अभिनंदन

साने गुरुजी संस्कार साधना, पुणे ह्या संस्थेतर्फे बालमेळावे, शिबिरे इ. सामाजिक उपक्रम राबवले जातात. शिक्षण क्षेत्रात सातत्याने काम करणार्‍या सेवाभावी व्यक्तींना संस्थेतर्फे दरवर्षी पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा पुरस्कार समारंभ 18 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी ह्यांच्या हस्ते पुणे येथे पार पडला.

या अंतर्गत, रंगरेज मालन अहमदली, इक्रा इंग्लिश स्कूल, दापोडी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. याच कार्यक्रमात पालकनीतीच्या संपादक संजीवनी कुलकर्णी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर जयमल्हार वाचनालय, काशिग, ता. मुळशी येथील नामदेव राघू टेमघरे यांना ग्रंथप्रेमी पुरस्कार, शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्त्या नीला आपटे आणि विज्ञान वाहिनी – फिरती प्रयोगशाळा यांना संस्कार साधना पुरस्कार तसेच निवांत अंध मुक्त विकासालयच्या संस्थापक मीरा बडवे यांना त्यांच्या सामाजिक योगदानासाठी पुरस्कार देण्यात आले.