मुलांना विविध genres ची उत्तमोत्तम पुस्तके बघायला मिळावी, चालायला मिळावी,त्यावर संवाद व्हावा आणि मुलांच्या मनांमध्ये पुस्तकांसाठी अवकाश तयार व्हावा या उद्देशाने खेळघरातील २९, ३० जून आणि १ जुलै असे तीन दिवस पुस्तक प्रदर्शन भरवले आहे.
पुस्तक आनंदाने शिकण्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये केंद्रस्थानी यावे यासाठी या वर्षभर काम करायचे ठरवले आहे. त्याचा हा पहिला टप्पा!
हा आठवडाभर सर्व गटांमध्ये मुलांबरोबर पुस्तकांवर काम होते आहे. प्रत्येक बॅच मधील मुले वेगवेगळ्या वेळेला खेळघरात प्रदर्शन बघण्यासाठी येणार आहेत. प्रदर्शनातील सत्रांची नावीन्यपूर्ण रीतीने आखणी केली आहे. लहान मुलांसाठी एखादा विषय घेऊन त्या संदर्भातल्या काही वस्तूंची, पुस्तकांची मांडणी करणे, लेखन,चित्रे, गोष्ट वाचून दाखवणे अशा उपक्रमांची आखणी केली आहे.
मुख्य म्हणजे हे सारे करताना आम्हा तायांना देखील पुस्तकांचा सहवास मिळतोय आणि वातावरण पुस्तक प्रेमाने भारून गेले आहे. https://youtu.be/iABmqCF9sr8