संदर्भ – ​द्वैमासिक

जगातल्या प्रत्येक गोष्टीला विज्ञानाचा संदर्भ असतो, निसर्ग, प्रकाश माणसाची वागणूक अगदी कलात्मकता आणि भाषा यांना सुद्धा. हा संदर्भ कळला की जग सुंदर करायची उमेद वाढते, आणि आत्मविश्वास देखील. हा शोध घेत शिकावं असं ज्यांना वाटतं त्या सगळ्यांसाठी हे द्वैमासिक आहे. विद्यार्थ्यांसाठी,त्यांच्या शिक्षकांसाठी, आणि प्रसंगी शिक्षकाची भूमिका निभावणार्‍या पालकांसाठीही. संदर्भ सोसायटी च्या संकेतस्थळासाठी येथे क्लिक करा.

१९९८ साली मुलामुलींमध्ये वैज्ञानिक वृत्ती वाढावी यासाठी शिक्षक पालकांसाठी आणि ७वी – ८वी पासूनच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संदर्भ ह्या द्वैमासिकाची सुरवात पालकनीती परिवारानी केली. ह्या द्वैमासिकात  एकलव्य संस्थेच्या संदर्भ याच नावाच्या द्वैमासिकातले अनेक लेख भाषांतर करून दिलेले असतात. सोईसाठी पुढे संदर्भ ह्या नव्या न्यासाची स्थापना होऊन हे त्यामार्फत हे नियतकालिक पालकनीतीप्रमाणेच अथकपणे सुरू आहे. त्याशिवाय विज्ञानप्रेम वाढावे यासाठी काही प्रकल्पही संदर्भ-संस्था आयोजित करत असते. https://www.sandarbhsociety.org/