खेळ खेळून पहा…

पालक आणि मुलांनो – पुढील  खेळ खेळून पहा; पण प्रामाणिकपणे हं. आधी आपापले प्रश्न सोडवा आणि मग एकमेकांची उत्तरं पडताळून पहा. कदाचित तुम्हाला एकमेकांविषयी एखादी नवीनच गंमत कळेल! आणि हो, जी मुलं स्वतःहून प्रश्न वाचून उत्तरं देऊ शकणार नाहीत त्यांच्या पालकांना मुलांच्या मनातलं अलगद बाहेर काढावं लागणार आहे हं!

पालकांसाठी 

पाल्यांसाठी 

तुमच्या मते भेट/भेटवस्तू म्हणजे काय? तुमच्या मते भेट/भेटवस्तू म्हणजे काय?
बालपणी तुम्हाला मिळालेली तुमची सर्वात आवडती भेट कोणती होती? का? आतापर्यंत तुम्हाला मिळालेली तुमची सर्वात आवडती भेट कोणती आहे? का?
तुमच्या मते  पाल्याला मिळालेली सर्वोत्तम भेट कोणती? का? तुम्हाला एखादी भेट आवडली नाही असं कधी झालंय का? कुठली आणि का?
तुम्हाला तुमच्या पाल्याला एखादी विशिष्ट भेट द्यायची आहे का? कुठली आणि का? तुम्हाला एखादी विशिष्ट भेट हवी आहे का? कुठली आणि का?
वरील प्रश्नावलीत तुम्हाला सुचतील तश्या सुधारणा करूनही तुम्ही हा खेळ खेळू शकता. अगदी हेच प्रश्न विचारावेत  असं काही नाही!

 

परत : जानेवारी 2018