आदरांजली – सप्टेंबर २०२३

‘आजचा सुधारक’ ह्या विवेकवादी नियतकालिकाचे संपादक आणि प्रकाशक दिवाकर मोहनी ह्यांचे मधल्या काळात निधन झाले. मुद्रण आणि लिपी ह्या विषयांचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी स्त्री-स्वातंत्र्य, धर्म, संपत्तीचे मोल इत्यादी विषयांवर लेखन केले. ‘माय मराठी कशी लिहावी, कशी Read More

उशीर – सप्टेंबर २०२३

ही गोष्ट आहे पालकनीतीच्या खेळघरातली. साधारण २००० सालाच्या सुमाराची. मी आठवीच्या मुलांचा इतिहासाचा वर्ग घेत असे. जिन्याच्या पायर्‍यांवर मुले बसायची. दोन जिन्यांच्या मधल्या जागेत खिडकीच्या खालच्या भिंतीवर फळा रंगवून घेतलेला होता. तिथे उभी राहून मी शिकवायचे. वसाहतीकरण, राज्य राष्ट्र वाद, Read More

धोरणामागील धोरण (एनईपी) – २०२३

प्रियंवदा बारभाई राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 जाहीर झाल्यानंतर पालकनीतीच्या ऑगस्ट ते डिसेंबर 2020च्या अंकांमध्ये धोरणाची प्राथमिक माहिती देणारे आणि प्रथमदर्शनी टिप्पणी करणारे लेख आलेले आहेत. त्यामध्ये जाणवलेल्या अडचणींची मांडणी केली होती. धोरणाने बालशिक्षणावर दिलेला भर आणि मातृभाषेतून शिक्षण या दोन्ही Read More

निमित्त प्रसंगाचे – सप्टेंबर २०२३

चौथीतले सौरभ आणि अंश वीणाताईंच्या समोर मान खाली घालून उभे होते. वीणाताई त्यांच्या वर्गताई. त्यांच्याकडे सतत या दोघांच्या तक्रारी येत. ‘‘ताई, हा खूप घाण शिव्या घालतो’’, एका मुलीनं सांगितलं. ‘‘हा  सारखा मला मारतो कुठेही’’,  दुसऱ्यानं सांगितलं.  ‘‘हा सतत माझी चड्डी Read More

निवांत – सप्टेंबर २०२३

वैशाली गेडाम पहिलीतली सर्व मुले स्वाध्यायपुस्तिका सोडवत होती. चेतन मात्र मस्ती करत होता. त्याला सुरुवातीला प्रेमाने सांगितले. तो बधला नाही. मग माझ्यापर्यंत तक्रारी आल्या. आता मात्र मी त्याला रागे भरले. त्याने आपली स्वाध्यायपुस्तिका काढली; पण इतर मुलांप्रमाणे ती घेऊन तो Read More

निषेधाचं निरूपण – सप्टेंबर २०२३

ऋषिकेश दाभोळकर लहान मुलं आणि निषेध हे दोन शब्द सहज एकत्र येताना दिसत नाहीत. त्याऐवजी ‘काय नाटकं करतोय / करतेय!’ किंवा ‘नखरे बघा त्यांचे!’ किंवा ‘कितीही हातपाय झाडलेस तरी चालेल, माझ्यासमोर असल्या युक्त्या चालणार नाहीत हां!’ वगैरे मुलांना दरडावणं मात्र Read More