संवादकीय – ऑगस्ट २०१९

दहा आदिवासी – त्यातल्या तिघी स्त्रिया – या सार्‍यांना मारून टाकलं गेलंय, त्या हल्ल्यात आणखी चौदा जखमी आहेत. उत्तर प्रदेशातल्या सोनभद्र जिल्ह्यातल्या एका खेड्यात सरपंचानी हा जीवघेणा हल्ला केला. हे सगळे जातीव्यवस्थेचे बळी आहेत. केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर सर्वत्रच आदिवासी Read More

संवादकीय – जुलै २०१९

मुलांसाठी संख्यानामं सोपी करण्याची कळकळ बालभारतीनं आणि मंगला नारळीकर प्रभृती गणित अभ्यासक्रम गटानं दाखवली, त्याबद्दल त्यांचे आभार. मराठीतली संख्यानाम वाचनाची पद्धत संख्या अंकात लिहिताना गोंधळात पाडणारी आहे, यात काही संशय नाही. उदाहरणार्थ, पंचवीस या संख्यानामात 5 आधी म्हटले जातात आणि Read More

संवादकीय – जून २०१९

आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे – ‘नाही मागता येत भीक, तर मास्तरकी शिक.’ अध्यापनाकडे, विशेषतः प्राथमिक पातळीवरचे, बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनच ह्यातून व्यक्त होतो. आज एवढ्या वर्षांनंतरही त्यात फारसा फरक पडलेला दिसत नाही. पालकांखालोखाल भावी पिढी घडवण्याची जबाबदारी असणार्‍या क्षेत्राकडे किमान Read More

संवादकीय – मे २०१९

जरा आजूबाजूला नजर टाकली, तर बहुसांस्कृतिक पर्यावरणात जगायला आवडणारी बरीच माणसं जगभर आपल्या नजरेस पडतात. त्यातून त्यांना अन्य संस्कृती, विविध चालीरीती, जागोजागच्या समजुती, आणि खाण्या-लेण्याच्या विपुल तर्‍हा, असा विस्तृत पट अनुभवायला मिळतो. त्याचवेळी असंही बघायला मिळतं, की काही लोकांना मात्र Read More

संवादकीय – मार्च २०१९

आपले पालक, आपली भाषा, आपलं गाव, प्रांत, देश अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनात असतात. त्यांच्यावर आपलं प्रेम असतं; म्हणजे नक्की काय असतं? बालवयापासून किंवा अनेक वर्षांपासून सहवासात राहिल्यानं आपल्याला त्यांची सवय होते. त्या वातावरणात स्वस्थ आणि सुरक्षित वाटतं. इतर वातावरणात Read More

संवादकीय – फेब्रुवारी २०१९

कल्पना करू या. कुणीतरी आपल्याला सांगतंय, काय खावं, प्यावं, ल्यावं, कधी झोपावं आणि उठावं कधी, काय पाहावं, वाचावं, बघावं, कुणाबरोबर बाहेर जावं न जावं… अस्वस्थ वाटतंय का? एकच शब्द सुचतो ह्या स्थितीचं वर्णन करायला, कैद. आता ह्या चित्रातून आपण अलगद Read More