नवे बदल स्वीकारताना…

जून महिन्यात वर्गात नवीन मुले येतात, बॅचेसची रचना बदलते, पुढच्या वर्गाची वेगळी ताई असते, असे सगळे बदल आत्मसात करून वर्ग सुरळीत होणे हे आव्हानच असते.
या वर्षी आम्ही जून साठी मी आणि खेळघर अशा module ची आखणी केली होती.
मुलांना स्वतःची ओळख आत्मविश्वासाने करून देता यावी, वर्गात इतरांशी, ताईंशी चांगली ओळख होऊन दोस्ती व्हावी आणि खेळघराबद्दल देखील सविस्तर समजावे यासाठी विविध उपक्रमांची आखणी केली होती.
याचे मूल्यमापन होणार होते पालकसभेत! मुलांनी आपापल्या पालकांना सभेला घेऊन यायचे होते. स्वतःची आणि आईची ओळख सगळ्यांना करून द्यायची होती. पालकांना खेळघराबद्दल माहिती सांगायची होती. आणि हेच मुलांचे आणि module चे मूल्यमापन होते.
सातवी आणि आठवी च्या गटातील पालकसभेचा व्हिडिओ सोबत जोडला आहे. अनिताताई भालेकर ह्या ताई वर्गाचे काम पाहतात. आणि अनुराधाताई त्यांना जीवनकौशल्ये या विषयासंदर्भात मदत करतात. पालकसभे दरम्यान आईची ओळख करून देताना, आईला आवडते अशी एक गोष्ट सांगायची होती. तेव्हा कावेरी म्हणली, ” आम्ही सगळी भावंडं आनंदात असलो की आईला खूप आवडते”. ह्या संवादातून पालक खेळघराशी जोडले जातातच, त्या बरोबर मुले आणि पालक यांचे नाते ही बहरते.
मुले आणि पालक दोन्ही समवेत मैत्रीचे नाते जोडून घेण्यात ताईंनी मनापासून प्रयत्न केल्या खेरीज हा माहौल तयार होणे शक्य नाही.

https://youtube.com/shorts/BaKvajFroRU?si=n4rYhaWtZHomNSpk