धरू नका ही बरे फुलांवर उडती फुलपाखरे…. आज पुस्तक प्रदर्शनात दुसरी आणि तिसरीच्या मुलांसाठी फुलपाखरू हा विषय घेतला होता. फुलपाखरं या विषयावरची पुस्तके तर होतीच. त्या बरोबरच विषयाला उठाव येईल अशी सजावट पण केली होती. कुंडीतल्या झाडावर फुलपाखरे लटकावली होती. ओढणीचे, पाना फुलांची फुलपाखरांची चित्रे सजली होती. पुस्तकांवरची कोडी, नाटुकली, ताईंनी सर्वांना पुस्तक वाचून दाखवणे… आणि मुलांनी वाचनात मग्न होणे अशी सगळी धमाल …