दोन मुली नुकत्याच भारतात आल्या आहेत. मुंबईपर्यंत विमानाने पोचून त्या तिथून टॅक्सीने पुण्याला आल्या. दुसर्याव दिवशी त्यांच्याशी बोलताना-त्यांच्याकडून आपल्याबद्दल आलेला हा पहिला अभिप्राय-
‘तुमच्या इथे रस्त्यावरची एक पाटी पाहून आम्हाला गंमत वाटली. पाटीवर लिहिलं होतं. वाहतुकीचे नियम पाळा !’