खेळघर मित्र गट
गेल्या वर्षभरात खेळघराच्या कामात पालकांना जोडून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण महत्वाची गोष्ट म्हणजे, या कामाच्या बाबतीतील आमच्या दृष्टीकोनात झालेला बदल! पूर्वी पालकांसमवेतचं काम म्हणजे त्यांच्या जाणीवजागृतीचं काम असं आम्हाला वाटत असे. मात्र आता पालक देखील खेळघराच्या कामात चांगला सहभाग घेऊ शकतात हा विश्वास वाटत आहे. कोविडच्या काळामध्ये पालकांना स्वतःच्या आणि सभोवतालच्या मुलांचा अभ्यास घेता यावा म्हणून प्रशिक्षणं घेऊन आम्ही प्रोत्साहन दिलं होतं. शाळा सुरू झाल्यावर हे वर्ग बंद झाले तरीही काही पालकांना शिकण्याशिकवण्यात रस निर्माण झाला. ‘खेळघर मित्र’ या नावाचा गट तयार झाला. त्यांचे आठवडी वर्ग सुरू झाले. गटात सातवी-आठवी पर्यंतचं शिक्षण घेतलेले काही पालक आहेत. त्यातील तीन महिला प्राथमिकच्या वर्गांबरोबर सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करत आहेत. त्यातल्या दहा पालकांनी स्वतःच्या घरी छोटं वाचनालय चालवण्याची कल्पना पुढं नेण्यात रस दाखवला. अशी सहा पेटी वाचनालयं नियमित सुरू झाली आहेत. आपल्या प्रकल्पातून वस्ती पातळीवरचे कार्यकर्ते तयार व्हावेत ह्या दिशेनं काम पुढं जात आहे याचं समाधान मनात आहे.
Last year several attempts were made to involve the parents in Khelghar’s work. The most important achievement actually is the change in our own perspective! Our previous efforts were focussed only on raising awareness within the parents but over time we feel confident that parents can actually participate in our day to day activities.. Several parents were trained by Khelghar during the Covid crisis to tutor the students. Once schools resumed, the tutoring stopped. However, many parents developed an interest in learning and teaching. A group called ‘Khelghar Mitra’ was formed, and we facilitated their weekly training classes. Three of the parents are now working as assistant teachers’ in our primary classes. Ten other parents are interested in running a “Book-box library” from their homes, out of which six have already started. The community level participation in Khelghar’s activities is extremely gratifying to us!