पोटासाठी केले असेल,

हावेपोटी केले असेल

कशासाठी का केले असेना

शेवट एकच!

सोपे आहे पाहा,

एक अनाम बेवारस झाड शोधा

एक अनाम राकट डोंगर शोधा

एक अनाम प्राचीन जंगल शोधा

त्याला तोडा किंवा खणा

अन् आणा बाजारात त्या मालाला

एका हाताने लाकूड द्या

दुसऱ्या हाताने पैसे घ्या

झाले की नाही लाकडाचे पैसे?

झाले की नाही कोळशाचे पैसे?

झाले की नाही तेथील नष्ट झालेल्या जीवाचे पैसे?

आणि म्हणा त्याला माझे!

म्हणा त्याला स्वकष्टार्जित!

आणि गाजवा त्यावर मालकी!

प्रियदर्शन सहस्रबुद्धे

priyadarshan@vaayu-mitra.com

आपल्या जगण्यातून, व्यवसायातून आणि कलेच्या माध्यमातून निसर्गपूरक जीवनशैली जगण्याचे उपाय विकसित करतात.