भाषा नकाशाची
७० रुपये
(नकाशाच्या माध्यमातील माहिती मुलांना सहज वाचून, समजून घेता यावी म्हणून )
शालेय अभ्यासक्रमात भूगोलाच्या पाठ्यपुस्तकांमुळे, त्यातील क्लिष्ट भाषेमुळे मुलांच्या मनात नकाशाची भीती बसू शकते. मात्र नकाशावरून एखादा भूप्रदेश समजावून घेण्याचं तंत्र जर मुलांना अवगत झालं तर भूगोलासारखा सुंदर विषय नाही. अशी ही नकाशाची भाषा अवगत होण्यासाठी काय करता येईल याची चर्चा या पुस्तिकेतून आपल्यासमोर मांडली आहे. मुलांना करून पाहता येतील असे अनेक उपक्रमही यात दिले आहेत.
एखाद्या अनोळखी देशाचा नकाशा पाहून त्या देशाचं स्थान, प्राकृतिक रचना, हवामान, पिकं-उद्योग-वनं-प्राणी, लोकजीवन यांचा अंदाज बांधणं आणि प्रत्यक्षात त्याची उत्तरं शोधणं हे सारं या पुस्तिकेच्या माध्यमातून – नकाशाच्या भाषेनं सहजसाध्य होईल.