संवादकीय – डिसेंबर २०१९

बाबरी मशिदीच्या जागी राममंदीर बांधायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मिळाली. मशिदीसाठी दुसरी जागा देण्यात आली. असो. मुळात बाबरी मशीद तोडणं हेच योग्य होतं का? मानवी हक्कांची जाणीव निर्माण झालेल्या आजच्या जगात प्रत्येकाला आपापला देव, त्यानुसारचा धर्म मानण्याचा आणि पूजा करण्याचा हक्क Read More

संवादकीय | ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१९

ग्रेटाचं म्हणणं खरंच आहे. आपण या जगात आनंदानं, सुखानं, आरोग्यपूर्ण जगण्याची शक्यताच नसली, तर कशाला जायचं त्या शाळेत? संपूर्ण जगभरात हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम जर कुणाला सर्वाधिक भोगावे लागत असतील, तर ती आहेत मुलं. ह्या वैश्विक समस्येनं आता उग्र रूप Read More

संवादकीय – सप्टेंबर २०१९

महात्मा गांधी म्हणाले होते, “my life is my message” (माझे आयुष्य हाच माझा संदेश आहे); त्यांना त्यातून काय म्हणायचं असेल? अर्थात, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातल्या किंवा रुची असणाऱ्या व्यक्तींना गांधीजींच्या आयुष्याचे, त्यांच्या कार्याचे वेगवेगळे पैलू भुरळ पाडतात, त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायला, वाचायला Read More

संवादकीय – जून २०१९

आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे – ‘नाही मागता येत भीक, तर मास्तरकी शिक.’ अध्यापनाकडे, विशेषतः प्राथमिक पातळीवरचे, बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनच ह्यातून व्यक्त होतो. आज एवढ्या वर्षांनंतरही त्यात फारसा फरक पडलेला दिसत नाही. पालकांखालोखाल भावी पिढी घडवण्याची जबाबदारी असणार्‍या क्षेत्राकडे किमान Read More

संवादकीय – मे २०१९

जरा आजूबाजूला नजर टाकली, तर बहुसांस्कृतिक पर्यावरणात जगायला आवडणारी बरीच माणसं जगभर आपल्या नजरेस पडतात. त्यातून त्यांना अन्य संस्कृती, विविध चालीरीती, जागोजागच्या समजुती, आणि खाण्या-लेण्याच्या विपुल तर्‍हा, असा विस्तृत पट अनुभवायला मिळतो. त्याचवेळी असंही बघायला मिळतं, की काही लोकांना मात्र Read More

संवादकीय – एप्रिल २०१९

आईनस्टाईन म्हणाला होता, ‘‘ज्या पातळीवर एखादी समस्या निर्माण होते, त्याच पातळीवरून ती संपूर्ण सोडवता येत नाही.’’ बरेचदा, एखाद्या समस्येवर तोडगा काढताना आपण आपल्या सद्य समजुतीनुसार विचार करून त्या परिस्थितीतले समोर असलेले पैलूच तेवढे विचारात घेत असतो.मात्र एखाद्या जटिल समस्येचं उत्तर Read More