१५ डिसेंबर सायं. 5 ते १८ डिसेंबर सायं. ६, २०२५
नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
‘जीवन कौशल्ये’ हा पालकनीती परिवार, खेळघराच्या कामाचा गाभा आहे. मुलांनी आनंदाने, आत्मविश्वासाने आणि संवेदनक्षमतेने जगण्यासाठी सक्षम व्हावे हे जीवन कौशल्यांच्या शिक्षणाचे ध्येय! त्यासाठी सवयी, कौशल्ये, दृष्टीकोन आणि मूल्ये अशा चारही पातळ्यांवर काम व्हायला हवे. खेळ, कला आणि संवाद ही या शिक्षणाची माध्यमे आहेत.
गेल्या 29 वर्षापासून पुण्यातील कोथरूडयेथील लक्ष्मीनगर या झोपडवस्तीतील मुलांसोबत ‘आनंददायी शिक्षणाच्या दिशेने’ आम्ही काम करत आहोत. मुलाच्या विकासात अत्यंत आवश्यक असलेली ही सामाजिक, भावनिक तसेच शिकण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये कशी विकसित होतील हा आमचा अभ्यासाचा आणि कामाचा महत्वाचा भाग आहे. त्यातून गवसलेली शिदोरी समविचारी मित्रमंडळीसोबत वाटून घ्यायची आहे. यासाठी ‘जीवन कौशल्ये’ या विषयावर मराठी भाषिक कार्यकर्ते, शिक्षक याच्यासाठी तीन दिवसांची निवासी कार्यशाळाआयोजित करत आहोत.
ही कार्यशाळा एस. एम. जोशी सोशालिस्ट फौंडेशन, पुणे येथे असेल.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश –
- जीवन कौशल्ये या विषयावर स्वत: आणि मुलांसोबत काम करण्याची गरज आणि महत्त्व लक्षात येऊन या पद्धतीचा प्रत्यक्षात अनुभव मिळवणे.
- मुलांसोबत काम करण्यासाठी स्वत:च्या दृष्टीकोनावर विचार करून त्यांना बदलाच्या दिशेने घेऊन जाणे.
- कार्यकर्ता म्हणून मुलांमध्ये आत्मविश्वास आणि संवेदनशीलतेने जगण्याची ताकद विकसित करणे.
- मुलांनी आनंदाने जगणे आणि शिकणे यासाठी जीवन कौशल्याची जागा आणि ताकद समजणे.
ही कार्यशाळा 15 डिसेंबर सायंकाळी 5 पासून 18 डिसेंबर 2025 सायंकाळी सहापर्यंत, या वेळेत होईल.
नोंदणी शुल्क – 2000/- ( नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण आणि निवासासह)
या कार्यशाळेत एका संस्थेकडून दोन व्यक्ती येऊ शकतात. या व्यक्ती मुलांसोबत प्रत्यक्ष काम करणा-या असाव्यात.
आपल्याला या कार्यशाळेत सहभागी व्हायला आवडेल का? कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी खालील गुगल फॉर्म भरून दिनांक 18 नोव्हेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन करावे. रजिस्ट्रेशन झाल्यावर आम्ही आपल्याशी वैयक्तिक फोनवर बोलू आणि मिळून निर्णय घेऊ.
खेळघर टीम
