पावलं | The Feet

जमिनीवर उभं राहण्यासाठी आणि चालण्यासाठी सर्वोत्तम साधनं व्हावीत म्हणूनच तर बनली आहेत आपली पावलं. चपला घालायला लागलो त्या दिवसापासून आपण पावलांची उपयुक्तता कमी केली. पावलांवरची जबाबदारी जशी कमी झाली तशी त्यांची थोरवीही कमी झाली आणि आतातर ती वाटेल त्या किंमती, आकार आणि प्रमाणांचे मोजे, चपला आणि जोडे वापरून स्वतःचे लाड पुरवण्याच्या आहारी गेली आहेत. म्हणजे देवानं आपल्याला खुरांऐवजी सुंदर संवेदनशील तळवे दिले म्हणून देवाविरुद्ध गाऱ्हाणं गातोय आपण जणू.

पायताणं मानवी वापरातून पूर्णपणे हद्दपार असावीत ह्या मताचा मी नाही. पण लहानग्यांच्या पावलांपासून त्यांचं निसर्गदत्त फुकट शिक्षण हिरावून घेतलं जाऊ नये असं ठणकावून सांगण्यात मला संकोच वाटत नाही. आपल्या सगळ्या अवयवांमध्ये, स्पर्शाद्वारे जमिनीशी जवळीक साधून तिला जाणून घेण्यासाठी आपली पावलं सर्वात जास्त अनुकूल आहेत. कारण जमिनीकडे तिचे असे समतलाचे हळुवार बदल आहेत जे ती फक्त तिच्या सच्च्या प्रियकरांच्या- म्हणजे पावलांच्या स्पर्शासाठीच देऊ करते.

  -रवींद्रनाथ टागोर


 

Naturally the soles of our feet are so made that they become the best instruments for us to stand upon the earth and to walk with. From the day we commenced to wear shoes we minimized the purpose of our feet. With the lessening of their responsibility they have lost their dignity, and now they lend themselves to be pampered with socks, slippers and shoes of all prices and shapes and misproportions. For us it amounts to a grievance against God for not giving us hooves instead of beautifully sensitive soles.

I am not for banishing footgear altogether from men’s use. But I have no hesitation in asserting that the soles of children’s feet should not be de­prived of their education, provided for them by nature, free of cost. Of all the limbs we have they are the best adapted for intimately knowing the earth by their touch. For the earth has her subtle modulations of contour which she only offers for the kiss of her true lovers—the feet.

– Ravindranath Tagore

Source: “MY SCHOOL” (lecture delivered in America published in Personality  London: MacMillan, 1933)

Available at http://www.swaraj.org/shikshantar/tagore_myschool.html