पाठशाला भीतर और बाहर

शिक्षणाप्रति आस्था असणार्‍या व्यक्ती, संस्थांना ‘शिक्षण’ ह्या विषयावर वैचारिक आदानप्रदान करण्यासाठी अझीम प्रेमजी विद्यापीठाने ‘पाठशाला भीतर और बाहर’ हा मंच उपलब्ध करून दिला आहे. ह्या हिंदी द्वैवार्षिकात शिक्षणक्षेत्रात कार्यरत व्यक्ती आपले अनुभव, विचार व्यक्त करतात. एकमेकांच्या अनुभवाचा फायदा होऊन कामाला अधिक खोली यावी, काम अधिकाधिक अर्थपूर्ण होण्यास मदत मिळावी, हा ह्यामागचा उद्देश.

ह्या अंकांमध्ये शालेय शिक्षण, विषेशतः शिक्षणाची सुरुवातीची वर्षे, शिक्षक-प्रशिक्षणाचे विविध पैलू, धोरणात्मक आणि सद्यकाळाशी सुसंगत विषयांवरील गुणवत्तापूर्ण लेख वाचायला मिळतात. वर्गात येणारे अनुभव-अडचणी, मुलांना भाषा, विज्ञान, गणित, समाजशास्त्र आदि विषय शिकवण्याच्या अभिनव पद्धती शिक्षकांनी एकमेकांना सांगून इतरांना त्याचा फायदा करून द्यावा, अशी भूमिका आहे.

शिक्षण आणि त्याच्या विविध पैलूंशी निगडित विषयांवरील उत्तमोत्तम पुस्तके, चित्रपटपरीक्षणे, शिक्षकांच्या मुलाखतींनाही इथे स्थान आहे.

प्रकाशित साहित्याचा उपयोग शिक्षक, शिक्षक-प्रशिक्षक, विषयतज्ज्ञ, कोणीही शिक्षणकर्मी व्यक्ती किंवा संस्थांनी करावा अशी अपेक्षा असते.कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्रांत ह्यातील साहित्याचा उपयोग करता येतो.

आजवर ‘पाठशाला’ चे 6 अंक प्रकाशित झाले असून शिक्षण आणि त्याचे व्यापक पैलू दर्शवणारे 100 हून जास्त लेख प्रकाशित झाले आहेत. हे अंक अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या टीचर ऑफ इंडिया पोर्टल, केआरसीवर उपलब्ध आहेत.

https://azimpremjifoundation.org/foundation-publication

pathshala@apu.edu.in वर ‘पाठशाला’बद्दल अधिक जाणून घेता येईल.

Paathshala_Cover1