ठिपके जोडू या, भूमितीशी मैत्री करू या

१०० रुपये

(ठिपक्यांच्या कागदाचा वापर करून भूमिती समजून घेता यावी म्हणून… )

मुलांना ठिपक्यांची रांगोळी काढायला खूप आवडते. हेच ठिपके जोडून भूमितीच्या अवघड वाटणाऱ्या संकल्पना मुलांना सहजपणे शिकता येतात.

मुलांना आडवी, उभी किंवा तिरपी रेष काढणं अवघड जातं. मात्र या पुस्तिकेच्या वापरामुळे, सरावामुळे मुले हळूहळू लांब सरळ रेषही काढू लागतात. या पुस्तिकेत अनेक उदाहरणे दिली आहेत. तुम्ही त्यात भरही घालू शकता. ही पुस्तिका म्हणजे कृतीतून, अनुभव घेत घेत मूलभूत भौमितिक संकल्पना समजून घेण्याच्या प्रक्रियेतील एक चांगले साधन आहे. ही पुस्तिका इयत्ता ३री ते ८वी पर्यंतच्या मुलांसाठी उपयोगी पडू शकते. जाड आणि बारीक ठिपक्यांच्या कागदांचे अनेक नमुने पुस्तिकेच्या शेवटी दिले आहेत. आपणाला याचा उपयोग नक्कीच होईल याची खात्री आहे.