​१. खेळघर प्रकाशने

मुलांना शिकण्यातला आनंद समजावा ,त्यांना आपण होऊन शिकावस वाटावं,त्यांना कुतूहल वाटावं त्यांनी शोध घ्यावा ,नवीन माहिती स्वत:च्या अनुभवांशी ताडून पहावी,जे वाटलं,जे समजलं ते मोकळेपणान व्यक्त करावं,त्यातून जे उमजलं त्यान स्वतःला आणि सभोवतालच्या परिसराला समृद्ध बनवावं!

शिकण्या – शिकवण्याच्या प्रक्रियेच हे सुंदर चित्र ! मात्र प्रत्यक्षाहून बऱ्याच अंतरावर असलेलं! हे अंतर कसं कमी करायचं,विशेषतः शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून तुत्लेल्याना कशी मदत करायची ,याची सुस्पष्ट अशी रीत सांगायचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे.

पालकनीती परिवाराच्या खेळघराच्या अनेक वर्षांच्या कामाच्या अधरावर हे पुस्तक साकारलेले आहे .

संवेदनशीलतेन शिकण्या -शिकवण्याच्या प्रक्रियेचा विचार करणाऱ्या प्रत्येकाला या पुस्तकाचा खात्रीने उपयोग होईल .

खेळघर हस्तपुस्तकाबद्दल

​थोडक्यात

सविस्तर

 
 
 


२.पालकनीती परिवाराची प्रकाशने

आनंदाने शिकण्याच्या दिशेने
आनंदाने शिकण्याच्या दिशेने – (खेळघर हस्तपुस्तिका) – भाग १ आणि २ – ८५० रुपये
सकारात्मक शिस्त
सकारात्मक शिस्त – ७० रुपये
ठिपके जोडू या
ठिपके जोडू या, भूमितीशी मैत्री करू या – ७० रुपये (ठिपक्यांच्या कागदाचा वापर करून भूमिती समजून घेता यावी म्हणून… )
चौकटीचे कागद
चौकटीचे कागद: एक अनोखे गणिती साधन – १०० रुपये
भाषा नकाशाची
भाषा नकाशाची – ४० रुपये (नकाशाच्या माध्यमातील माहिती मुलांना सहज वाचून, समजून घेता यावी म्हणून )
अमिषांचा मुका आणि शिक्षेचा दम
अमिषांचा मुका आणि शिक्षेचा दम – ४० रुपये (आमिष आणि शिक्षांच्या पकडीतून संगोपन मोकळे व्हावे म्हणून..)
पालकनीती मासिक
(पालकत्वाला वाहिलेले) मासिक वार्षिक वर्गणी – ३०० रुपये मासिक – ताजा अंक