
रुजावा अंकुर म्हणून
पाहिलेलं स्वप्न
चुरगळलेल्या मुठीनं
रोज उशाखाली ढकलणं
नसतंयच सोपं
नसतंयच सोपं
घरच्यांनीच खुंटीवर टांगलेलं बाईपण बघणं
बोचर्या संशयी नजरा झेलणं
कधी स्वत:लाच आरशात पाहताना
नजरेला नजर न भिडणं
नसतंयच सोपं
सोपं अस्तंय
ऊर फुटेस्तोवर राबून
सगळ्याला दबून
रट रट शिजून
सप्तपदी चालणार्या बाईला
वांझोटी म्हणणं
अगदी सोपंय
अमृता ढगे
amrutamayur24@gmail.com
 
 
             
             
            
