चलो दिल्ली

नव्या युगाचे नवे हे तंतर
चलो दिल्ली चलो जंतर मंतर

कुठे लूट तर कुठे न पाणी
खणखणणारी चिल्लर नाणी
डोक्यावरती बांधून पटके
बदलाची नव गाऊ गाणी
आधी ‘बिल’, बाकी सगळे नंतर
चलो दिल्ली चलो जंतर मंतर

रस्ता, धरणे, खाणी, शाळा
चरण्यासाठी कुरणे सोळा
लावून चुलीला दिवसा टाळा
गळ्यात आमुच्या घाला माळा
भरल्या पोटी जपूया मंतर
चलो दिल्ली चलो जंतर मंतर

डोक्यावरची टोपी तिरकी
समोर कुणीही घेतो फिरकी
असो शहाणा असो बेरकी
माझी माणसे कोण नेमकी
प्रश्ना पडे हा सदा निरंतर
चलो दिल्ली चलो जंतर मंतर

दिल्लीमाजी जमली गर्दी
चॅनेलांची झाली चांदी
झोतासाठी गडबड करती
खादीपेक्षा कफनी भारी
लाठीधारी खाकी दिसता
भागो भागो भागो अंदर
चलो दिल्ली चलो जंतर मंतर

उपोषणाचे शस्त्र अखंडित
परजत पाणी पाजू लढवित
गरजणारा नाही बरसत
युगायुगांचा अनुभव गाठीस
मैदान असो वा चौकामध्ये
खिंडीमध्ये पुन्हा गाठतील
सत्तेमधले सर्व बिलंदर
चलो दिल्ली चलो जंतर मंतर