पालकनीती परिवारच्या खेळघराला ५ जानेवारी २०२५ ला, ‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र’ या संस्थेच्या वतीने, कै. निर्मलाताई पुरंदरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार मिळाला.
खेळघराच्या वतीने आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुमित्रा मराठे आणि व्यवस्थापनाचे काम पाहणाऱ्या प्रियंका पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सुमित्राताईंनी उपस्थितांसमोर खेळघराच्या कामाबद्दल मांडणी केली.
अनेक वर्षे ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात मोलाचे काम करत असलेल्या निर्मलाताई पुरंदरे यांच्या जुन्या आणि जाणत्या संस्थेकडून हा पुरस्कार मिळाला याचे विशेष महत्त्व वाटते आहे.
वंचित मुलांना देखील आनंदाने शिकण्याची संधी मिळावी या उद्देशाने गेली २८ वर्षे खेळघर काम करत आहे. या कामाचे मोल वनस्थळीने जाणले याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!